Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
नागरी प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष बैठका – एकनाथ पवार

व्हीएस न्यूज – महापालिकेच्या सर्व प्रभागातील नागरी प्रश्न व समस्या जलद गतीने मार्गी लावण्यासाठी सर्व प्रभाग स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तर बैठकीत पदाधिकारी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी केलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत व प्रभागातील प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज अ प्रभागात आयोजीत करण्यात आलेल्या प्रभागस्तरीय विशेष बैठकीमध्ये ते बोलत होते.

अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य राजू मिसाळ, जावेद शेख, अमित गावडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, विशाल कांबळे, देवाण्णा गट्टूवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम.एम.शिंदे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे यासह प्रभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत पाणी पुरवठा, जलनि:सांरण, विद्युत पोल व एलईडी दिवे, अनधिकृत बांधकामे व नळ जोडणी, स्वच्छता, आरोग्य, घंटा गाडी, पाणी टँकर, भटकी कुत्री, हॉकर्स व हॉकर्सझोन, फुटपाथ व त्यावर लावण्यात येणारे ब्लॉक, महापौर निवास, वृक्ष गणना, पशु दफन भूमी, ड्रेनेज लाईन, ड्रेनेज चोकप, साठलेला कचरा, राडारोडा, भिकारी निवारा केंद्र, मोकळ्या जागेवर होणारे अतिक्रमण, आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, शहरातील सर्वभागात मुबलक पाणी पुरवठा होणे कामी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात पाणी वितरणा कामी किमान एक टँकर उपलब्ध करुन देण्यात यावा. प्रभागात अनधिकृत बांधकामे व अनधिकृत नळ जोडनी होऊ नये याबाबत अधिकारी व नगरसदस्यांनी काळजी घ्यावी. प्रभाग स्वच्छतेबाबात आरोग्य विभागाने तर रस्त्यावरील राडारोडा उचलणे बाबत स्थापत्य विभागाने दक्षता घ्यावी. प्रभाग स्तरावरील बैठकीत मांडण्यात आलेले प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष बैठकांचे आयोजन सर्व प्रभागांमध्ये केले जाणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.

स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, शहरात वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असून शहरातील पशु दफन भूमी सुस्थीतीत असणे गरजेचे आहे. तसेच शहरात नव्याने पशु दफन भूमी बांधणे आवश्यक आहे. शहरातील सर्व भागात समान पाणी पुरवठा होणे कामी तातडीने कार्यवाही करण्यात यावी असेही त्या यावेळी म्हणाल्या.

शहरात वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा शहरात बेगर शेल्टर योजना राबविण्यात यावी. तसेच प्रभागातील प्रलंबीत कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतच्या सुचना यावेळी उपमहपौर शैलजा मोरे यांनी केल्या.

अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे यांनी प्रभागातील आरोग्य प्रश्न गंभीर असून ड्रेनेजचे चोकअप तातडीने काढण्यात यावे. साठलेला कचरा व राडा रोडा तातडीने उचलण्यात यावा. चालु असणाऱ्या स्थापत्य विषयक कामाच्या ठिकाणी कामाची सुरुवात, मुदत व येणारा खर्च आदी बाबत वर्णन असणारा फलक लावण्यात यावा. प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा पदपथा वरील अतिक्रमणे काढण्यात यावीत. पालिकेच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण थांबवावे. प्रभागात सर्व ठिकाणी एलईडी दिवे लावण्यात यावेत, अशा सुचना केल्या. प्रभागातील पाईप लाईनसाठी खोदलेले खड्डे बुजवण्यात यावे, अपुर्ण ड्रेनेजचे काम पुर्ण करण्यात यावे. विद्यानगर मध्ये असलेल्या महापालिकेच्या सांस्कृतीक भवनांवर नियंत्रन असावे अशा सुचना नगरसदस्या अनुराधा गोरखे यांनी यावेळी केल्या.

...Read More

V. S. News
ज्येष्ठ महिलेचे एक लाखांचे मंगळसुत्र हिसकावले

व्हीएस न्यूज - दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना खडकी रेल्वे स्टेशन मागे बोपोडीत गुरूवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. प्रकरणी 63 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या गुरूवारी दुपारी आपल्या मैत्रींच्या घरी रिक्षाने गेल्या होत्या. बोपोडी येथे त्या रिक्षातून उतरल्या. दुचाकीवरून त्यांच्याजवळ दोघे आले. पत्ता विचारण्याचा बहाणा करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 94 हजार 500 रूपयांचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. फौजदार एस. व्ही महाडिक अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
नर्सची गळफास घेवून आत्महत्या

व्हीएस न्यूज - एका नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून तीन दिवसांपूर्वी तिने नैराश्येतून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भारती भिमरावजी ठाकरे (वय-32 रा. सुखवानी कॉम्प्लेक्स, भोसरी मूळ रा. अमरावती) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे या भोसरीतील एका खासगी रूग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. रूग्णालयाच्या फ्लॅटमध्येच त्या राहता होत्या. त्या अमरावती येथील रहिवाशी होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या. त्यातूनच त्यांनी तीन दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी. घरातून दुर्गीधी येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलीसांशी संपर्क साधला त्यानंतर हा प्रकार समोर आला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

व्हीएस न्यूज - कामानिमित्त भोसरीत वास्तव्यास आलेल्या नवविवाहित दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला. पिंकी प्रजापती (वय 17) तिचा पती हरीहर (वय 26 रा. गुळवेवस्ती, मुळ मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. एक महिन्यापूर्वीच ते भोसरीत राहण्यास आले होते. 'मैने हरीहर को खाने पे बुलाया लेकीन ओ आया नही, फोन किया लेकीन फोन भी उठाया नही, इसलिए मै तूझे छोड के जा रही हूँ' असे पिंकीने मृत्यूपुर्वी चिट्टित लिहिले आहे. दरम्यान, हरीहर हा घरी आल्यानंतर त्याने घराचा दरवाजा उघडला असता त्याला पिंकीने गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार पाहून हरीहर जोरात ओरडला. त्याने पिंकीचा मृतदेह खाली काढला. त्याच ओढणीने त्यानेही गळफास घेवून आत्महत्या केली. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पिंपरीत सव्वा लाखांची घरफोडी

व्हीएस न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार तोळे सोने, 20 हजारांची रोकड असा एक सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी पिंपरीत उघडकीस आली. याप्रकरणी संपत सिताराम पवळ (वय-30, रा. कामगार नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी माहिती दिली. फिर्यादी पवळ हे 10 जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील लाख रूपये किंमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने, 20 हजारांची रोकड असा एक लाख 20 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
चालकाने बस दुभाजकावर चढवली

व्हीएस न्यूज - आकुर्डी स्टेशनकडून मनपाकडे जाणारी पीएमपीएएलचे स्टेअरिंग रॉडचा बोल्ट वळणावरच अचानक तुटला. त्यामुळे ब्रेकही लागत नसल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस दुभाजकावर चढवली. अन्‌ मोठा अनर्थ टळला. हा प्रकार सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुला शेजारी शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी स्टेशनकडून मनपाकडे जाणाऱ्या पीएमपीएमएलची बस (एमएच 14. 9984) सकाळी सव्वा सातच्या सुमारास सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुलाजवळून जात होती. बसचा स्टेअरिंग रॉडचा बोल्ट वळणावरच अचानक तुटला. त्यामुळे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक पांडुरंग सांगळे यांनी प्रसंगावधान दाखवत बस दुभाजकावर चढवून थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ ठळला. परंतू, बस दुभाजकावर चढल्यामुळे वाहक भागवत खेडकर यांच्या हाताला मुक्का मार लागला आहे. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी होते. यामुळे या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. "शिस्तीच्या नावाखाली कामगारांवर कडक कारवाई करणारे पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक तुकाराम मुंढे यांनी कर्तव्यदक्ष चालकाचा सत्कार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराजसिंह गायकवाड यांनी केली आहे.
...Read More

V. S. News
प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या यादीत पुणे विभागाचा पहिला

व्हीएस न्यूज - पुणे विभागाने प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला असल्याची माहिती पुण्याचे मुख्य प्राप्तीकर अधिकारी ए.सी. शुक्ला यांनी दिली आहे.
एकट्या पुणे विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात बजेटच्या ७५.५ टक्के कर भरला आहे. एकट्या पुणे विभागातून १६ जानेवारीपर्यंत ३७ हजार ३१० कोटी रुपये प्रत्यक्ष कर म्हणून जमा करण्यात आले आहेत. हा कर भरणा मागील वर्षापेक्षा २३.९८ टक्के एवढा आहे. पुणे विभागाचा चालू आर्थिक वर्षात देशभरातील कर भरण्यामध्ये वाटा ४.४ टक्क्यांनी वाढून ५.५ टक्क्यांवर पोहोचल्याचे ए. सी. शुक्ला यांनी म्हटले आहे. पुणे विभाग सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच विभागांमध्ये अव्वल ठरला आहे. पुणे विभागात मुंबई आणि विदर्भातील ११ जिल्हे वगळून उर्वरित महाराष्ट्राचा समावेश होता. वेगळा कर क्षेत्र मुंबई आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी आहे. याशिवाय पुणे विभागात कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कर भरण्यातही वाढ झाली. मागील वर्षाच्या ८०५२.२० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा पुणे विभागात ९८४६.१६ कोटी रुपये कॉर्पोरेट टॅक्स जमा झाला आहे.
...Read More

V. S. News
बारा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

व्हीएस न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या 12 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची गुन्हेगार कार्यप्रणाली (एमओबी) येथे त्यांच्या जागी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांची तर त्यांच्या जागी सतीश माने यांची बदली झाली आहे. भोसरीचे संपत भोसले यांची वाहतुक शाखेत, त्यांच्या जागी नरेंद्र जाधव, सांगवीचे अरविंद जोंधळे यांची विशेष शाखा, त्यांच्या जागी प्रसाद गोकुळे यांची बदली करण्यात आली आहे. यासह आदीच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
...Read More

V. S. News
ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलमध्ये कमीत कमी ऍप ठेवा

व्हीएस न्यूज - फेसबुक व्हॉंट्‌सअँपवर अधिक मित्र व + 9 सोडुन येणारे कॉंल टाळा, आपले अकाउंट हॅंक होऊ नये याकरिता आपला पासवर्ड मजबुत ठेवा, मोबाईलवर जेवढे अधिक अँप असतील, त्यामुळे कमीत-कमी ऍप ठेवा, अशा प्रकारचे महत्वपुर्ण व मोलाचे मार्गदर्शन पुणे रेल्वे पोलिसांतर्फे बुधवारी येथे आयोजित जनजागृती अभियाना प्रसंगी आले.
पुणे रेल्वे पोलिस व अँक्सिज बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या ट्रान्सफॉंर्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे व राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या सुचनेनुसार खडकी येथिल रेल्वे पोलिस मुख्यालयात बुधवारी सायबर गुन्हे विषयी जनजाग्रुती आभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक प्रभाकर बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलिस अधिक्षक तुषार पाटील, नंदकुमार घोरपडे, उप विभागिय पोलिस अधिकारी सोलापुर नंदकुमार भोसले, पोलिस निरिक्षक चंद्रकांत भोसले, अनिल दबडे, मौला सय्यद, खंडागळे, बाविस्कर, सहाय्यक पोलिस निरिक्षक समाधान पवार, पोलिस उपनिरिक्षक बबन गायकवाड, यासह अँक्सिज बॅंकेंचे वरिष्ठ अधिकारी अशोक जॉंन प्रसाद गायकवाड, टि.जे.महाविद्याल याचे उप प्राचार्य व्ही. पी. मोरे, प्रा.शुभांगी पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक काळात सोशल मिडीयासह इंटरनेटचा वापर व प्रभाव सर्व क्षेत्रात वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हे ही वाढु लागले आहेत. नागरिकांचा पैसा व खाजगी गोपनिय माहिती याला ही त्याची झळ बसु लागली आहे. या संकटाचा सामना करुन सायबर गुन्ह्यांना कशा प्रकारे आळा घालता येईल यासंबधी जनतेमध्ये जनजागृती करण्याचा ध्यास व संकल्प राज्य शासन व राज्य पोलिसांनी घेतला आहे. सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पालबांडे म्हणाले की, आपला मेंदु हाच आपला पासवार्ड व्यवस्थापक आहे. तो मजबुत ठेवा मोबाईलवर जेवढे अधिक अँप असतील तेवढा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मोजके व गरजेपुरतेच अँप वापरा. फेसबुक व व्हॉंट्‌सअपवर अधिक मित्र हानिकारक आहे. विचारपुर्वक फ्रेंड रिक्वेष्ट स्विकारा. सध्या एखाद्या अग्रक्रमांकीत कंपनी संस्थाच्या नावे खोटी आर्थिक लोभाची स्पॅंमद्वारे फसवणुक केली जाते. तेव्हा स्पॅंमवर विश्वास ठेवु नका. जेवढे आँन लाईन रहाल तेवढे आपले लोकेशन सेटींग होण्याची भिती असुन त्याद्वारे अकाऊंट हॅंक होण्याची दाट शक्यता आहे. फेसबुक व व्हाट्‌सअपवर आपल्या वैयक्तीक व घरगुती भावना शेअर करणे टाळा. + 9 सोडुन येणारे कॉंल अटेंड करु नका अशा प्रकारची महत्वपुर्ण माहिती व सुचना उपस्थितांना पालबांडे यांनी केली.
यावेळी पोलिस अधिकारी विद्यार्थी व नागरिकांनी काही प्रश्न व शंका उपस्थित केल्या. पालबांडे यांनी घडलेले सायबर गुन्हे व त्यांचा कशा प्रकारे छडा लावला याच्या उदाहरणासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अँक्सिस बॅंकेचे अधिकारी जॉंन यांनी ही बॅंकेतील अकाऊंट हॅंक करुन आर्थिक फसवणुक कशी केली जाते एटीएम कार्डचे पासवर्ड कशा प्रकारे हॅंक करुण आर्थिक फसवणुक केली जाते याची सविस्तर माहिती दिली. फसवणूक टाळण्याकरिता कशा प्रकारे सतर्रकता बाळगावी, याबाबत मार्गदर्शन केले. प्रस्तावाना व आभार वरिष्ठ पोलिस निरिक्षक (गुन्हे)अनिल दबडे यांनी मानले.

...Read More

V. S. News
पिंपरीतील व्यावसायिकाला 48 लाखांना गंडविले

व्हीएस न्यूज - ग्लोबल मार्केटिंग मॅनेजमेंट डीडब्ल्यू एलआयसी युएई कंपनीचे भारतातील आयातदार व वितरण बनविण्याचे अमिष दाखवून पिंपरीतील एका व्यावसायिकाला तब्बल 48 लाखांना गंडविले आहे. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. गिरीष तेजवाणी (वय-34, रा. वैष्णवीदेवी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल मार्केटिंग मॅनेजमेंट डीडब्ल्यू एलआयसी युएई कंपनीचे भारतातील आयातदार व वितरण बनविण्याचे अमिष दाखविले. तसेच एफ 'बिर्व्हेजेस' या कंपनीचे 2017-18 या कालावधीत मद्यार्क पेय न देता 48 लाखांची फसवणूक केली. फौजदार ठुबल अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
गाड्या फोडणाऱ्या समाजकंटकाला नागरिकांनी चोपले

व्हीएस न्यूज - गाड्या फोडून दुचाकीवरून पसार होणाऱ्या सात ते आठ टोळक्यापैकी एक जण खाली पडला अन्‌ नागरिकांच्या अलगद तावडीत सापडला. नागरिकांनी या समाजकंटकाला बेदम चोप देत पोलीसांच्या हवाली केले. ही घटना आळंदी-मोशी येथे बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.
अनिल गणेश थोटे (वय-25 रा. संत तुकारामनगर, भोसरी) असे नागरिकांनी चोप दिलेल्या समाजकंटकाचे नाव आहे. मारहाणीत तो किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिद्धेश बापुसाहेब वहिले (वय-27 रा. डुडुळगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोटे व त्याचे आठ ते नऊ साथीदारांनी वहिले यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या दोन मोटारींची लोखंडी गज, कोयता, काठ्याने तोडफोड करत दहशत माजवित जोर-जोरात शिवीगाळ करत गोंधळ घातला. आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दीला पाहून आरोपी तेथून पसार झाले. आरोपी अनिल दुचाकीवरुन जात असताना खाली पडला. नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. व भोसरी पोलीसांच्या हवाली केला.
भोसरी पोलीस अधिक तपास आहे.
...Read More

V. S. News
नोकरीच्या अमिषाने उच्चशिक्षित तरूणीची 26 हजारांची फसवणूक

व्हीएस न्यूज - नोकरी डॉट कॉम संकेतस्थळावरून उच्च शिक्षित तरूणीची माहिती घेवून एकाने तरूणीला नामाकिंत कंपनीतून बोलत असून 'तुमचे रिझुम शॉर्टलिस्ट झाले आहे' असे खोटे सांगितले. मुलाखतीपुर्वी टोकन रक्कम म्हणून 26 हजार रूपये पेटीएमवर जमा करण्यास सांगून फसवणूक केली. मानसी राजेंद्र ठाकुर (वय-23, रा. धनकवडी, पुणे) हिने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसीने नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले रिझुम अपलोड केले होते. ती नोकरीच्या शोधात होती. नोकरी डॉट कॉम संकेतस्थळावरून माहिती घेवून आरोपीने तिच्या मोबाईवर संपर्क साधला. एका नामाकिंत कंपनीतून बोलत असल्याचे सांगून आरोपीने 'तुमचे रिझुम शॉर्टलिस्ट झाले आहे' असे खोटे सांगितले. मुलाखतीपुर्वी टोकन रक्कम म्हणून वेळोवेळी 26 हजार 80 रूपये पेटीएम खात्यावर भरण्यास सांगून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले अधिक तपास करत आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!