व्हीएस न्यूज - 11 जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, काड्या, सिमेंट ब्लॉकने दहशत माजवित सहा गाड्यांची, घरांच्या काचांची तोडफोड केली. ही घटना रामनगरमधील सैनिक वसाहत परिसरात सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. चोवीस तासात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सागर दत्तु नलावडे (वय 21, रा. रामनगर), सागर गणेश भिसे (वय 19, रा. दत्तनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विनोद राकेश पवार, पवन विष्णू लष्करे, सुरज गायकवाड, अजय विश्वनाथ ओव्हाळ, वैभव ओव्हाळ, सागर सातकर, अभिषेक गाणगाव, निसार शेख, युवराज माने (सर्व राहणार चिंचवड) हे फरार आहेत. याप्रकरणी आण्णासाहेब माधवराव शिरसाट (वय-60 रा. रामनगर चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर परिसरात सोमवारी रात्री टोळक्यांनी परिसात दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड केली. या टोळक्याने तलवार, लाठ्या आणि सिमेंटच्या गट्टूच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सहा गाड्या फोडल्या असून 23 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादी यांच्याकडील अडीच हजार रुपये या टोळक्याने तलवारीच्या धाकाने काढून घेतले. पिंपरी पोलीस फरार आरोपींचा कसोशिने तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002