व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या दोन महिलांचे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दिड लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. या घटना वाकड व हिंजवडीत रविवारी रात्री घडल्या.
वाकड येथील घटनेप्रकरणी 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी महिला वाकड येथील पलाश सोसायटी समोरून जात होती. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 38 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. हिंजवडी येथील घटनेप्रकरणी 57 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला बावधन येथील भगवती माईल्स्ट्रो इमारत येथून पायी जात होती. त्यांच्या गळ्यातील 1 लाख 12 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणी व मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेले. वाकड, हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.