21 गुन्हे उघड :23 लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हीएस न्यूज - घरफोडी आणि वाहनचोरी करणाया चार जणांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल गुन्हे उघडकीस आले असून 23 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
राजू शंभू देवनाथ (वय 19, रा. कृष्णानगर, हडपसर), मंगेश विजय चव्हाण (वय 22, रा. गोखलेनगर), मजहर नॅजो जमादार (वय 30, शिवाजीनगर), अल्ताफ उर्फ बचक्या पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. राजू देवनाथ, मंगेश चव्हाण व अल्पवयीन मुलगा असे तिघे मजहर याच्या रिक्षातून चोरी करण्यासाठी जात. तर बचक्या पठाण यांच्यामार्फत चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावत. चोरट्यांकडून सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, तीन रिक्षा, सहा दुचाकी, सहा डिजीटल वॅैमेरे, सात घड्याळे, सात मोबाईल, एक लॅनटॉप, एक एलईडी टीव्ही असा 23 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चिंचवड 6, सिंहगड 2, पिंपरी 1, तळेगाव 1, चतु:शृंगी 2, खडकी 2, एमआयडीसी 2, भोसरी 2, सांगवी 1, बंडगार्डन 1 असे एकूण 21 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये वाहनचोरीचे 4, घरफोडीचे 14 व इतर 3 या गुन्ह्यांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडून एक पिस्तुल, सहा जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002