व्हीएस न्यूज - डोक्यात दगड घालून एका तरुणाचा निर्घृन खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड, अंजठानगर येथील पत्राशेडमध्ये घडली.
अमित पंडीत कांबळे (वय 25, रा. अजंठानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हा बेरोजगार होता. शनिवारी सायंकळी साडेपाचच्या सुमारास अज्ञातांनी अंजठानगर येथील पत्राशेडमध्ये डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपींच्या शोधासाठी निगडी पोलिसांची दोन पथके रवाना केली असल्याची माहिती निगडी पोलिसांनी दिली.