व्हीएस न्यूज - चिंचवड येथे गोमातेच्या डोहाळ जेवणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. येथील अशोक बाफना यांच्या घरी शनिवारी संध्याकाळी नटून थटून आलेल्या सुवासिनी... सनई-चौघड्याचे सुर अशा या मंगलमय वातावरणात कार्यक्रम झाला.
दरम्यान, उत्सवमूर्ती 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-माता यांनाही नटवले होते. अंगावर हिरव्या रंगाचा झुल... गळ्यात फुलांच्या माळा... पायात पैंजण... या दोघी मायलेकींचे कौतुक का तर दोघींच्या डोहाळ जेवणाची जंगी तयारी करण्यात आली होती. मग काय महिला मंडळाने या दोन जीवांच्या लक्ष्मी आणि गौरीच्या भाळी कुमकुम तिलक लावून औक्षण करून पुजा केली. त्यांची मोठ्या प्रेमाने ओटी भरली. मिष्ठान्नासह आवडते खाद्य त्यांना भरवण्यात आले.
हिंदु धर्मात गो-मातेला खूप महत्त्व आहे. जैन समाजातदेखील गो-मातेला अनन्य साधारण महत्त्व दिले असून तिचा सांभाळ केल्यास कुटुंबाला मिळणारे समाधान, ऊर्जा याविषयी महत्त्व सांगितले आहे. महाभारतामध्ये महर्षी गुरु वसिष्ठ ऋषींनी सुध्दा गो-मातेचे महत्त्व विषद केले आहे.
उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने बाफना कुटुंब 25 वर्षांपूर्वी चिंचवडगावात आले. हळूहळू व्यवसायात जम बसत गेला. जैन समाजात गाईला महत्त्व असल्याने अशोक बाफना यांना आपल्याकडेही एक गाय असावी. तिची सेवा करावी अशी इच्छा होती. परंतु तेशक्य होत नव्हते. तीन वर्षांपूर्वी गुरुमहाजांनी एका कार्यक्रमात गो-मातेचे महत्त्व समजावून सांगितले आणि बाफनांनी गाय घेण्याचा मनाशी निश्चय केला. वडील तेजमल, पत्नी जयश्री, मुलगा तुषार, मुलगी निवेदीता किशोर चोपडा, बंधु संतोष, सुनिता बाफना यांनी त्यास पाठिंबा दिला. मग त्यादृष्टीने तयारी सुरू झाली. संकरीत नको तर देशी गायच हवी असल्याने शोधाशोध सुरु झाली. नगर जिल्ह्यातील नेवासे येथून एक गाय आणि वासरू बाफना यांनी घेतले. गाय-वासराचे घरी जोरदार स्वागत झाले. त्यांचे नामकरण करून लक्ष्मी आणि गौरी अशी नावे ठेवली.
प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांची सेवा करू लागले. हळूहळू बाफना यांना आपल्य उद्योग व्यवसायात बरकत होत असल्याचे निदर्शनास आले. आपली परिस्थिती बदलण्यात लक्ष्मी-गौरी या गो-मातेचा पायगुण असल्याची भावना अशोक आणि जयश्री यांनी व्यक्त केली. घरातील लहानथोर मंडहींची या गो-माते विषयी प्रेमभावना, आपुलकी दिवसेंदिवस वाढत आहे. लक्ष्मी-गौरीला वेळच्या वेळी खाद्य देण, पाणी देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे याकडे विशेष लक्ष दिले जाते. एक दिवस लक्ष्मी-गौरी या मायलेकी गरोदर असल्याची बातमी बाफना कुटुंबास समजली. आता आपलया परिस्थितीत बदल झाला आहे. स्थैर्य आले आहे. याचा विचार करून त्यांनी या दोघींचे होहाळ जेवण करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाची तयारी कुटुंबातील महिलांनी उचलली आणि एक सुंदर कार्यक्रम बाफना यांच्या घरी पार पडला. या कार्यक्रमास शरद बोथरा, मदनलालजी कर्नावट, किशोर चोपडा यांचे मोठे सहकार्य लाभले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002