Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
हातगाडीवर चहा पिणे इसमाला पडले महाग 

व्हीएस न्यूज - हातगाडीवर चहा पिऊन पायी जाणाऱ्या एका इसमाच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास चिंचवड येथे घडली.
अनिल नवघने (वय-40, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवघने बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास चिंचवड येथील युनाइटेड एजन्सीच्या पाठीमागील एका चहाच्या हातगाडीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा पिवून पायी जाताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांपैकी एकाने नवघने यांच्या गळ्यातील दोन लाख 50 हजार 940 रूपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
खडकीत  महिलेची सोनसाखळी लांबविली

व्हीएस न्यूज - पति व मुलीसह होळी पाहण्यासाठी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 40 हजार रूपये किमतीचे सोन्याची चैन मोटर सायकलवरुन आलेल्या चोरट्याने हिसका मारुन पळवुन नेले. ही घटना गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता औंध रोड बोपोडी येथे घडली. रोहित नायर (वय रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नायर हे गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता पत्नी निता व मुलीसह होळी पाहण्याकरिता औंधरोड एम. एम. रेस्टारंट शेजारील व्होडाफोन स्टोअर्स बस स्टॉंप जवळुन पायी चालले होते. पाठीमागून मोटर सायकलवरुन आलेल्या चोरट्याने निता यांच्या गळ्यातील 40 हजार रु. किमतीचे सोन्याची चैन हिसका मारुन पळवुन नेली. सोनसाखळी चोरीची खडकीतील महिनाभरातील दुसरी घटना आहे. खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
कामगारांनीच सात लाखांची औषधे चोरली 

व्हीएस न्यूज - होलसेल मेडिकलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी सात लाख रूपये किंमतीच्या 107 औषधांच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना 24 मे 2017 ते 14 जानेवारी 2018 या कालावधीत नेहरूनगर येथे घडली.
कामगार अजय निसरगंध (वय-22, रा. मोशी), लखन कांबळे (वय-21, रा. विठ्ठलनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज मोरे (वय-30, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार घुगे यांनी माहिती दिली. फिर्यादी यांचे नेहरूनगर येथे औषधाचे होलसेल दुकान आहे. या दुकानात आरोपी दोघेही कामाला आहेत. त्यांनी 24 मे 2017 ते 14 जानेवारी 2018 या कालावधीत सात लाख 33 हजार रूपये किंमतीच्या लाईफ सेव्हिंग या औषधांच्या 107 बाटल्यांची चोरी केली.
पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
टेम्पोतून अडीच लाखांची साखर चोरीला

व्हीएस न्यूज - रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पोतून चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीची साखरेची 50 पोती चोरून नेली. ही घटना बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ताथवडे येथे घडली.
इंद्रकुमार गुप्ता (वय-62, रा. गंगाधाम मार्कटयार्ड, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांनी द्रारूंबे, कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यातून 50 किलो वजनाची 50 पोती साखर ( एमएच 14 बीजी 0730) या टेम्पोतून साखर आणली होती. बुधवारी पहाटे टेम्पो ताथवडे येथील बालाजी महाविद्यालयाजवळ पार्क केला होता. चोरट्यांनी टेम्पोतील अडीच लाख रूपये किंमतीची 50 पोती साखर चोरून नेली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
आकुर्डीत रेल्वे रूळ गॅगमनला मारहाण

व्गीएस न्यूज - 'रेल्वे लाईन ओलाडू नको' असे सांगणाऱ्या एका रेल्वे रूळ गॅगमनला एकाने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.
सुनिल देविलाल चनाल (वय-34, रा. दळवीनगर, चिंचवड) याच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे रूळ गॅगमन ठकसेन शेळके (वय-35, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके हे रेल्वेमध्ये गॅगमन म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी आकुर्डी स्थानकाजवळ ते काम करत होते. चनाल हे रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. फिर्यादी शेळके यांनी आरोपीला रेल्वे रूळ ओलांडू नका असे सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपीने फिर्यादीला अरेरावीची भाषा करत मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चनाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
होळी खेळताना विद्यार्थ्याचा स्कूलबसमधून पडून मृत्यू

व्हीएस न्यूज - होळी खेळताना एकमेकांना रंगांचे फुगे मारताना स्कूलबसमधून तोल जाऊन एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली. बस चालकाने हलगर्जीपणा केल्यामुळे त्याला दिघी पोलीसांनी अटक केली आहे.
राज सतीश कांबळे (वय 14, रा. साई निकेतन, लक्ष्मीनारायण नगर, वडमुखवाडी, चऱ्होली) असे बसमधून पडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बबन जालींदर विटेकर (वय-41, रा. काटेवस्ती, चोवीसावाड) असे अटक केलेल्या स्कूल बस चालकाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर स्कूलबस चालक विटेकर मुलांना घरी सोडविण्यास जात होता. मुले बसमध्येच होळी खेळण्यात मग्न होते. मित्रांना रंग लावण्याच्या नादात राजचा तोल गेल्याने तो बसमधून खाली पडला. बसचे पाठीमागील चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बस चालकाने हलगर्जीपणा केल्यामुळेच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करून दिघी पोलीसांनी बस चालकाला अटक केली आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
आमदार लांडगे रुग्णालयात दाखल....

व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती निवडीमध्ये समर्थकांना संधी देण्यात अपयश आल्यामुळे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचा ताणतणाव वाढला आहे. परिणामी, प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने आमदार लांडगे यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. स्थायी समिती निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. स्थायी समिती सभापतीपदी आमदार लांडगे समर्थक राहुल जाधव यांना संधी मिळावी म्हणून लांडगे गट आग्रही होता. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड यांना सभापतीपदाची संधी दिली आहे.

दरम्यान, स्थायीसाठी तीव्र इच्छुक असलेल्या नगरसेवक राहुल जाधव यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच, आपल्या गटातील नगरसेवकाला डावलले याचा संताप व्यक्त करीत आमदार लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे यांनीही राजीनामा दिला. विशेष म्हणजे, महापालिका क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे आमदार लांडगे यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले होते. परिणामी, अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत आमदार लांडगे यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

...Read More

V. S. News
महापौर नितीन काळजे यांच्यासह शितल शिंदे आणि राहुल जाधव यांचा राजीनामा

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून बरेच महाभारत घडले आहे. आमदार महेश लांडगे गटाला अध्यक्षपदावरून डावलल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीन काळजे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. तर लांडगे समर्थक राहुल जाधव यांच्यासह जुने निष्ठावंत शितल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षनेते तसेच शहराध्यक्षांकडे देऊन आपली नाराजी जाहिर केली आहे.

स्थायी अध्यक्षपदी भोसरीचे आमदार लांडगे समर्थक राहुल जाधव तसेच जुने निष्ठावंत शितल शिंदे यांना डावलून आमदार जगताप समर्थक ममता गायकवाड यांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळेच सर्व नाराजांनी राजीनामे दिले आहेत.

राजीनाम्याबाबत बोलताना महापौर काळजे म्हणाले की, शहराच्या स्थायी समिती सभापती पदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन मनापासून महापौर या पदाचा राजीनामा दिला आहे.

तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, सर्वच प्रमुख पदाधिकार्यांचे राजीनामे पक्षानामे घेतले असून अजून कोणताही स्विकारलेला नाही. लवकरच पक्षाची भूमिका स्पष्ट करू.

...Read More

V. S. News
शिवीगाळ करत असल्याचा जाब विचारल्याने मारहाण करत वाहनांची तोडफोड

व्हीएस न्यूज - रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करणाऱ्या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना या टोळक्याने कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली. दोन वाहनांचीही तोडफोड केली. ही घटना चिखली येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. विक्की काळे, संतोष कळमकर, सचिन तेली (सर्व रा. विद्यानगर, पिंपरी) यांच्यासह आणखी तिघांविरोधात निगडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समाधान नवनाथ खरात (वय 27, रा. हरगुडेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरगुडे वस्ती येथील एका गॅरेजजवळ शुक्रवारी सायंकाळी हे टोळके येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करीत होते. याबाबत समाधान खरात यांनी जाब विचारला असता चिडलेल्या टोळक्याने समाधान यांना कोयत्याने मारहाण केली. तसेच समाधान यांच्या मित्राला देखील मारहाण करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
माजी नगरसेवकाच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा

व्हीएस न्यूज - टोळक्यासह एकास मारहाण केल्याप्रकरणी महापालिकेच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात त्याच्या तीन साथीदारांसह चिंचवड ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत कोऱ्हाळे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. कोऱ्हाळे यांच्यासह चंद्या, प्रसाद जाधव आणखीन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सागर रमेश कोंडे (वय 42, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोऱ्हाळे हे मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी त्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. 2017 च्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला होता.
फिर्यादी कोंडे हे गुरुवारी रात्री आठच्या सुमारास काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी प्रसाद जाधव तिथे आले. त्याने तुम्ही येथे कशाला परत आलात, परत येथे आलात तर तुमचे हातपाय तोडून टाकेन अशी धमकी दिली. तसेच दुसऱ्या एकाने कोंडे यांच्या डोक्यात मारहाण केली. तर कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असे कोंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
ईशान्य भारतातील भाजप विजयाचा शहर भाजपच्या वतीने जल्लोष 

व्हीएस न्यूज - ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालॅंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे देशातील एकूण 20 राज्यांमध्ये भाजपची सत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शनिवारी पिंपरीतील आंबेडकर चौकात जल्लोष साजरा करून पेढे वाटण्यात आले. तसेच यावेळी गुलाल उधळून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
त्रिपुरा, नागालॅंड, मेघालय या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा शनिवारी निकाल लागला. त्यामध्ये त्रिपुरा आणि नागालॅंड या दोन राज्यांत भाजपने विजय मिळविला आहे. त्रिपुरा आणि नागालॅंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे भाजपची देशातील एकूण 20 राज्यांत आजमितीला सत्ता निर्माण झाली आहे.
यावेळी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, भाजप शहर सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश पदाधिकारी राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, अमर मुलचंदानी, महेश कुलकर्णी, स्थायीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका ममता गायकवाड, आशा शेंडगे, रवि लांडगे, कैलास बारणे, शैला मोळक, विजय लांडे, रामकृष्ण राणे आदी उपस्थित होते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!