व्हीएस न्यूज - गुढीपाडव्याच्या सणानिमित्त खरेदीसाठी पुण्यातील नगर रस्त्यावरील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमध्ये गेलेल्या तृतीयपंथी सोनाली यांना रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉलच्या महिला सुरक्षा रक्षकाने आपल्याला मॉल प्रशासनाच्या नियमावलीत तसा आदेश असल्याचे सोनाली दळवी यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
सोनाली म्हणाल्या, फिनिक्स मॉलमध्ये मी मित्रासोबत गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गेले होते. प्रवेशद्वाराजवळील महिला सुरक्षारक्षकाने मॉलमध्ये जात असताना मला पाहताच माझी तपासणी करण्यास टाळाटाळ केली आणि मला थांबण्यास सांगून तिने दुसऱ्या महिला सुरक्षारक्षकाला बोलावून घेतले. माझी हात न लावता त्या महिला सुरक्षारक्षकाने तपासणी करून मला प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता आमच्या मॉल व्यवस्थापन पॉलिसीमध्ये तृतीयपंथाच्या व्यक्तींना प्रवेश न देण्यास सांगितले आहे, असे मला सांगण्यात आले.
सोनाली या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या, मॉलमध्ये प्रवेश देण्यापासून मला रोखण्यात आले. मला याचे दुखः झाले असून या पुढील काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पाठपुरावा करणार. दरम्यान, याबाबत मॉलचे व्यवस्थापक सी. पी. पोरवाल म्हणाले, यापूर्वी आम्हाला तृतीयपंयाबाबत वाईट अनुभव आले होते. तसेच आम्ही त्यांना सुरक्षेसाठीच्या कारणास्तव थांबवून ठेवले होते. त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002