व्हीएस न्यूज - होलसेल मेडिकलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी सात लाख रूपये किंमतीच्या 107 औषधांच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना 24 मे 2017 ते 14 जानेवारी 2018 या कालावधीत नेहरूनगर येथे घडली.
कामगार अजय निसरगंध (वय-22, रा. मोशी), लखन कांबळे (वय-21, रा. विठ्ठलनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज मोरे (वय-30, रा. गुजरनगर, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार घुगे यांनी माहिती दिली. फिर्यादी यांचे नेहरूनगर येथे औषधाचे होलसेल दुकान आहे. या दुकानात आरोपी दोघेही कामाला आहेत. त्यांनी 24 मे 2017 ते 14 जानेवारी 2018 या कालावधीत सात लाख 33 हजार रूपये किंमतीच्या लाईफ सेव्हिंग या औषधांच्या 107 बाटल्यांची चोरी केली.
पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.