व्हीएस न्यूज - नोटाबंदी होते, प्लॉस्टिक बंदी होते मग महाराष्ट्रात दारू बंदी कधी करणार असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर यांनी केला आहे.
रूपनर यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दारूमुळे अनेक तरूणांचे जीवन उद्वस्त, काहींचे संसार धुळीस मिळाले आहेत. तर दारू पिऊन मोटार चालविल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. दारूमुळे महाराष्ट्रातील तरूण पिढी बरबाद होत असताना सरकार महसूल मिळतो, म्हणून दारूबंदी करत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. नोटा बंदी करता, प्लॉस्टिक बंदी करता मग दारूबंदी केली पाहिजे, अशी मागणी रूपनर यांनी केली आहे. तसेच दारूबंदी न केल्यास रूपनर यांनी स्वतः आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.