Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
आनंदा लांडगे यांचे निधन

व्हीएस न्यूज - भोसरी गावचे ज्येष्ठ नागरिक पै. आनंदा (आण्णा) धोंडीबा लांडगे (वय 76 वर्षे) यांचे मंगळवारी (दि. 9 जानेवारी) राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या पिंपरी कार्यालयाचे मुख्य वार्ताहर सुनिल लांडगे यांचे ते वडील होत.

भोसरीतील स्मशानभूमित मंगळवारी दुपारी आनंदा लांडगे यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे आदींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि शिक्षण,सामाजिक, राजकीय, सहकार, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

...Read More

V. S. News
विद्यार्थी हा देशाच्या विकासातील अविभाज्य घटक - कुलगुरू डॉ. करमळकर

' स्पंदन - २०१८' वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

व्हीएस न्यूज - ' विद्यार्थी हा देशाच्या विकासातील अविभाज्य घटक आहे.स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते. ' असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. ताथवडे येथील बालाजी कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्सच्या 'स्पंदन - २०१८' या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते यावेळी विविध क्रीडाप्रकारांमधील विजयी संघ,शंभर टक्के उपस्थिती, वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी अशा ८० विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रशस्ती पत्रके देण्यात आली.बालाजी कॉलेजमधील शिस्त, अभ्यास पद्धतीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.संस्थापक कर्नल डॉ ए.बालसुब्रमान्यम यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचा हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

संचालक डॉ.जी.के.शिरुडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ.गणपतराव शितोळे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. डिम्पल सैनी यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अरुण वानखडे, प्रा.मोनिका कुलकर्णी यांनी नियोजन केले. तर डॉ.जयश्री नाम्बियार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

...Read More

V. S. News
मारहाण करत टोळक्याने चालकाला लुबाडले

व्हीएस न्यूज - पंक्चर झालेल्या मोटारीचे टायर बदलण्यास मदतीचा बहाणा करून एका टोळक्याने चालकाला मारहाण करीत त्यांच्याकडील बारा हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. हा प्रकार रविवारी रात्री साडेअकरा वाजता बाणेर येथे मर्चिडीस बेंझ शोरूम समोर घडला. याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सागर उत्तम तडाके (वय-20, रा. काळभोरनगर, आकुर्डी), अशोक ऊर्फ खंड्या जाधव (वय-20, रा. इंदिरानगर वसाहत, चिंचवड स्टेशन) असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. 17 वर्षीय अल्पवनीय मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी सचिन ढावरे (वय-23, रा. अशोकनगर, ताथवडे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याची मोटार रविवारी रात्री साडेअकरा वाजता बाणेर येथील मर्चिडीझ बॅझ शोरूम समोर पंक्चर झाली. त्यावेळी ते पंक्चर झालेले टायर बदलत असताना दोन दुचाकीवरून आलेल्या पाच आरोपींनी त्याला मदतीचा बहाणा केला. सचिनला आरोपीने मारहाण करत त्याच्या खिशातील 12 हजार रूपये किंमतीचा मोबाईल घेवून आरोपी पसार झाले. सचिनने त्वरीत 100 नंबरवर फोन केल्यानंतर पोलीसांनी आरोपींचा पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले. तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. फौजदार एम. के. आबनावे अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
चार वर्षानंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप

व्हीएस न्यूज - चार वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतिने राज्यातील एस. टी. कर्मचारी वर्गाना नुकतेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. दापोडी येथिल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना गणवेश वाटपाने प्रारंभ करण्यात आला. गणवेषाच्या दर्जाबाबत कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. दापोडी येथिल मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना नुकतेच आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक रोहित अप्पा काटे, कार्यशाळा व्यवस्थापक रघुनाथ कांबळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार चाबुकस्वार यांच्या हस्ते प्रारंभिक स्वरुपात 19 कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. लवकरच इतर सर्व कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक कांबळे यांनी सांगितले. राज्यात पुणे नागपुर व औरंगाबाद या तीन शहरात महामंडळाच्या कार्यशाळा अस्तित्वात असुन पुणे दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण 600 तर विभागीय कार्यशाळेत 125 कर्मचारी कार्यरत आहेत. या तिन्ही कार्यशाळेत मिळुन एकुन दोन हजार कर्मचारी कार्यन्वित आहेत. राज्यातिल हे सर्व कर्मचारी मागिल चार वर्षा पासुन गणवेषापासुन वंचित ठेवण्यात आले होते. महामंडळाच्या वतिने गणवेश वाटप केले जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने गणवेश खरेदी करण्याची वेळ आली होती.
मागिल वर्षी जुलै महिन्यात भर पावसात एस.टी. कामगार संघटनेसह इतर संघटनांनी प्रलंबित गणवेश वाटपासह इतर मागण्यासाठी भर पावसात महामंडळाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. कामगार संघटनांच्या वतिने या विरोधात प्रखर लढा उभारण्यात आला होता. या लढ्यास या गणवेश वाटपा अंतर्गत काही अंशी यश मिळाल्याचे काही कामगारांनी सांगितले. नविन गणवेश वाटप अंतर्गत वर्षाला दोन गणवेश वाटप केले जाणार असल्याने तसेच वाटप करण्यात आलेले गणवेशाचा दर्जा निकृष्ट असल्याने याबाबत कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यापुर्वी वर्षाला तीन गणवेशाचे कापड शिलाई खर्चासहित देण्यात येत होते.
फोटो- वाटप नावाने
फोटो ओळ ः दापोडी येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमा प्रसंगी कामगारांना संबोधित करताना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शेजारी नगरसेवक रोहित काटे व्यवस्थापक आर. कांबळे आदी मान्यवर.
...Read More

V. S. News
मोहननगरमध्ये टोळक्याचा हैदोस ; 6 गाड्या फोडल्या

व्हीएस न्यूज - 11 जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, काड्या, सिमेंट ब्लॉकने दहशत माजवित सहा गाड्यांची, घरांच्या काचांची तोडफोड केली. ही घटना रामनगरमधील सैनिक वसाहत परिसरात सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. चोवीस तासात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सागर दत्तु नलावडे (वय 21, रा. रामनगर), सागर गणेश भिसे (वय 19, रा. दत्तनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विनोद राकेश पवार, पवन विष्णू लष्करे, सुरज गायकवाड, अजय विश्वनाथ ओव्हाळ, वैभव ओव्हाळ, सागर सातकर, अभिषेक गाणगाव, निसार शेख, युवराज माने (सर्व राहणार चिंचवड) हे फरार आहेत. याप्रकरणी आण्णासाहेब माधवराव शिरसाट (वय-60 रा. रामनगर चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर परिसरात सोमवारी रात्री टोळक्यांनी परिसात दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड केली. या टोळक्याने तलवार, लाठ्या आणि सिमेंटच्या गट्टूच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सहा गाड्या फोडल्या असून 23 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादी यांच्याकडील अडीच हजार रुपये या टोळक्याने तलवारीच्या धाकाने काढून घेतले. पिंपरी पोलीस फरार आरोपींचा कसोशिने तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून सुसंस्कृत नागरिक घडतील.....चंद्रकांत सातकर

व्हीएस न्यूज - शहरी व उच्च शिक्षित युवकांना ग्रामिण भागातील जीवन जवळून अनुभवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांचे आयोजन ग्रामीण भागात केले जावे. या शिबिरांमधून युवकांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जावे. यामुळे उच्च शिक्षित, सुसंस्कृत नागरिक घडतील असा आशावाद पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांचे मावळ मधील वडेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन सातकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी सरपंच गुलाब गभाले, उपसरपंच कुंडलिक लष्करी, राजेश खांडभोर, शंकर हेमाडे, विक्रम हेमाडे आदी उपस्थित होते. या शिबिरात डॉ. जयंत उमाळे, संजय लकडे, डॉ. एन.बी. चोपडे, डॉ. अंजना अरीकेरीमठ, सर्पमित्र अतुल सवाखंडे, विवेक सांबारे आदींनी मार्गदर्शन केले. सात दिवसांच्या या शिबिरात ग्राम स्वच्छता, संगणक दान व प्रशिक्षण, महिला सबलीकरण, शोषखड्डे, माजी विद्यार्थी मार्गदर्शन, मतदान जनजागृती, वृक्षारोपण, सलग समतर चर (सीसीटी), सापाबाबत समज - गैरसमज, बंधारा बांधणे, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समाज प्रबोधनपर बाहुली नाट्य व कार्यक्रम, वित्तीय साक्षरता अभियान, करीअर मार्गदर्शन, चिंतन, अंधश्रध्दा निर्मुलन, शेतक-यांसाठी लागणा-या कृषी ॲप बद्दल माहिती संकलन करणे, संशोधन व व्यक्तीमत्व विकासासाठी उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराच्या आयोजनात पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्‌माकर विसपुते, गोरख भालेकर यांचे विशेष सहाय्य व मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, डॉ. शितल भंडारी, प्रशांत पाटील, प्रा.आर.टी जगताप, प्रा. निखिल सुरवाडे, प्रा. केतन देसले, प्रा. संतोष पाचारणे, विद्यार्थी प्रतिनिधी राज गांधी, किरण जाधव, कार्यालयीन कर्मचारी अस्मिता मोरे, नितीन कुरवार, सागर तामोरे, ईश्वर बो-हाडे, तुकाराम भसे आदींनी शिबिराचे आयोजन सहभाग घेतला होता.

...Read More

V. S. News
शेतीमालाला हमीभाव व ऑलम्पिक खेळाडूंना चांगल्या सुविधा द्या- खासदार श्रीरंग बारणे

व्हीएस न्यूज - अन्नधान्याचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर होऊन सुद्धा योग्य प्रणालीचा अभाव असल्याने तसेच सरकारकडून त्याची खरेदी योग्य भावात होत नसल्याने दिवसेंदिवस अन्नधान्याचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल शासनाने योग्य हमीभावाने खरेदी करून देशातील इतर भागांमध्ये उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होईल व अन्नधान्याचे उत्पन्न वाढेल अशा आशयाचे व भारतामध्ये क्रिकेट, टेनिस व बँडमिंटन यांसारख्या खेळांना व खेळाडूंना सुप्रसिद्ध व त्याचबरोबर चांगल्या सुविधा ही मिळतात परंतु देशामधी ऑलम्पिक खेळाडूंना मात्र कोणत्याही प्रकारच्या चांगली सुविधा मिळत नसल्याने ऑलम्पिक खेळाला तरुणांची पसंती कमी आहे. देशातील ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच नवनवीन खेळाडू तयार व्हावेत यासाठी त्यांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून देशाला उत्कृष्ट दर्जाचे ऑलम्पिक खेळाडू मिळतील अशा आशयाची दोन खाजगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले.

देशातील शेतकऱ्यांना शेतीसंबंधी माहिती देण्यासाठी सरकार आणि कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही भागातील शेतकरी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. परंतु दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होते व हा शेतीमाल ज्यावेळी बाजारामध्ये विक्रीसाठी जातो तेव्हा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही आणि शेतकऱ्यांची मिळकत दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेतकरी हताश होऊन आत्महत्या करीत आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पेरणी होऊन तसेच शेतीसाठी अनुकूल वातावरण असूनसुद्धा भाजी व इतर धान्न्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण झाले आहे.

नागरिकांच्या हितासाठी विविध धोरणे उभी करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे कल्याणकारी राज्यासाठी महत्वपूर्ण आहे परंतु शेतीशी संबंधित अशा धोरणांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्षे होऊन सुद्धा देशातील शेतकऱ्यांच्या परस्थिती मध्ये कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशातील ८६ टक्के शेतकर्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे परिणामतः उत्पन्नही कमी होत असल्याने त्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण होत आहे. तर दुसरीकडे मोठी शेती असलेले शेतकरी आयकरामध्ये करोडो रुपयांची सूट मिळवीत आहेत. ही तफावत कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या शेतीमालाला सरकाने योग्य हमीभावाने खरेदी करावीत.

तसेच देशातील बहुतांश नागरिक आपल्या मुलांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी मेडिकल किंवा इंजिनियरिंग सारख्या शाखांना पसंती देत आहेत. परंतु खेळामध्ये त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची प्रेरणा मिळत नाही. ऑलम्पिक मध्ये खेळण्यासाठी बहुतांशी खेळाडू हे ग्रामीण भागातच तयार होत असतात परंतु त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशाचे नाव जागतिक स्थरावर उंचाविण्यासाठी ऑलम्पिक खेळाडू चिकाटीने परिश्रम घेत असतात परंतु त्यांना सरकारकडून चांगल्या सुविधा व प्रोत्साहन मिळत नसल्याने हळू हळू त्यांचा या खेळाकडे वळण्याचा कल कमी होत चालला आहे. क्रिकेटसारख्या इतर खेळामधील खेळाडूना सरकार कडून शासकीय व निमशासकीय नोकरी लवकर मिळू शकते पण दुसरीकडे जो ऑलम्पिक खेळाडू आहे त्या खेळाडूला सरकारकडून तुटपुंजी मदत मिळते. त्यामुळे सरकारने ऑलम्पिक सारख्या खेळासाठी बजेटमध्ये जास्तीत जास्त तरतूद करून ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली असे बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
भोसरीत शुक्रवारपासून ‘सुखी जीवनाचे गुपित’ या विषयावर व्याख्यान

व्हीएस न्यूज - जीवन जगणे ही कला आहे. ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी, समृध्द व यशस्वी होणे शक्य नाही. व्यसनाधीन व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दु:खाच्या घाईत लोटतात, हे प्रत्यक्ष पाहुण देखील अनेक युवक युवती व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सद्‌गुरु श्री वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवनविद्या मिशनच्या प्रबोधन चळवळीतून मिळावी व अवघा समाज सुखी व समृध्दी व्हावा. या उद्देशाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली ५१ वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधनपर व्याख्यान भोसरीत आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१२ जानेवारी ते रविवार दि. १४ जानेवारी २०१८ पर्यंत ‘सुखी जीवनाचे गुपित’या विषयावर भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गाव जत्रा मैदानावर हा कार्यक्रम होईल. अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, राहुल जाधव, शिक्षणमंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष शैलेश जोशी, सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, संतोष लोंढे, उत्तम केंदळे, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, नगरसेविका भिमाबाई फुगे, सारीका लांडगे, यशोदा बोईनवाड, प्रा. सोनाली गव्हाणे, हिराबाई घुले, नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे, सुजाता घोलप, साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, माजी नगरसेवक महादेव गव्हाणे, तसेच बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे,प्रताप मोहिते, संतोष जाधव, सचिन तापकिर, अजित बुर्डे, गणेश तापकीर, नंदू दाभाडे, बबन बोराटे, बापू घोलप, सुहास ताम्हाणे, केतन झोरे, सागर हिंगणे, किसन बावकर, मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पोलिसात तक्रार दिली म्हणून शेजाऱ्यावर कोयत्याने वार

व्हीएस न्यूज - पोलिसात तक्रार दिली या रागातून शेजाऱ्यावरच कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना देहूरोड येथील आंबेडकरनगर येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. अविनाश ज्ञानदेव भोसले (वय 40 रा.आंबेडकरनगर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. विजय राजू पिल्ले (रा. आंबेडकरनगर) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले व पिल्ले हे दोघे शेजारी राहतात. पिल्ले हा त्याच्या मित्रमंडळींना घेऊन रात्री दारातच गप्पा मारत बसतो. वेळोवेळी सांगूनही तो ऐकत नाही अशी तक्रार भोसले यांनी 2 जानेवारीला देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून 'तू माझ्या विरुद्ध अशी तक्रार पोलिसात का केली', असा जाब विचारात पिल्ले यांनी भोसलेच्या हातावर कोयत्याने वार केले. यामध्ये भोसले गंभीर जखमी झाले आहेत. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

व्हीएस न्यूज - टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माणगाव, पारखी वस्ती येथे सोमवारी पहाटे घडली. मंगेश मुरलीधर कणसे (वय 25, मूळ रा, लिंबाचीवाडी सातारा) संभाजी बिराप्पा गराळे (वय 25, मूळ राहणार जत, सांगली) असे मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. याप्रकरणी वैभव कणे (वय-30, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश व संभाजी पिरंगुट येथे एका कंपनीत कामाला होते. सोमवारी पहाटे ते माणगावातून गोठवडे येथे दुचाकीवरून जात होते. पारखी वस्ती येथे एका टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. फौजदार महेश आबनावे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
वाकड, हिंजवडीत सोनसाखळी चोरीच्या घटना

व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या दोन महिलांचे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दिड लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. या घटना वाकड व हिंजवडीत रविवारी रात्री घडल्या.

वाकड येथील घटनेप्रकरणी 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी महिला वाकड येथील पलाश सोसायटी समोरून जात होती. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 38 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. हिंजवडी येथील घटनेप्रकरणी 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला बावधन येथील भगवती माईल्स्ट्रो इमारत येथून पायी जात होती. त्यांच्या गळ्यातील 1 लाख 12 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणी व मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेले. वाकड, हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!