व्हीएस न्यूज - पिंपरीगावातील शशिकांत सोपानराव वाघेरे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज पहाटे निधन झाले, ते G.K.N. SINTER METALS PVT. LTD कंपनी मध्ये गेली ३० वर्षे काम करत होते. तसेच गेली १५ वर्षे ते कामगार युनियनचे पदाधिकारी होते, त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी, नातवंडे व भाऊ असा परिवार आहे, त्यांचे वय ६२ वर्षे होते. आज सकाळी ११.०० वाजता पिंपरीगावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे ते चुलते होते. तर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष वाघेरे यांचे ते वडील होते. गुरूवार दि.२९ मार्च रोजी सकाळी पिंपरीगावातील पवना नदीच्या घाटावर दशक्रिया विधी होणार आहे.
व्हीएस न्यूज - शुक्रवारी प्रदर्शित होणा-या ‘बबन’या मराठी चित्रपटात पिंपरी चिंचवड मधील जान्हवी कांबीकर या बालकलाकाराला छोटीसी भुमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ‘ख्वाडा’या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा ‘बबन’चित्रपट शुक्रवारी राज्यातील बहुतांश चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे बहुतांश शुटिंग रांजणगाव येथे झाले. कष्टकरी शेतक-यांच्या जीवनप्रवासावर आधारीत कथानक असलेल्या या चित्रपटात चिखली शरदनगर येथील अमृता विद्यालयात आठवी इयत्तेत असणारी जान्हवी कांबीकर हिने एमआयडीसीतील गरीब कामगार मुलीची भूमिका साकारली आहे. भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव हे मुख्य कलाकार आहेत. रांजणगाव येथे ३५ सेंटीग्रेड तापमानात भर उन्हात प्रथमच कॅमेरासमोर उभी राहिलेली जान्हवी म्हणाली मागील वर्षी बालेवाडी येथे या चित्रपटाच्या ऑडीशन्स झाल्या तेव्हा माझी‘भाऊकाकांनी’ निवड केली. ज्याप्रमाणे आपण घरी आई वडीलांशी बोलतो अगदी तसेच चित्रपटातील संवाद माझ्याकडून भाऊकाकांनी वदवून घेतले. माझी भुमिका यात छोटीशी असली तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहे. स्वप्निल पटेकर, नितीन वाघ हे देखील पिंपरी चिंचवड मधील कलाकार यात आहेत. कष्टकरी युवा शेतक-याच्या जीवनातील संघर्षमय वास्तव प्रवास आणि त्याला गुलाबी प्रेमाची झालर असे कथानक असलेल्या बबन चित्रपटातील स्थानिक कलाकारांचे काम पाहण्यासाठी प्रेक्षकांना शुक्रवारी २३ मार्चला चित्रपटगृहात जायला हवे असे ती म्हणाली.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्धकृती पुतळ्यास मेघडंबरी बसवा,अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
अमित बच्छाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी पेट्रोल पंम्पाच्या जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व चिंचवड पेट्रोल पंम्पाच्या जवळ आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. परंतु पुतळा परिसराची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे पालिकेचा आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तरी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात यावी. तसेच सदर पुतळ्यांना उत्कृष्ठ प्रतीची, दर्जेदार, आकर्षक मेघडंबरी उभारण्यात यावी, असे बच्छाव यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - आता पुण्यात रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ही मंजुरी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली असून दुचाकीसाठी तासाला २ ते ४ रूपये तर चारचाकी गाडीसाठी १० ते २० रूपये तासाला मोजावे लागणार आहे.
संपुर्ण शहरभर पे अँन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून शहराचे वेगवेगळे झोन त्यासाठी करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि क झोनमध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहे. दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी २ रूपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी ४ रूपये आकारण्यात येणार आहेत. तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी १० आणि २० रूपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. रात्री पार्किंगसाठी रात्री १० ते सकाळी ८ असा कालावधी असेल. एका दिवसासाठी १० रूपये आकारण्यात येतील. पुणे महापालिका प्रशासनाकडून शुल्क मोजनीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - आजकाल आपण गर्दी टाळावी म्हणून आवश्यक वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देतो. त्यात आता पेट्रोल पंपावरील गर्दी टाळण्याची सोय झाली असून ग्राहक आता घरपोच डीझेल मिळवू शकणार आहेत. सध्या ही सेवा पुणे शहरात सुरु झाली असून इंडिअन ऑइल कार्पोरेशन हि सेवा देत आहे. त्यांच्या ट्विटर अकौंटवर हि माहिती दिली गेली आहे.
काही दिवसापूर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाहनचालकांचा पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी जाणारा वेळ वाचवा म्हणून सरकार ग्राहकांना घरपोच इंधन पुरविण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार डीझेल घरपोच देण्याच्या सेवेला पेट्रोलियम व एक्सप्लोझीव सेफ्टी ऑर्गनायझेशनने मान्यता दिली आहे. पेट्रोलचा मानाने डीझेल कमी ज्वलनशील असल्याने सध्या डीझेल घरपोच दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. कालांतराने पेट्रोलसाठीही हि सेवा सुरु केली जाणार आहे.
व्हीएस न्यूज - नोकरी लावण्याच्या अमिषाने एका तरूणाची 60 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निगडी येथे नुकताच उघडकीस आला आहे. तरूणाचे वडील दिलीप चौधरी (वय-60, रा. वानवडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अण्णासाहेब पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत आरोपीने वेळोवेळी तरूणाकडून 60 हजार रूपये घेवून नोकरी न लावता फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पान टपरी चालक ज्येष्ठ महिलेच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला वाकड पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी साडेदहा वाजता डांगे चौक रोड, काळेवाडी येथे घडला. याबाबत 70 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मणसिग सुरजसिग बायसठाकुर (वय-40, रा. सुदर्शन कॉलनी, पिंपळे-निलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची काळेवाडी येथे कुणाल पान नावाने टपरी आहे. टपरीवर आलेल्या आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने त्याला प्रतिकार केल्याने मंगळसुत्र तुटून टपरीतच पडले. घाबरलेल्या आरोपींने धूम ठोकली. आरोपीला तात्काळ वाकड पोलीसांनी अटक केली. सहाय्यक फौजदार एम. आर. स्वामी अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - किरकोळ कारणावरून दोन सराईत गुन्हेगारांना मारहाण करत एकावर गोळीबार केला. ही घटना वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जयवंत भगवंत चितळकर (वय-30) आणि निलेश कोळपे (दोघेही रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चितळकर याच्यावर चार तर कोळपे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. चितळकरला चिंचवड पोलिसांनी डिसेंबर 2017 पर्यंत तडीपार केले होते. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी माहिती दिली. चितळकर आणि कोळपे वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौकात बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात पार्क केली होती. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडथळा येत होता. एका मोटार चालकाने रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले. यावरून मोटार चालक आणि जखमींमध्ये वाद झाला. काही वेळाने मोटार चालकाने साथीदारांना घेवून येत कोळपे व चितळकर यांना मारहाण केली. चितळकर याच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याच्या डाव्या दंडाला गोळी लागली आहे. घटनास्थळावर परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंखे आदींनी भेट दिली. फौजदार आर. बी. सोडनवार अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - साप्ताहीक सुट्टीच्या दिवशी उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येथिल परिसरात वर्दळीच्या ठिकाणी दोन ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील 56 हजार रुपये किंमतीच्या सोन्याची चैन दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी हिसका मारुन पळवुन नेल्याची घटना घडली. मागील तिन महिन्यातील सोन साखळी चोरीची खडकी पोलिस ठाणे हद्दीतील ही चौथी घटना आहे. मंगलम रामरत्तीनन (वय-67 रा.कॉंफी सेंटरा सोसायटी भाऊ पाटील रोड बोपोडी) व सुधा के.के.सोमन (वय -62 रा.गोयल शिंदे पार्क भाऊ पाटील रोड बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगलम या मैत्रीणीसह पावने पाच वाजता घरी जात असताना सोसायटी समोरील फुटपाथ शेजारील रस्त्यावरुन दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन पळ काढला. रात्री 8.35 वाजाता सुधा या घरी जात असताना सोसायटी समोर हे दोघे चोरटे दुचाकी वरुण आले व त्यांच्या गळ्यातील 16 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसका मारुन पळवुन नेली. दोन्ही घटना या उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या भाऊ पाटील रोड येथिल वर्दळीच्या ठिकाणी घडल्या. खडकी पोलिस ठाणे हद्दीतील सोनसाखळी चोरीची मगील तिन महिन्यातील ही चौथी घटना आहे. दुचाकीवरुन हेल्मेट घालुन सोनसाखळी चोरणाऱ्या या दोन चोरट्यांनी खडकी बोपोडी परिसरात धुमाकुळ घातला आहे. न पोलिसांना या आरोपींचा शोध घेण्याकामी अद्याप यश न आल्याने सर्वसामान्य सहीतवयोव्रुद्ध महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे या प्रकरणी म्हणाले की पोलिस आरोपींचा शोध घेतआहेत.
व्हीएस न्यूज - चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेले चेंजरी रिपोर्ट हे योग्य असून ते धर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले आहेत. त्यामुळे चिंचवड शिक्षण प्रसारक कार्यकारी मंडळाला धर्मदाय आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. निळकंठ चिंचवडे यांनी निवेदनाव्दारे दिली आहे. चिंचवडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाने सादर केलेले चेंजरी पोर्ट बोगस आहेत. मंडळाने कुठल्याही प्रकारची सुचना पत्र न देता बैठक घेतली. बैठकीला कोणीही हजर नव्हते. हजेरी पत्रक सुचनेची पोच आणि एनओसी या सर्व कागद पत्रांवर खोट्या सह्या करून चेंजरी रिपोर्ट केल्याची तक्रार सुरेश धोंडींबा चिंचवडे, सुर्यकांत नामदेव चिंचवडे, मुरलीधर सिताराम चिंचवडे, नानासाहेब बाबुराव चिंचवडे यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे सन 2010 मध्ये गेली होती. परंतू, सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची शहानिशा करून चेंजरी रिपोर्ट हे योग्य असून ते मंजुर केले आहेत. त्यामुळे चिंचवड प्रसारक कार्यकारी मंडळाला धर्मदाय आयुक्तांनी एक प्रकारे हिरवा कंदील दिला आहे. मंडळाच्या वतीने ऍड. मनोज वाडेकर, ऍड. संजय भळगट यांनी काम पाहिले,अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. निळकंठ चिंचवडे यांनी निवेदनाव्दारे दिली आहे.
व्हीएस न्यूज - गुढीपाडव्याच्या सणानिमित्त खरेदीसाठी पुण्यातील नगर रस्त्यावरील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमध्ये गेलेल्या तृतीयपंथी सोनाली यांना रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉलच्या महिला सुरक्षा रक्षकाने आपल्याला मॉल प्रशासनाच्या नियमावलीत तसा आदेश असल्याचे सोनाली दळवी यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
सोनाली म्हणाल्या, फिनिक्स मॉलमध्ये मी मित्रासोबत गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गेले होते. प्रवेशद्वाराजवळील महिला सुरक्षारक्षकाने मॉलमध्ये जात असताना मला पाहताच माझी तपासणी करण्यास टाळाटाळ केली आणि मला थांबण्यास सांगून तिने दुसऱ्या महिला सुरक्षारक्षकाला बोलावून घेतले. माझी हात न लावता त्या महिला सुरक्षारक्षकाने तपासणी करून मला प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता आमच्या मॉल व्यवस्थापन पॉलिसीमध्ये तृतीयपंथाच्या व्यक्तींना प्रवेश न देण्यास सांगितले आहे, असे मला सांगण्यात आले.
सोनाली या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या, मॉलमध्ये प्रवेश देण्यापासून मला रोखण्यात आले. मला याचे दुखः झाले असून या पुढील काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पाठपुरावा करणार. दरम्यान, याबाबत मॉलचे व्यवस्थापक सी. पी. पोरवाल म्हणाले, यापूर्वी आम्हाला तृतीयपंयाबाबत वाईट अनुभव आले होते. तसेच आम्ही त्यांना सुरक्षेसाठीच्या कारणास्तव थांबवून ठेवले होते. त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या ५ सदस्यांच्या जागेवर भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे यांची तर अपक्ष आघाडीच्या साधना मळेकर यांची निवड करण्यात आली. आजच्या सर्वसाधारण सभेत या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीतील सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ असतो. परंतु, सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्चित केली जातात. चिठ्ठीद्वारे भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती देखील झाली आहे.
चिठ्ठीतून वाचलेले भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच भाजपसोबत असलेले अपक्षांचे गटनेते कैलास बारणे स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कायम राहिले होते. परंतु, स्थायी समितीत पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी ‘ड्रॉ’ काढण्याच्या अगोदरच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या दहा आणि अपक्ष एक अशा ११ नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे घेतले होते.
स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये. यासाठी भाजपने चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. त्यामुळे पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्यासाठी घेतलेले चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती नगरसेवकांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी (दि.९) मंजूर केले होते.
त्यामुळे स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागांवर भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे या चार आणि अपक्ष साधना मळेकर यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकाचे नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिले. त्यानंतर संबंधीतांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर काळजे यांनी केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002