व्हिएस न्युज - औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून शुक्रवारी सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला होता. भाजपाच्या काही नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद लगेच उमटले आहेत. एमआयएम नगरसेवक समर्थकांनी औरंगाबाद महानगरपालिका परिसरात दगडफेक केली. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्त प्रसाद यांची भेट घेतली. हे सर्व जाताना भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या वाहनावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने काठी, दगडाने हल्ला केला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002