Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
‘खड्डे मुक्त शहर’ हे ध्येय साध्य करण्यासाठी झिकोप्लास्टचे यशस्वी संशोधन

व्हीएस न्यूज - भोसरी एमआयडीसीतील झिकोप्लास्ट कंपनीचे व्यवस्थापक जावेद सय्यद यांनी‘रिसायकलिंग ऑफ प्लास्टीक फॉर मॅन्यूफॅक्चर पॉवर क्लॉक अँड ब्रिक्स्‌’ या नावाने दि.19 जुलै 2017 रोजी. पेटंट नोंदणी कार्यालय मुंबई येथे पर्यावरण पुरक प्लॅस्टिकचा पुर्नवापर करणारे पेटंट नोंदणी केले आहे. ‘रिसायकलिंग ऑफ प्लास्टीक फॉर मॅन्यूफॅक्चर पॉवर क्लॉक अँड ब्रिक्स्‌’ या त्यांच्या पेटंटमुळे घातक असणा-या प्लॅस्टिकचा पुनर्वापर होऊन पर्यावरण रक्षणास मदत होणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करुन ‘खड्डे मुक्त शहर’ हे ध्येय साध्य करता येईल. यासाठी मोबाईल / पोर्टेबल प्लॅस्टिक रिसाइकलिंग मशीन उभारणी महानगरपालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्थरावर केल्यास शहर खड्डे मुक्त होईल. तसेच शेकडों लोकांना रोजगार मिळेल आणि कोट्यावधी रुपयांची बचत देखील होईल. असा दावा झिकोप्लास्ट कंपनीचे भागीदार संचालक जावेद सय्यद यांनी सोमवारी पिंपरीत पत्रकार परिषदेत केला. यावेळी संचालक आयुब सय्यद ,नाजणींन सय्यद उपस्थित होते,

अशा संशोधक वृत्ती असणा-या अभियंत्यांची सरकारने दखल घ्यावी, व त्यांना सक्षम अर्थ पुरवठा करावा तरच ‘स्टार्ट अप इंडिया’ प्रकल्पाला चालना मिळेल. या पेटंट अंतर्गत प्राप्त झालेल्या स्वामित्व हक्कातून त्यांनी ‘स्टार्ट अप इंडिया’ प्रकल्पाअंतर्गत ऑन लाईन नोंदणी केली. त्यानंतर दोन राष्ट्रीयकृत बँकांचे अधिका-यांनी सय्यद यांच्याशी संपर्क साधला. गेले पाच महिन्यांपासून सय्यद त्या बँकांच्या व्यवस्थापकांकडे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र बँक व्यवस्थापक सहकार्य करीत नसल्याची तक्रार जावेद सय्यद यांनी केली. बँक व्यवस्थापक नव उद्योजकांची पिळवणूक करतात. हे निषेधार्ह आहे. जावेद सय्यद(M.E.Mechanical) हे मेकॅनिकल शाखेतून व्दिपदवीधर आहेत. आतापर्यत त्यांनी एकूण सात पेटंट नोंदणी केली आहे. यापैकी चार पेटंट ॲटोमोबाईल क्षेत्रांशी तर तीन पर्यावरण क्षेत्रांशी संबंधीत आहेत. हा प्रकल्प पाणी बचत करणारा व ध्वनी, वायुचे प्रदुषण रोखणारा आहे. झिकोप्लास्टने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची सर्वात कौतुकास्पद बाब हीच आहे की या तंत्रज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारचे वायू आणि पाणी प्रदुषण न होता टाकाऊ प्लॅस्टिकचा पुनर्वापर सहजशक्य आहे.

आपल्या प्रकल्पाविषयी माहिती देताना जावेद सय्यद यांनी सांगितले की, प्लॅस्टिकला निसर्गत: सडायला किंवा कुजायला जवळजवळ 80 ते 100 वर्ष एवढा कालावधी लागतो असे न कुजणारे प्लॅस्टिक जेंव्हा कुजण्या-या सेंद्रीय पदार्थामध्ये सामील होते तेव्हा मात्र त्यांचे मिश्र खतांमध्ये रुपांतर करणे खूप अवघड होऊन जाते म्हणून मग मनपा असे प्लॅस्टिक जमा करत नाही आणि मग ते तसेच इतरत्र पडून राहते आणि प्रदुषणात वाढ होते. यावर दुरगामी व कायमस्वरुपी उपाय भोसरी एमआयडीसी सेक्टर नं. 7 मधील झिकोप्लास्ट कंपनीने नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यात सर्व प्रकारचे प्लॅस्टिकचा वापर करुन पेव्हर ब्लॉक आणि विटांचे उत्पादन करता येईल. याचे झिकोप्लास्ट कंपनीने ‘रिसायकलिंग ऑफ प्लास्टीक फॉर मॅन्यूफॅक्चर पॉवर क्लॉक अँड ब्रिक्स्‌’ हे तंत्रज्ञान पेटंट नोंदणी केले आहे. त्याच्या हक्कातून एक वर्ष प्रयत्न करुन ‘पिटर’(Peater) मशीनची निर्मिती केली आहे. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणारे व्यापारी सुध्दा जे प्लॅस्टिक वापरत नाही त्या टाकाऊ प्लॅस्टिकचा सुध्दा वापर यात करता येतो. प्लॅस्टिकचा असा पुनर्वापर करणे हा सर्वात नवीन आणि टिकाऊ असा प्रकल्प आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा विभागामध्ये 12 टन एवढे प्रचंड टाकाऊ प्लॅस्टिक दररोज जमा केले जाते. या 12 टनापैकी फक्त 4 ते 5 टन एवढेच टाकाऊ प्लॅस्टिक पुनर्वापर करण्याजोगे असते. झिकोप्लास्टने शोधलेल्या या तंत्रज्ञानामध्ये ह्याच अश्या पडून राहिलेल्या टाकाऊ प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणे सहज शक्य आहे. पातळ द्रवरुपातील प्लॅस्टिक आणि दगडांचा बारीक चुरा एकत्रित करुन पेव्हर ब्लॉक किंवा विटा बनविल्या जातात. यात मानवी हस्तक्षेपाची गरज नाही. टाकाऊ प्लॅस्टिक वितळवताना कोणताही धूर बाहेर पडत नाही. सर्व धूर exhaust gas तंत्रज्ञानाव्दारे शोषला जातो आणि त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन शुध्द हवेत रुपांतर केले जाते. यासाठी पाण्याचा अल्पसा वापर करावा लागतो. या पेव्हर ब्लॉकचा वापर फुटपाथ आणि वाहन पार्किंग, औद्योगिक आस्थापनातील फ्लोरिंगसाठी करता येईल. बाजारात उपलब्ध असलेले पेव्हर ब्लॉक वजनाने जास्त असून त्यांची वजन पेलण्याची क्षमता 8 टन एवढी आहे. एकदा तुटले की परत वापरता येत नाही. झिकोप्लास्टने बनविलेल्या पेव्हर ब्लॉक आणि ब्रिक्स्‌चा पुनर्वापर करता येतो. ते वजनाला तर हलके आहेत आणि त्यांची वजन पेलण्याची क्षमता 22 टन एवढी प्रचंड आहे. (सोबत प्रयोग शाळा अहवाल जोडला आहे.) तसेच हे पेव्हर ब्लॉक 150 डीग्री एवढे तापमान सहन करु शकतात. हे ब्लॉक तोडणे खूप कठिण आहे. त्यामुळे याचा वापर औद्योगिक क्षेत्रात देखील होऊ शकतो. याची किंमत सध्या उपलब्ध असणा-या पेव्हर ब्लॉकच्या तुलणेत 40 टक्के कमी आहे.

10 सेटअप मशीन पिंपरी चिंचवड परिसरामध्ये उभारले तर अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल व हजारों टन प्लॅस्टिकचा पुनर्वापर होईल. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी याचा वापर करुन ‘खड्डे मुक्त शहर’ हे ध्येय साध्य करता येईल. यासाठी मोबाईल / पोर्टेबल प्लॅस्टिक रिसाइकलिंग मशीन उभारणी करावी लागेल. असेही जावेद सय्यद यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
सिझेरियन प्रसूती बंद करण्यासाठी शासनाचा पुढाकार

आर्थिक लुबाळणूक रोखण्यासाठी आरोग्य आयुक्तांची समिती

व्हिएस न्युज- राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयात होणाऱ्या सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातून माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यासोबतच आर्थिक लुबाडणूकही होत आहे. या प्रकाराची आता शासनानेच दखल घेतली असून, तो बंद करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांची समिती नेमण्यात आली. या समितीकडून मार्च २०१८ पर्यंत कारवाईसाठी शिफारशी मागवण्यात आल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने सिझेरियन प्रसूतीसंदर्भात निकष तयार केले आहे. त्या निकषाचे पालन होत नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या. त्यामध्ये राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यातून माता व बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच त्यापोटी रुग्णालयाकडून रुग्णांची लूटही होत आहे. या बाबी पाहता सिझेरियन प्रसूतीचा तपशील जाहीर करणे बंधनकारक करणे, सिझेरियन प्रसूतींची संख्या प्रमाणापेक्षा अधिक असणाऱ्या रुग्णालयांची चौकशी करणे, माता व बालकांचे आरोग्य व अधिकार लक्षात घेता सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची तयारी शासनाने चालवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये नऊ सदस्य आहेत. आरोग्यसेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक, राज्यातील विख्यात स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ-२, डॉ. रेखा डावर, सुवर्णा घोष, निदा हसन, युनिसेफने नामनिर्देशित केलेला प्रतिनिधी, व्यावसायिक संघटनेचा प्रतिनिधी, कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे सहसंचालक यांचा समितीत समावेश आहे. समितीची घोषणा १५ डिसेंबर रोजी करण्यात आली. तीन महिन्यांत समितीने शिफारशींचा अहवाल सादर करावयाचा आहे.
...Read More

V. S. News
बाप- लेकावर कोयत्याने वार

व्हिएस न्युज -रिक्षात बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादात 14 जणांच्या टोळक्याने बाप-लेकावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर झाले. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी तीन जणांना निगडी पोलीसांनी अटक केली आहे.
नजीर शेख (वय 64 ) आणि त्यांचा मुलगा सद्दाम नजीर शेख (रा. रूपीनगर, तळवडे) असे जखमी झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे. अनिकेत प्रकाश रणदिवे (वय 18 ) आतीश उर्फ मन्नु बलदेव कोरी (वय20, रा. घरकुल, चिखली) आणि आदर्श उर्पै छोट्या अशोक मगर (वय 18, रा. पवळे शळेसमोर, निगडी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर सिद्धेश उर्फ सोन्या मोरे, जुनेद नाईकवाडी, वाजिद शेख, आक्या बॉण्ड, वसीम हारूण शेख, विशाल खरात आणि इतर चार ते पाच आरोपी पसार आहेत. नजीर यांनी त्यांची रिक्षा स्टार बेकरीजवळ उभी करून ते मुलगा सद्दाम याच्यासमवेत बोलत होते. यावेळी आरोपी अनिकेत आणि मन्नु हे नजीर यांच्या रिक्षात बसु लागले. मात्र, नजीर हे सद्दामसमवेत बोलत होते. यावेळी रिक्षात बसण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे धमकी देत ते निघून गेले. काही वेळानंतर ते इतर साथीदारांना घेऊन आले. या टोळक्याने नजीर आणि सद्दाम यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. आदर्श आणि मन्नु याने कोयत्याने बाप-लेकांवर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
कॉलसाठी मोबाईल घेण्याच्या बहाण्याने तरूणाला मारहाण करून लुटले

व्हिएस न्यूज - रस्त्याने पायी जाणाया तरूणाचा मोबाईल एकाने कॉल करण्यासाठी घेतला आणि साथीदाराच्या मदतीने तरूणाला बेदम मारहाण केली आणि दगडावर डोके आपटून त्याच्या खिशातील रोकड, मोबाईल, घड्याळ असा हजार रूपये किमतीचा ऐवज लुबाडून नेला. ही घटना खडकीत जुन्या होळकर ब्रीजजवळ घडली.
गणेश देवकाते (वय 31, रा. पिंपरी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पिंटो आणि मनिष उर्फ महाराज (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकाते हे 23 डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास खडकीतील जुन्या होळकर ब्रीजजवळील म्हसोबा मंदीरासमोरून पायी चालले होते. यावेळी 25 ते 30 वयोगटातील एक जण त्यांच्याजवळ आला. एक कॉल करण्यासाठी त्याने देवकाते यांना मोबाईल मागितला. देवकाते यांनी मोबाईल दिल्यानंतर तो मोबाईल घेऊन म्हसोबा मंदीराकडे चालू लागला. देवकाते त्याच्या पाठीमागे जात असतानाच दुसया आरोपीने त्यांच्या मानेवर जोरात फटका मारला. त्यानंतर दोघांनी मारहाण करत त्यांना ओढत नेले. झटापटीत देवकाते यांनी आपला मोबाईल आरोपीच्या हातातून घेण्याचा प्रयत्न केला असता एक जण पिंटो इसको मोबाईल मत दे, असे म्हणाला तर दुसरा त्याला मनिष आणि महाराज या नावाने बोलत इसके पास कितने पैसे हे ये देख, असे म्हणाला. त्यानंतर दोघा चोरट्यांनी देवकाते यांचे डोके दगडावर आपटत मारहाण सुरू केली आणि त्यांच्या खिशातील रोकड, मोबाईल, घड्याळ असा 13 हजार रूपये किमतीचा ऐवज काढून घेतला आणि पसार झाले. खडकी पोलीस तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
योग मोटर्सकडून महिलेची फसवणूक, वाकड पोलिसात तक्रार

व्हिएस न्यूज - जुन्या दुचाकीलाच नवीन कलरिंग करून महिला ग्राहकाला विक्री केल्याप्रकरणी वाकड येथील योग मोटार्स विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी सोमवार दि.२५ रोजी वाकड पोलिसात महिला ग्राहकाला न्याय मिळवून देण्याकामी तक्रारीचे निवेदन दिले आहे.
दाखले यांनी निवेदनात म्हटले आहे की, दि. २१ डिसेंबर २०१७ रोजी MH. 14. GE. 2793 ही हिरो होंडा शाईन गाडी योग मोटार्स, वाकड या ठिकाणाहून वर्षा आजीनाथ तेलंगे रा.तापकीर नगर यांनी विकत घेतली. वास्तविक ही गाडी जुनिच असून नविन ग्रे कल्लर मारून वर्षा तेलंगे यांना गाडी विक्री करण्यात आली. त्यांनी सदरची गाडी गेल्या पंधरा दिवसापूर्वी सर्व्हिसिंग करण्यासाठी दिली होती. ही गाडी प्रेशर असलेल्या पाण्याने धुतल्यामुळे तिचा वरचा ग्रे कलर निघून जावुन पूर्वीचा लाल कलर दिसु लागला. यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वर्षा यांनी ही बाब युग शोरूमच्या व्यवस्थापनाच्या नजरेस आणून दिली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याप्रकरणी युवराज दाखले यांनी सदर महिला ग्राहकाला नुकसान भरपाई मिळावी तसेच संबंधित शोरूमवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
...Read More

V. S. News
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान २६ डिसेंबरपासून बंद

व्हीएस न्यूज –पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर चिंचवड येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने येत्या २६ डिसेंबर पासून नागरिकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यातयेणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणास मान्यता दिली आहे. त्यानुसार तेथील विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. संभाजीनगर चिंचवड येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय येथील कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सोयीसाठी हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
शिवसेना माजी शहरप्रमुख नेताजी चव्हाण यांचे निधन

व्हीएस न्यूज - शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि माजी विरोधी पक्ष नेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय-५७) यांचे दिर्घ आजाराने मध्यरात्री एकच्या सुमारास मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

नेताजी चव्हाण यांनी १९९२ ते १९९७ दरम्यान नगरसेवक पद भूषवले आहे. तसेच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक, मोहनगर येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते. तर भगवा रक्षक या साप्ताहीकाचे ते संपादक होते.

चव्हाण यांच्या पार्थीवावर त्यांच्या मुळगावी मु.पोस्ट बोरवडे ता.कागल जि. कोल्हापूर येथे दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मोहननगर शिवसेना शाखा येथे ठेवण्यात आले होते. यावेळी स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे, मीनल यादव, माजी नगरसेवक मधुकर बाबर, मारुती भापकर, नंदकुमार सातुर्डेकर, योगेश बाबर, गणेश लंगोटे, सारंग कामतेकर, अमित बाबर, तसेच अनेक शिसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली.

...Read More

V. S. News
काँग्रेस हा मानवी अधिकार मूल्यांचा आदर करणारा पक्ष - नदीम मुजावर

व्हीएस न्यूज - मानवता हाच धर्म या महात्मा गांधी यांच्या संकल्पनेवर स्थापन झालेला कॉंग्रेस पक्ष नेहमी सहिष्णुता, समानता व मानवी अधिकार मूल्यांचा आदर करणारा पक्ष आहे. कॉंग्रेसने सर्व धर्मातील नागरिकांना बरोबर घेऊन भारताला विकसनशील राष्ट्र बनविले आहे. स्वर्गीय राष्ट्रपती डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेनुसार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी युवक व महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचे धोरण आखले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम मुजावर यांनी केले.

पिंपरीतील बेटीना देवीदास आणि मुख्यधापिका सँड्रा अँथोनी डिसोझा यांना अनुक्रमे कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी व सचिवपदी नियुक्ती पत्र मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल प्रदेश सचिव मॅन्युअल डिसोझा, रुपा दास व रुपेश दास, मेरी चक्रनारायण आदी उपस्थित होते.

मुजावर म्हणाले कि, बेटीना दास व सँडरा डिसोझा यांच्या कामाचा पुर्वानुभव आणि जनसंपर्क पाहता त्यांची अल्पसंख्यांक कमिटीवर निवड करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी काँग्रेसमुक्त भारत ची आरोळी ठोकली होती. त्यांचे स्वप्न देशातील दलित, युवा, महिलावर्ग कधी पुर्ण होऊ देणार नाही. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतून हे सिध्द झाले आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व ईशान्येतील राज्यात विधानसभा निवडणुकात कॉंग्रेस समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन निवडणुकांना सामोरे जाईल व यश संपादन करेल असा विश्वास मुजावर यांनी व्यक्त केला. सुत्रसंचालन रुपा दास व आभार मेरी चकरनारायण यांनी मानले.

...Read More

V. S. News
... आता पिंपरी चौक नाही ,तर 'महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक'.

व्हीएस न्यूज - २९-३०-२०१७ या रोजी धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने आठ ते दहा मागण्या करिता बे मुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यातिल एक प्रमुख मागणि अशि होति की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळ असणारे महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळिल परिसरास 'महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक' कायदेशिर असे नाव देण्यात यावे या करिता धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने धरणे आंदोलन करण्यात आले होते व त्या नंतर प्रभागाच्या कार्यकक्षम नगरसेविका मा.महापौर वैशालिताई घोडेकर यांना धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी निवेदन दिले होते त्याचि दख्खल घेउन मा.महापौर नगरसेविका वैशालिताइ घोडेकर यांनि सदर विषय प्रभाग समिति मध्ये मांडुन महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक असा ठराव 'क' प्रभाग समिति मध्ये मांडुन तो ठराव पास करण्यात आला व रविवारी पालिकेच्या वतिने महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक नामफलकाचे उद्दघाटन मा.महापौर नगरसेविका वैशालिताई घोडेकर यांच्या हस्ते रविवार रोजि 4 वाजता करण्यात आले आहे. या वेळेस धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे, सुरेंद्र जाधव, निलेश सरतापे, आनंद साळवे, धर्मपाल कांबळे, नसरिन शेख, प्रशांत किर्ते,दीपक साबळे व भिम संग्राम संघटनेचे पदाधिकारी तसेच हेल्पिंग हँण्डचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव आदि जण उपस्थित होते.
...Read More

V. S. News
तरूणाचा चाकूने भोकसून खून; दोन संख्या भावांना अटक

व्हिएस न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून दोन सख्ख्या भावांनी एका तरुणाचा पोटात चाकू भोकसून खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास चिखली मोरे वस्ती, साने चौक येथे घडली. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे.
दिनेश निवृत्ती पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अतुल गाडे हा या घटनेत गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी समाधान रामदास मोरे (वय 24) आणि चेतन रामदास मोरे (20) या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. याबाबत अतुल अनिल गाडे (वय 25, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश पाटील हा एका कंपनीत काम करत होता. तर आरोपी समाधान आणि चेतन एका दुकानात काम करतात. हे तिघेही मूळचे जळगावचे रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्री दिनेश याचा मित्र अतुल याची आरोपींसोबत 'माझ्याकडे काय बघतोय?' या कारणावरून भांडणे झाली. ही भांडणे सोडवण्यासाठी दिनेश पाटील मध्ये पडला. त्यावेळी आरोपी समाधान याने घरातील चाकू आणून दिनेशच्या पोटात भोसकून खून केला. तर अतुलला गंभीर जखमी केले.
निगडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे करीत आहेत.
...Read More

V. S. News
दोन दुचाकींची धडक; एकाचा मृत्यू

व्हिएस न्यूज - दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. दुसरा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावर वाकड येथे घडली.
संतोष बाळासाहेब साठे (वय-38, रा. आनंदवन सोसायटी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संदिप इथापे (रा. वाकड) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ विठ्ठल साठे (वय-32, रा. शिवणे, ता. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार वाय. जी. रामेकर यांनी माहिती दिली. संतोष साठे हे शनिवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास बेंगलोर-मुंबई महामार्गावरून चिंचडगावाकडे येते होते. त्याचवेळी इथापे सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येत असताना साठे यांच्या ऍक्टीव्हाला जोरदार धडक दिली. यामध्ये साठे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर इथापे हेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!