व्हीएस न्यूज - राहत्या घरात एका तरूणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता चऱ्होलीत उघडकीस आली.
अतुल माणिक होणगिरे (वय 29, गणेशनगर, चऱ्होली) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरूणाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.