व्हीएस न्यूज - आता पुण्यात रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ही मंजुरी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली असून दुचाकीसाठी तासाला २ ते ४ रूपये तर चारचाकी गाडीसाठी १० ते २० रूपये तासाला मोजावे लागणार आहे.
संपुर्ण शहरभर पे अँन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून शहराचे वेगवेगळे झोन त्यासाठी करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि क झोनमध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहे. दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी २ रूपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी ४ रूपये आकारण्यात येणार आहेत. तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी १० आणि २० रूपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. रात्री पार्किंगसाठी रात्री १० ते सकाळी ८ असा कालावधी असेल. एका दिवसासाठी १० रूपये आकारण्यात येतील. पुणे महापालिका प्रशासनाकडून शुल्क मोजनीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002