Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

व्हीएस न्यूज - कै.पांडुरंग धोडिंबा माकर प्रतिष्ठान व शेखर काटे युवा मंच यांच्या वतिने जागतिक आरोग्य दिनानिमित्त कै जगन्नाथ देवकर यांच्या स्मरणार्थ आरोग्य कर्मचाऱ्यांना 'आरोग्य सेवा गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे, प्रविण देवकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक माकर यांच्या हस्ते दापोडी येथे हुतात्मा भगतसिंग विद्यालय येथे पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यामध्ये सिद्धार्थ सातपुते, मंगल आरडे,बबिता जाधव, विमल गलांडे, आरती चंदा, लक्ष्मी भोसले, संगिता गायकवाड, सोनाली अडागळे, योगिनी निंबाळकर, भारती झाटे, दत्ता कांबळे, सुनिल देहाडे, मिना सोनवाल, उषा जीनवाल, रेखा गोहर, रमा बाराथे, शोभा नाईकनवरे यांना गौरविण्यात आले.
यावेळी आमोल गोरे, दिपक काटे, प्रमोद गायकवाड, अनिल कुलकर्णी, गुलाब आल्हाट, रवींद्र कांबळे उपस्थित होते.
दिपक माकर म्हणाले, पुढील वर्षी 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. सूत्रसंचालन दिपक काटे यांनी, तर आभार दिपक माकर यांनी मानले.

...Read More

V. S. News
कसबे, कोकाटे यांचे उद्या पिंपरीत व्याख्यान

व्हीएस न्युज - छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने संत तुकाराम नगर येथे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेबकसबे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे संयुक्तरित्या होणारे हा व्याख्यानसत्राचा कार्यक्रम संत तुकारामनगर येथील पंचशील बुद्धविहाराजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे.

या व्याख्यानमाचे उद्घाटन महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्या हस्ते होईल. स्वराज अभियानचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शहरात प्रथमच हे दोनदिग्गज वक्ते एकत्रितरित्या एका विचारमंचावर येणार असून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी विचारधारेच्या संस्था व संघटनेचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. जगदगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मणरानवडे, अशोक सर्वागीण विकास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोक शिलवंत, व मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

...Read More

V. S. News
अब्रू वाचविण्यासाठी महिलेची गॅलरीतून उडी

व्हीएस न्यूज - मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून अज्ञात आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने अब्रू वाचविण्यासाठी शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली.यामध्ये महिलेचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास रहाटणीतील महाराष्ट्रनगर येथे घडला.

याप्रकरणी संबंधित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी रात्री एकटीच घरामध्ये होती. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास अज्ञात आरोपी फिर्यादीच्या घरी बळजबरीने घुसला. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नकेला. तसेच महिलेशी अश्लील भाषा वापरली. अब्रू वाचविण्यासाठी महिलेने जीवाच्या आकांताने ओरडत आरोपीच्या तावडीतून सुटका करून शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये महिलेचा उजवा पाय फ्रॅक्चर झालाअसून डावा हाताच्या बोटाला मार लागला आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे, पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
नोटाबंदी, प्लॉस्टिक बंदी मग दारूबंदी कधी?

व्हीएस न्यूज - नोटाबंदी होते, प्लॉस्टिक बंदी होते मग महाराष्ट्रात दारू बंदी कधी करणार असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर यांनी केला आहे.

रूपनर यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दारूमुळे अनेक तरूणांचे जीवन उद्‌वस्त, काहींचे संसार धुळीस मिळाले आहेत. तर दारू पिऊन मोटार चालविल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. दारूमुळे महाराष्ट्रातील तरूण पिढी बरबाद होत असताना सरकार महसूल मिळतो, म्हणून दारूबंदी करत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. नोटा बंदी करता, प्लॉस्टिक बंदी करता मग दारूबंदी केली पाहिजे, अशी मागणी रूपनर यांनी केली आहे. तसेच दारूबंदी न केल्यास रूपनर यांनी स्वतः आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

...Read More

V. S. News
सांगवीत ज्येष्ठ नागरिकांचा भक्तीमय 'मॉर्निग वॉक' 

व्हीएस न्यूज - नवी सांगवीतील 20 जेष्ठ नागरिक दररोज सकाळी पहाटे साडेचारपासून फेमस चौक, शिवनेरी चौक, एम के चौक, गोविंद गार्डन, कोकणे चौकापर्यंत आठ किलो मीटरचा पायी प्रवास करतात. वाटेने गौळणी, भारुडे, खंडोबाची गाणी, देवीची गाणी, अभंग टाळ्या वाजवत चालत जातात.

आजच्या धकाधकीच्या जीवन शैलीमुळे बैठे कामाची सवय, मानसिक ताण तणाव यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. वयाच्या पन्नाशीतच अनेकांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. याचे गांभीर्य लक्षात घेवून 20 ज्येष्ठ नागरिक "हरिनाम गजरात नाही भय चिंता, ऐसें बोले गीता भागवत, या प्रमाणे लवकर उठून भगवंताचे नामस्मरण करत आम्ही चालतो असे आप्पाजी चव्हान यांनी सांगितले. गेल्या 15 वर्षा पासून नित्यनियमाने चालत असतांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जय श्रीराम म्हणून नमस्कार घालतो. सर्व महिला व पुरुषही आम्हाला नमस्कार घालत असल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.

यामध्ये बाबू चौधरी, जे. डी. पाटील, प्रमोद हींगाण, रघुनाथ कदम, अंबादास शहाने, हरीचंद्र ढिगळे, लिंबाजी थिटे, सदाशिव सावंत, वसंत पाटील, बाबु जंगम, जयसिंग पाटील, विठ्ठल देवकर, शिवानंद तालिकोटी, सूरेश कोंडाळकर, अंबादास शहाणे आदी ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात.

...Read More

V. S. News
पादचाऱ्याला तिघांनी लुबाडले

व्हीएस न्यूज - बसस्टॉपकडे पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जमिनीवर खाली पाडून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून नेला. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळेवाडी फाट्यावर ही घटना घडली असून यातील दोघा आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुकेश परिहार (वय-30 , रा. थेरगाव), असे लुबाडणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश महादेव चव्हाण (वय 20, रा. ज्ञानदीप कॉलनी, थेरगाव), गोविंद संताराम तुप (वय 21, रा. पानसरे कॉलनी, पडवळनगर, थेरगाव) आणि ऋत्विक शेलार यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चव्हाण आणि तुप या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुकेश मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळेवाडी फाट्यावरील पीएमपीएलच्या बसस्टॉपकडे पायी चालत जात होता.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा आरोपींपैकी एकाने धक्का देवून मुकेशला जमीनीवर पाडले. त्यानंतर त्याच्या पॅंटच्या पाठीमागील खिशाच्या पाकीटात असलेली 15 हजाराची रोख रोकड आणि 1 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल हॅंडसेट जबरदस्तीने घेवून पोबारा केला. आरोपी पळून जात असताना त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे जखमी अवस्थेतील दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले, तर एकजण फरार झाला. पोलिस उपनिरीक्षक रमेश केगार तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील ट्रकची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पुणे आळंदी रोडवर चहोली फाट्यावर गुरूवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा अपघात घडला. प्रशांत राजेंद्र कोतवाल (वय 21, रा. दाभाडे वस्ती, चहोली बुद्रूक) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. दिघी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. ए. कदम यांनी फिर्याद दिली आहे.

मयत प्रशांत आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. चऱ्होली फाट्याकडून चऱ्होलीगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तनिष्क ऑर्चिड सोसायटीच्या वळणावर तो आला. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकची जोरदार धडक त्याच्या दुचाकीला बसली. त्यात गंभीर जखमी झालेल्या प्रशांतचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक एस. जी. शेंडगे तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
वकिलाला मारहाण करून लुटणारी टोळी गजाआड

व्हीएस न्यूज - मोटारीस ओव्हरटेक करायला जागा दिली नाही म्हणून एका टोळक्याने वकिलाला 21 मार्च रोजी शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी कासारवाडी येथे मारहाण केली होती. सहा जणाच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळ्या आहेत. त्यांच्याकडून एका मोटारीसह साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

अतुल मुरलीधर नाईक (वय-23, रा. राधानगरी हौसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी), आकाश महादेव काळपांडे (वय-24, रा. सावंतनगर, शिवनगरी कॉलनी, दिघी), गोकुळ कृष्णा निखाडे (वय-22, रा.महाराष्ट्र कॉलनी, आळंदी रोड, भोसरी), शुभम बाबुराव तायडे (वय-19, रा. महादेव कॉलनी, आळंदी रोड, भोसरी), राजकुमार उमाजी डामसे (वय-20, रा. बनकर वस्ती, मोशी), जगदिश दिगंबर इंगळवाड (वय-18, रा. मोई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश वाघ (वय-34, रा. दळवीनगर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी वाघ मुंबई-पुणे महामार्गावरून मोटारीने जात होते. पाठीमागून आलेल्या एका मोटारीतील सहा आरोपींनी वाघ यांना ओव्हरटेक करण्यास जागा दिली नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी मारहाण केली होती. यातील आरोपींचा भोसरी पोलीस तपास करत असताना पोलीसांनी आरोपी दिघीतील शिवनगरी कॉलनी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून सहाही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल, सोन्याची चैन, 7 हजार 500रूपयांची रोकड, एक स्वीफ्ट मोटार असा 5 लाख 35 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त केला.

तसेच भोसरी पोलीसांनी अलंकार प्रेम कांबळे (वय-22, रा. इंदिरानगर, खडकी बाजार) या दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून 93 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रणोद कठोरे, काळुराम लांडगे, महादेव धनगर, विनायक म्हसकर, गणेश हिंगे, गणेश आव्हाळे आदींच्या पथकाने केली.

https://www.youtube.com/watch?v=wo1GtBzRIqY&feature=youtu.be

...Read More

V. S. News
दुचाकी चोरणारे त्रिकुट पोलीसांच्या जाळ्यात, 20 दुचाकी जप्त

व्हीएस न्यूज - भोसरी पोलीसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना संशयावरून पडकलेले तिघे सराईत दुचाकी चोर असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. त्यांच्याकडून 4लाखांच्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रदिप ऊर्फ फंट्या दत्तात्रय करवंदे (वय-23, रा. कान्हेवाडी, खेड), गणेश गोपाळ मेदगे (वय-22, रा. अवदर, खेड), गोट्या ऊर्फ कैलास बबन पारधी (वय-36, रा. ठाकरवाडी, कडूस, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार चामले यांच्यासह एक पथक आळंदी रोड परिसरात गस्त घालत होते. दोन स्लेंडर प्लस दुचाकीवरून तिघे संशयीतरित्या फिरताना पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. फौजदार चामले यांनी आरोपींना हटकताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पळून जाणाऱ्या आरोपीला पोलीसांनी पाठलाग करून पकडले. दुचाकींची कागदपत्रे मागितल्यानंतर आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. आरोपींना ताब्यात घेवून कसून चौकशी केल्यानंतर दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचे कबूल करत शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरलेल्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गिरीश चामले, सचिन चव्हाण, संदिप गवारी आदी पथकाने केली.

...Read More

V. S. News
पिंपरी कॅम्प मधील अनधिकृत बांधकामांना पिंपरी चिंचवड अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने अभय

व्हीएस न्युज - उच्चन्यायालयाच्या आदेशा नुसार पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी चिंचवड अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने धडक कारवाई करताना निदर्शनात येत आहे. परंतु एकीकडे कारवाई करताना अधिकारी दिसतात तर पिंपरी कॅम्प सारख्या ठिकाणी आर्थिक हितसंबंध जोपासून अनधिकृत बांधकामांना अभय देतानाचे निदर्शनात येत आहे. असे आरोप मातृभूमी महिला सेवाभावी सहकारी संस्थेचे अध्यक्षा सायराबानु शेख यांनी केला आहे.

व्हीएस न्युजचे प्रतिनिधी भानुदास गायकवाड यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या की, पिंपरी कॅम्प मध्ये अनधिकृत बांधकामाविषयी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या व्हाट्स अँप व पि. सी . एम .सी . तक्रार निवारण टोल फ्री क्रमांकावर मे.नंदा टेक्सटाईल (पिंपरी कॅम्प ,साई ड्रायफ्रूट च्या समोर 'बि' ब्लॉक १०/११ च्या समोर )त्याचप्रमाणे इंद्रायणी बँकेच्या शेजारील पाच गुंठ्या मध्ये अनधिकृत बांधलेल्या पत्र्याचे शेड विषयी संबंधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी निदर्शनात आणून देऊन देखील कुठलीच ठोस कारवाई केली जात नाही .उलट त्यांची पाठ राखण केल्याचे निदर्शनात येते अश्या शब्दांत सायराबानु शेख यांनी कडव्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

https://www.youtube.com/watch?v=Bo2p1eefN9w&t=1s

...Read More

V. S. News
गावठीकट्टे बाळगणारे तीन सराईत गुन्हेगार गजाआड

व्हीएस न्यूज - बेकायदेशीररित्या गावठी कट्टे बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतूसे आणि दोन दुचाकी असा साडेतीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चिंचवड येथील चिंतामणी चौकात करण्यात आली. दत्ता विठ्ठल आगलावे (वय-25, वंदावन कॉलनी, चिंचवड), विकास भाऊ कदम (वय-25, रा. औंढे खुर्द, लोणावळा) आणि किरण दत्तात्रय येवले (वय-25, रा. वाकसाई, बेहरगाव, मावळ), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक सतिश कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली. गुरुवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना दगडोबा चौक, चिंचवडे नगर येथे नामचीन गुंड येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार तिथे सापळा रचण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या दत्ता आगलावे आणि त्याचे साथीदार विकास कदम, किरण येवले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे प्रत्येकी 1 गावठी पिस्तुल आणि प्रत्येकी दोन जिवंत काडतुसे सापडली. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह 3पिस्तुल, 6 जिवंत काडतुसे असा साडेतीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुधाकर आवताडे, ऋषीकेश पाटील,विजयकुमार आखाडे, शिपाई चंद्रकांत गडदे, देवा राऊत, पंकज भदाणे, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके यांनी ही कामगिरी केली.

...Read More

V. S. News
कुटूंबात गैरसमज निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ – डॉ.सरोदे

व्हीएस न्यूज - टिव्ही, मोबाईलमुळे कुटूंबात संवाद दिवसेंदिवस कमी होत आहे. कुटूंबात वादावादी, गैरसमज निर्माण होण्याचे प्रमाण वाढले असून कौटुंबिक समस्यांवर मानसोपचारतज्ञ उत्तम मार्गदर्शक ठरत आहेत, असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. भारत सरोदे यांनी व्यक्त केले.

मोरवाडी म्हाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेमध्ये 'कौटुंबिक स्नेहबंध' या विषयावर डॉ. सरोदे पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस सरोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्याख्यानमालेचे आयोजक बी. आर. माडगुळकर, आर. आर आपटे उपस्थित होते. प्रिती देशपांडे,सिंधु खंडीशळे यांनी 'साबरमती के संत तूने कर दिया कमाल' हे गीत सादर केले. लोकरंजन, लोकप्रबोधन आणि लोकप्रतिवर्तन या हेतून महात्मा गांधी व्याख्यानमालेचे गेल्या सात वर्षांपासून आयोजन करण्यात येत असल्याचे बी. आर माडूगळकर यांनी सांगितले. उल्हास झिरपे यांनी आभार मानले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!