Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
गोमातेच्या डोहाळ जेवणाचा रंगला सोहळा..... तिच्या आगमनाने बाफना कुटुंबास लाभला परिस स्पर्श

व्हीएस न्यूज - चिंचवड येथे गोमातेच्या डोहाळ जेवणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. येथील अशोक बाफना यांच्या घरी शनिवारी संध्याकाळी नटून थटून आलेल्‍या सुवासिनी... सनई-चौघड्याचे सुर अशा या मंगलमय वातावरणात कार्यक्रम झाला.

दरम्यान, उत्‍सवमूर्ती 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-माता यांनाही नटवले होते. अंगावर हिरव्या रंगाचा झुल... गळ्यात फुलांच्या माळा... पायात पैंजण... या दोघी मायलेकींचे कौतुक का तर दोघींच्या डोहाळ जेवणाची जंगी तयारी करण्यात आली होती. मग काय महिला मंडळाने या दोन जीवांच्या लक्ष्मी आणि गौरीच्या भाळी कुमकुम तिलक लावून औक्षण करून पुजा केली. त्‍यांची मोठ्या प्रेमाने ओटी भरली. मिष्ठान्नासह आवडते खाद्य त्‍यांना भरवण्यात आले.

हिंदु धर्मात गो-मातेला खूप महत्त्व आहे. जैन समाजातदेखील गो-मातेला अनन्य साधारण महत्त्व दिले असून तिचा सांभाळ केल्‍यास कुटुंबाला मिळणारे समाधान, ऊर्जा याविषयी महत्त्व सांगितले आहे. महाभारतामध्ये महर्षी गुरु वसिष्ठ ऋषींनी सुध्दा गो-मातेचे महत्त्व विषद केले आहे.

उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने बाफना कुटुंब 25 वर्षांपूर्वी चिंचवडगावात आले. हळूहळू व्यवसायात जम बसत गेला. जैन समाजात गाईला महत्त्व असल्‍याने अशोक बाफना यांना आपल्‍याकडेही एक गाय असावी. तिची सेवा करावी अशी इच्‍छा होती. परंतु तेशक्‍य होत नव्हते. तीन वर्षांपूर्वी गुरुमहाजांनी एका कार्यक्रमात गो-मातेचे महत्त्व समजावून सांगितले आणि बाफनांनी गाय घेण्याचा मनाशी निश्चय केला. वडील तेजमल, पत्नी जयश्री, मुलगा तुषार, मुलगी निवेदीता किशोर चोपडा, बंधु संतोष, सुनिता बाफना यांनी त्‍यास पाठिंबा दिला. मग त्‍यादृष्टीने तयारी सुरू झाली. संकरीत नको तर देशी गायच हवी असल्‍याने शोधाशोध सुरु झाली. नगर जिल्ह्यातील नेवासे येथून एक गाय आणि वासरू बाफना यांनी घेतले. गाय-वासराचे घरी जोरदार स्वागत झाले. त्‍यांचे नामकरण करून लक्ष्मी आणि गौरी अशी नावे ठेवली.

प्रत्येकजण आपापल्‍या परीने त्‍यांची सेवा करू लागले. हळूहळू बाफना यांना आपल्‍य उद्योग व्यवसायात बरकत होत असल्‍याचे निदर्शनास आले. आपली परिस्थिती बदलण्यात लक्ष्मी-गौरी या गो-मातेचा पायगुण असल्‍याची भावना अशोक आणि जयश्री यांनी व्यक्‍त केली. घरातील लहानथोर मंडहींची या गो-माते विषयी प्रेमभावना, आपुलकी दिवसेंदिवस वाढत आहे. लक्ष्मी-गौरीला वेळच्या वेळी खाद्य देण, पाणी देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे याकडे विशेष लक्ष दिले जाते. एक दिवस लक्ष्मी-गौरी या मायलेकी गरोदर असल्‍याची बातमी बाफना कुटुंबास समजली. आता आपलया परिस्थितीत बदल झाला आहे. स्थैर्य आले आहे. याचा विचार करून त्‍यांनी या दोघींचे होहाळ जेवण करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाची तयारी कुटुंबातील महिलांनी उचलली आणि एक सुंदर कार्यक्रम बाफना यांच्या घरी पार पडला. या कार्यक्रमास शरद बोथरा, मदनलालजी कर्नावट, किशोर चोपडा यांचे मोठे सहकार्य लाभले.

...Read More

V. S. News
पिंपळे सौदागरमधील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ

व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागर येथील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ आज करण्यात आला. पवना सहकारी बँक व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे तसेच सोसायटीतील पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.

बोरा पार्क सोसायटीतील रहिवास्यांनी MNGL गॅस कनेक्शन मिळणेबाबत मागणी केली होती. नगरसेवक बापु काटे व निर्मला कुटे यांनी तातडीने MNGL अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून बोरा पार्क सोसायटी मध्ये तातडीने MNGLगॅस लाईन सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचनांची दखल घेत MNGL मार्फत युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर बोरा पार्क सोसायटी मध्ये MNGL गॅस लाईन टाकून चार्ज ही करण्यात आली आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

...Read More

V. S. News
संमेलनाध्यक्ष पिंपरी चिंचवडकरांशी साधणार ‘मुक्त संवाद’

व्हीएस न्यूज - दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मंगळवार दि.२३ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड मोरवाडी येथे अॅटो क्लस्टर सभागृहात बडोदे येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.

यानिमित्ताने पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने त्यांचा प्रातिनिधिक सत्कार माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे हे संमेलनाध्यक्षांची मुलाखत घेणार आहेत. याप्रसंगी माजी आमदार मा.उल्हासदादा पवार, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहील,अशी माहिती समन्वयक नाना शिवले यांनी दिली.

...Read More

V. S. News
चिंचवडला रंगला संतुर बासरी वादनाचा तालाविष्कार

व्हीएस न्यूज - कान आणि मन समृद्ध व्हावे, डोळे दीपून जावेत, द्रूत होत जाणाऱ्या लयीने आपलीही धडधड वाढावी..अशा तालवाद्यांच्या जुगलबंदीने शनिवारी रसिकांच्या काळजाचा ‘ठेका’ चुकवला. संतुर व बासरी अशा तालवाद्यांची स्वरांची साथ मिळाल्याने अभूतपूर्व तालाविष्कार चिंचवड येथे घडला.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नव्या पिढीच्या कलाविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. निमित्त होते, पवनामाई संगीत महोत्सव ‘साद पवनेची’.. पवना नदी स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणूनच शनिवारी साद पवनेची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने केले होते.

या कार्यक्रमाचे हे पहिले वर्षच होते. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा शेजारील जिजाऊ उद्यान येथे सायंकाळी सहा वाजता ही जुगलबंदी रंगली. ही जुगलबंदी पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूर वादक धनंजय दैठणकर, व पं हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य बासरी वादक सुनील अवचट यांच्यात झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. प्रशांत देशमुख, जिल्हा प्रांतपाल नॉमिनी रो. रवी धोत्रे आणि आनंदी ग्राम संकल्पनेचे सेक्रेटरी रो. दैवशहाणे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, करुणा चिंचवडे, महापालिका ब प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप खोत, रोटरीयन स्वाती अभ्यंकर, अर्जुन वाडकर, शीतल अर्जुन वाडकर, पिंपरी टाऊनचे माजी अध्यक्ष चिंतामणी अभ्यंकर, डायरेक्टर प्रोजेक्ट रो. राम भोसले, रोटरीयन बाळासाहेब उ-र्हे, पालिकेचे अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उज्वल बोरा या चार वर्षाच्या चिमुरड्याने सिंथेसायझरवर राष्ट्रगीत सादर केले व उपस्थितांकडून वाहवा मिळविली. तत्पूर्वी आतापर्यंत रोटरी क्लबने केलेल्या कार्याचा आढावा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितला. रानजाई प्रकल्पाचे सचिव सोमनाथ मुसुडगे यांनी ७८ दिवसांच्या प्रवासाची माहिती सांगितली. तर वर्षा पांगारे यांनीही रोटरीच्या कार्याची माहिती सांगितली.

यावेळी पंडितजींनी राग भूपालीने बासरी वादनाला सुरुवात केली. जोड, आलाप, नऊ मात्रा, तीन ताल, सोळा मात्रा असा रागाचा विस्तार करत पंडितजींची बासरी रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. धनंजय दहिठणकर व सुनील अवचट यांनी विलंबित झपताल, द्रूत त्रिताल, आलाप, झाला, तानांवर संतूरची तार छेडत त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या वादनाने प्रभावित झालेल्या रसिकांनी वेळोवेळी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. आयोजित कार्यक्रमाला शहरातील रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त साथ दिली. असा कार्यक्रम रोटरीच्या वतीने वारंवार घेण्यात येईल तशा सूचना रसिकांना दिल्या जातील.

कार्यक्रमाचे संयोजन रोटरीयन दीपक वाल्हेकर, रोटरीयन संदीप वाल्हेकर, रोटरीयन सोमनाथ हरपुडे, रोटरीयन सुभाष वाल्हेकर, रोटरीयन सुधीर मरळ, रोटरीयन चिंतामणी सोंडकर, रोटरीयन मारुती उत्तेकर, रोटरीयन सुनील वाल्हेकर, रोटरीयन वसंत ढवळे, रोटरीयन गणेश बोरा, रोटरीयन जगन्नाथ फडतरे, रोटरीयन संतोष वाघ, रोटरीयन सचिन काळभोर, रोटरीयन गजानन चिंचवडे, रोटरीयन शेखर चिंचवडे, रोटरीयन स्वाती वाल्हेकर यांनी केले.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकरांकडून भाजपाची वकिली

व्हीएस न्यूज - शहरातील रस्ते कामांच्या ४२५ रुपये खर्चाच्या निविदा प्रक्रियेत स्पर्धा होऊ न देता पदाधिकार्‍यांना पोसण्याचे काम आयुक्त करीत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांना पदाधिकारी उत्तर न देता आयुक्त श्रावण हर्डीकर हे उत्तर देत असून, ३० कोटींची बचत झाल्याचे खोटे सांगत आहेत. ते सत्ताधार्‍यांची ‘वकिली’ करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. या प्रकरणी चौकशी न झाल्यास प्रसंगी अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, दत्ता साने, अजित गव्हाणे, नगरसेविका वैशाली काळभोर, डॉ. वैशाली घोडेकर, अनुराधा गोफणे, गीता मंचरकर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, फजल शेख आदी उपस्थित होते. विरोधी पक्षतेने बहल म्हणाले की, रस्ते कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी न करता आयुक्त सत्ताधार्‍यांची बाजू मांडत आहेत. या प्रकारे ते त्यांची वकिलीच करत असून, त्यांना ‘सुरक्षाकवच’ देत आहेत. त्या कृतीवरून त्यांची भ्रष्टाचारला मूक सहमती असल्याचे दिसते. पूर्वी १२ ठेकेदार १५ ते ३० टक्के कमी दराने कामे करीत होते. ‘डीएसआर’मध्ये सर्व्हिस टॅक्स व व्हॅट समाविष्ट होता. आता तो जाऊन एकत्रित ‘जीएसटी’ आला आहे. त्यामुळे निविदा ४५ ते ५० टक्के कमी दराने स्वीकारणे अपेक्षित होते. त्यानुसार ३० नव्हे, तर सुमारे ९० कोटी रुपयांची बचत व्हायला हवी होती. राष्ट्रवादीच्या काळात अजित पवार यांचा अधिकार्‍यांवर वचक होता. ठेकेदार दर कमी करून दर्जेदार काम करीत होते. सध्या पालकमंत्र्यांना कोणी विचारत नाही. महापौर, सभागृह नेते व स्थायी समिती अध्यक्षा यांच्या कोणताही ताळमेळ नाही. त्यांना केवळ आपल्या प्रभागापुरता ‘इन्टरेस्ट’ दिसतो, असा आरोप बहल यांनी केला.

पालिकेतील या भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे. आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांसह चर्चेस बोलाविल्यास आम्ही आवश्यक ते सर्व पुरावे व कागदपत्रे देऊ. त्यात सर्व स्पष्ट होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाच्या ५ नगरसेवकांवर ‘टक्केवारी’ गोळा करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व कामांमध्ये ‘टक्केवारी’ वसुली जोरात सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

प्रशांत शितोळे म्हणाले की, ४२५ कोटींच्या रिंगमध्ये मुळात निविदेचे एस्टिमेंट अधिक दराने तयार केले गेले आहे. आयुक्तांनी एकाच दिवशी सर्व फायलींवर सह्या केल्या. राष्ट्रवादीच्या काळात प्रत्येक फाईलवर कीस काढणारे मुख्य लेखापाल राजेश लांडे व मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर यांनी एकाही फायलीवर कोणताही शेरा मारलेला नसल्याने भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. टक्केवारी दिल्याशिवाय ठेकेदारांची बिल मंजूर केली जात नाहीत. सल्लागार नेमण्यास विरोध करणारेच आता एकसारख्या कामांसाठी वेगवेगळे सल्लागार नेमत आहेत. भ्रष्टाचार होत असल्याचे उघडपणे दिसत असूनही, पालकमंत्री पुरावे मागत असल्याबद्दल शितोळे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

समाविष्ट गावांमध्ये प्रथमच ४२५ कोटींचे रस्ते विकसित करीत असल्याचे फ्लेक्स लावून भाजपा श्रेय लाटत आहे; मात्र अद्याप जागाच ताब्यात नसून, निधीची तरतूद नाही. केवळ मंजुरी देऊन नागरिकांच्या निव्वळ फसवणुकीचा प्रकार आहे. प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल हेच सांगत येत नाही, असा आरोप नगरसेवक दत्ता साने यांनी केला. केवळ ‘टक्केवारी’ लाटण्यासाठी या कामांना मंजुरी दिली गेली आहे. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी निविदा न भरण्याचा दम ठेकेदारांना देत असल्याचे रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
दगड डोक्यात घालून तरुणाचा निर्घृन खून


व्हीएस न्यूज - डोक्‍यात दगड घालून एका तरुणाचा निर्घृन खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड, अंजठानगर येथील पत्राशेडमध्ये घडली.
अमित पंडीत कांबळे (वय 25, रा. अजंठानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हा बेरोजगार होता. शनिवारी सायंकळी साडेपाचच्या सुमारास अज्ञातांनी अंजठानगर येथील पत्राशेडमध्ये डोक्‍यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपींच्या शोधासाठी निगडी पोलिसांची दोन पथके रवाना केली असल्याची माहिती निगडी पोलिसांनी दिली.
...Read More

V. S. News
पिंपरीत प्रदर्शनात नागरिकांची तोडफोड

व्हीएस न्यूज : मोफत घरांची जाहिरात देऊन भरवलेल्या प्रदर्शनात संतप्त नागरिकांनी तुफान तोडफोड केली. पिंपरीतील महापालिकेच्या ऑटोक्लस्टरमध्ये हे प्रदर्शन भरले होते. प्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर येथे केवळ गृहकर्जाविषयी माहिती मिळत असल्याचे कळताच सकाळपासून रांगा लावून थांबलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांचा सहनशीलतेचा बांध फुटला. हातात येईल ते साहित्य घेऊन नागरिकांनी इथल्या टेबल, खुर्च्या फेकून देण्याबरोबरच गृहकर्जाची माहिती देणारी पोस्टर्स फाडली.पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून गोंधळ घालणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच संबंधीत कंपनीची चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.
टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यासाठी सुमारे २ हजार नागरिक या ठिकाणी आले असल्याचे सुत्रांकडून कळते. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या शासकीय गृहकर्जासंदर्भातही येथे माहिती दिली जाणार होती. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काहींनी मोफत घरे देऊ अशा जाहिराती केल्याचा आरोप येथे उपस्थित नागरिकांनी केला आहे.
मोफत घरांच्या आशेने नागरिकांनी ऑनलाइन फॉर्म भरले होते. त्यांनी २५० रुपयेही खर्च केले होते. त्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठी गर्दीही केली होती. परंतू, प्रदर्शनात केवळ गृहकर्जाविषयी आणि बांधकाम व्यवसायकांबाबत माहिती मिळत असल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आणि येथे जमलेल्या ५०० ते ६०० नागरिकांनी धिंगाणा घालत तुफान तोडफोड केली.
...Read More

V. S. News
पिंपरीत ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार, देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड येथील रूपीनगर परिसरात एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वृद्ध महिला आणि तिचा ४९ वर्षीय मुलगा हे दोघे रुपीनगर भागात राहतात. १३ जानेवारीला या महिलेचा मुलगा कामासाठी बाहेर गेला होता. पीडित वृद्ध महिलेने घराचा दरवाजा आतून लावला होता. मात्र, अज्ञात इसमाने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि या वृद्ध महिलेवर बलात्कार केला. मुलगा घरी आल्यानंतर पीडित महिलेने त्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल होताच पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली यात महिलेवर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरकर हे याप्रकरणाचा तपास करत आहेत. पीडित महिलेच्या ४९ वर्षीय मुलाचे लग्न झालेले असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेचजण घरात राहात होते, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.

...Read More

V. S. News
पोलिसांच्या नजरेतून भाजपचे फरार नगरसेवक तुषार हिंगे यांची महापालिका सभेत हजेरी

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते फरार असून अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. मात्र, त्यांनी आज महापालिका सभागृहात दाखल होऊन हजेरी लावली आहे. फरार हिंगे महापालिकेच्या सभागृहापर्यंत पोहचतात पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

भाजप नगरसेवक हिंगे यांच्या विरुध्द पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी त्यांना पोलिसांकडून अजूनही अटक झालेली नाही. ते अद्याप फरार आहेत. मात्र, फरार असलेल्या हिंगे यांनी आज २० जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजता झालेल्या महापालिका सभेत उपस्थित राहून हजेरी लावली आहे.

दरम्यान, निगडी पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे म्हणाले की, तुषार हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तीन महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून ते सध्या फरार आहेत.

तुषार हिंगे फरार असताना महापालिकेच्या सभागृहापर्यंत पोहचतात. मात्र, पोलीस यंत्रणा हिंगे यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. याबाबच आश्‍चर्य व्यक्त केले आहे. हिंगे अजून किती दिवस पोलिसांपासून फरार राहणार, असा प्रश्‍न देखील उपस्थित होतो आहे.

...Read More

V. S. News
मेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. ‘आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,’ अशा शब्दांत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे, आता मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असे दोन मार्ग विकसित केले जाणार आहेत. मात्र, पिंपरीचा मार्ग निगडीपर्यंत हवाच, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी निगडीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) केल्या आहेत. तसेच, त्यासाठीचा निधी देण्याची तयारी पिंपरी चिंचवड महापालिकेने दाखवली होती. मात्र, पिंपरीतील पहिल्या मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजन सोहळ्यात मेट्रोचा विस्तार सध्या शक्य नसल्याचे स्पष्टीकरण बापट यांनी दिले. डीपीआर तयार होऊन त्याला केंद्र-राज्याची मान्यता घेण्यात बराच कालावधी जातो. त्यामुळे, सध्या हे काम पूर्णत्त्वास जाऊ दे, त्यानंतर विस्ताराकडे पाहू, अशी टिप्पणी त्यांनी केली.

...Read More

V. S. News
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती – श्रीरंग बारणे

व्हीएस न्यूज - पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. मंत्री पुरी यांनी हे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांना देखील पाठविले आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली होती. मंत्री पुरी यांनी महापालिका सर्वाधिक आर्थिक सहभाग उचलण्यास तयार असेल तर पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे सांगितले होते. मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारने संमती दर्शविली आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याबाबत राज्य सरकाराने उचित कारवाई करावी, असे पत्र त्यांनी राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, ”केंद्र सरकारच्या वतीने पुणे महानगर क्षेत्रातील सार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्र.१ स्वारगेट ते पिंपरीला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्येच निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुरु व्हावी, ही पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत मी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांना पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याची विनंती केली होती”.

”पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे मेट्रो निगडीपर्यंत नेण्याबाबतचा निर्णय आता राज्य सरकारच्या कोर्टात आहे”, असेही बारणे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती केली आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या विचारात घेता. तसेच नागरिकांच्या मागणीचा विचार करुन पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या मार्गास राज्य सरकारने त्वरित मान्यता द्यावी. राज्यसरकारतर्फे आर्थिक मदत करुन महामेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोचा डीपीआर त्वरित तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे, असेही बारणे यांनी सांगितले.

बारणे म्हणाले, ”मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची शहरवासियांची मागणी आहे. त्याला केंद्र सरकारने त्वरित मान्यता दिली आहे. पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. त्याला राज्य सरकारने मान्यता द्यावी. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत आर्थिक सहकार्य करावे. काही आर्थिक भार पिंपरी चिंचवड पालिका पेलेल. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. चालू कामात निगडीपर्यंतचे देखील काम मार्गी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा”.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!