राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून सुसंस्कृत नागरिक घडतील.....चंद्रकांत सातकर
पिंपरी चिंचवड
2018-01-09
व्हीएस न्यूज - शहरी व उच्च शिक्षित युवकांना ग्रामिण भागातील जीवन जवळून अनुभवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांचे आयोजन ग्रामीण भागात केले जावे. या शिबिरांमधून युवकांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जावे. यामुळे उच्च शिक्षित, सुसंस्कृत नागरिक घडतील असा आशावाद पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांचे मावळ मधील वडेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सातकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी सरपंच गुलाब गभाले, उपसरपंच कुंडलिक लष्करी, राजेश खांडभोर, शंकर हेमाडे, विक्रम हेमाडे आदी उपस्थित होते. या शिबिरात डॉ. जयंत उमाळे, संजय लकडे, डॉ. एन.बी. चोपडे, डॉ. अंजना अरीकेरीमठ, सर्पमित्र अतुल सवाखंडे, विवेक सांबारे आदींनी मार्गदर्शन केले. सात दिवसांच्या या शिबिरात ग्राम स्वच्छता, संगणक दान व प्रशिक्षण, महिला सबलीकरण, शोषखड्डे, माजी विद्यार्थी मार्गदर्शन, मतदान जनजागृती, वृक्षारोपण, सलग समतर चर (सीसीटी), सापाबाबत समज - गैरसमज, बंधारा बांधणे, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समाज प्रबोधनपर बाहुली नाट्य व कार्यक्रम, वित्तीय साक्षरता अभियान, करीअर मार्गदर्शन, चिंतन, अंधश्रध्दा निर्मुलन, शेतक-यांसाठी लागणा-या कृषी ॲप बद्दल माहिती संकलन करणे, संशोधन व व्यक्तीमत्व विकासासाठी उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या आयोजनात पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते, गोरख भालेकर यांचे विशेष सहाय्य व मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, डॉ. शितल भंडारी, प्रशांत पाटील, प्रा.आर.टी जगताप, प्रा. निखिल सुरवाडे, प्रा. केतन देसले, प्रा. संतोष पाचारणे, विद्यार्थी प्रतिनिधी राज गांधी, किरण जाधव, कार्यालयीन कर्मचारी अस्मिता मोरे, नितीन कुरवार, सागर तामोरे, ईश्वर बो-हाडे, तुकाराम भसे आदींनी शिबिराचे आयोजन सहभाग घेतला होता.