व्हीएस न्यूज - चार वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतिने राज्यातील एस. टी. कर्मचारी वर्गाना नुकतेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. दापोडी येथिल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना गणवेश वाटपाने प्रारंभ करण्यात आला. गणवेषाच्या दर्जाबाबत कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. दापोडी येथिल मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना नुकतेच आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक रोहित अप्पा काटे, कार्यशाळा व्यवस्थापक रघुनाथ कांबळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार चाबुकस्वार यांच्या हस्ते प्रारंभिक स्वरुपात 19 कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. लवकरच इतर सर्व कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक कांबळे यांनी सांगितले. राज्यात पुणे नागपुर व औरंगाबाद या तीन शहरात महामंडळाच्या कार्यशाळा अस्तित्वात असुन पुणे दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण 600 तर विभागीय कार्यशाळेत 125 कर्मचारी कार्यरत आहेत. या तिन्ही कार्यशाळेत मिळुन एकुन दोन हजार कर्मचारी कार्यन्वित आहेत. राज्यातिल हे सर्व कर्मचारी मागिल चार वर्षा पासुन गणवेषापासुन वंचित ठेवण्यात आले होते. महामंडळाच्या वतिने गणवेश वाटप केले जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने गणवेश खरेदी करण्याची वेळ आली होती. मागिल वर्षी जुलै महिन्यात भर पावसात एस.टी. कामगार संघटनेसह इतर संघटनांनी प्रलंबित गणवेश वाटपासह इतर मागण्यासाठी भर पावसात महामंडळाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. कामगार संघटनांच्या वतिने या विरोधात प्रखर लढा उभारण्यात आला होता. या लढ्यास या गणवेश वाटपा अंतर्गत काही अंशी यश मिळाल्याचे काही कामगारांनी सांगितले. नविन गणवेश वाटप अंतर्गत वर्षाला दोन गणवेश वाटप केले जाणार असल्याने तसेच वाटप करण्यात आलेले गणवेशाचा दर्जा निकृष्ट असल्याने याबाबत कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यापुर्वी वर्षाला तीन गणवेशाचे कापड शिलाई खर्चासहित देण्यात येत होते. फोटो- वाटप नावाने फोटो ओळ ः दापोडी येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमा प्रसंगी कामगारांना संबोधित करताना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शेजारी नगरसेवक रोहित काटे व्यवस्थापक आर. कांबळे आदी मान्यवर.