व्हीएस न्यूज- पिंपळे सौदागर येथील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ आज करण्यात आला. पवना सहकारी बँक व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे तसेच सोसायटीतील पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
बोरा पार्क सोसायटीतील रहिवास्यांनी MNGL गॅस कनेक्शन मिळणेबाबत मागणी केली होती. नगरसेवक बापु काटे व निर्मला कुटे यांनी तातडीने MNGL अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून बोरा पार्क सोसायटी मध्ये तातडीने MNGLगॅस लाईन सुरु करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिलेल्या सूचनांची दखल घेत MNGL मार्फत युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर बोरा पार्क सोसायटी मध्ये MNGL गॅस लाईन टाकून चार्ज ही करण्यात आली आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला.