व्हिएसन्यूज - जुन्या दुचाकीलाच नवीन कलरिंग करून महिला ग्राहकाला विक्री केल्याप्रकरणी वाकड येथील योग मोटार्स विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी सोमवार दि.२५ रोजी वाकड पोलिसात महिला ग्राहकाला न्याय मिळवून देण्याकामी तक्रारीचे निवेदन दिले आहे.
दाखले यांनी निवेदनात म्हटले आहे की, दि. २१ डिसेंबर २०१७ रोजी MH. 14. GE. 2793 ही हिरो होंडा शाईन गाडी योग मोटार्स, वाकड या ठिकाणाहून वर्षा आजीनाथ तेलंगे रा.तापकीर नगर यांनी विकत घेतली. वास्तविक ही गाडी जुनिच असून नविन ग्रे कल्लर मारून वर्षा तेलंगे यांना गाडी विक्री करण्यात आली. त्यांनी सदरची गाडी गेल्या पंधरा दिवसापूर्वी सर्व्हिसिंग करण्यासाठी दिली होती. ही गाडी प्रेशर असलेल्या पाण्याने धुतल्यामुळे तिचा वरचा ग्रे कलर निघून जावुन पूर्वीचा लाल कलर दिसु लागला. यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वर्षा यांनी ही बाब युग शोरूमच्या व्यवस्थापनाच्या नजरेस आणून दिली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याप्रकरणी युवराज दाखले यांनी सदर महिला ग्राहकाला नुकसान भरपाई मिळावी तसेच संबंधित शोरूमवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.