Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
लग्नाच्या अमिषाने तरूणीवर बलात्कार; प्रियकर गजाआड

व्हीएस न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर प्रियकराने बलात्कार केला. तरूणी गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वाकडमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. सूरज नामदेव नढे (वय-29, रा. वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर 24 वर्षी तरुणीने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारा सूरज नढे आणि पीडित मुलगी चिंचवडमध्ये एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सूरजने तरुणीला लग्नाचे आमिष वारंवार स्वतःच्या घरात, हॉटेलमध्ये घेवून जात तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. मार्च 2018मध्ये पीडित तरुणी सात आठवड्यांची गरोदर असल्याचे पुढे आले. त्यानंतर सूरज याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीने सूरजचे घर गाठले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारण्यास नकार देत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. अखेर या पीडित तरुणीने वाकड पोलिसांत तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. आढाव अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
भाजपाचे राष्ट्रवादीच्य ‘हल्लाबोल’ विरोधात सुडाचं राजकारण?

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आणि उद्या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पिंपळे सौदागर जगताप डेअरी चौक येथे लावण्यात आलेला अधिकृत फलक प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान ही कारवाई सुरू असल्याचे समजताच राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकृत फलक असताना कारवाई का करता असा सवाल त्यांनी अधिकार्यांना विचारला. त्यावेळी अधिकार्यांनी सारवासारवीची उत्तरे देत तो फलक पुन्हा लावल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर मात्र सत्ताधारी भाजपच्या सुडबुध्दीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.

नाना काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत फ्लेक्स उभारू नयेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र अधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे चुकीचे आहे. एकीकडे शहरात सर्रासपणे अनधिकृत फलक लावले जात असताना केवळ सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या फलकावर कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादीचा शहरात दोन दिवस हल्लाबोल मोर्चा आहे. त्याची धास्ती सत्ताधारी भाजपने घेतली आहे. आज जगताप डेअरी चौकात हल्लाबोलच्या अधिकृत फलकावर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. मात्र मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांना त्याचे कारणही योग्य पध्दतीने देता आले नाही. सत्ताधार्यांच्या दबावामुळेच ही कारवाई होणार होती. अखेरीस हतबल होऊन अधिकार्यांनी तो फलक पुन्हा लावला.

...Read More

V. S. News
आगामी विधानसभेसाठी शहर मनसेची मोर्चेबांधणी

व्हीएस न्यूज - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेत सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.

मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चिखले यांच्यासह पक्षाच्या शहर पदाधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षाचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी शहरातील मनसैनिकांची नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यापुढे शहरात जाणिवपूर्वक लक्ष घालणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे मनसे पदाधिका-यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागला आहे.

पक्षवाढीसाठी मनसेच्या विविध संघटनांची कार्यकारिणी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठीच सेनेच्या कार्यकारिणीतील विविध पदे रविवारी जाहिर करण्यात आले. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते पदाधिका-यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यामध्ये अक्षय नाळे (सचिव), अनिकेत प्रभु (उपशहर अध्यक्ष), अमित तापकीर (उपशहर अध्यक्ष), गौरव लोटलीकर (विद्यार्थी उपशहराध्यक्ष), प्रतिक शिंदे (विभाग अध्यक्ष), सचिन शिंदे (विभाग अध्यक्ष), बंटी कदम (विभाग अध्यक्ष),महेश येवले (विभागाध्यक्ष) आदी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवडला वालीच उरला नाही – अजित पवार

व्हीएस न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंन्ट्रेस नागपूरात आहे, तर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचा पुण्यात आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नांशी यांना काहीच देणंघेणं नाही.निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वानसे हे विसरलेत. निवडून दिलेल्या आमदारांचे शहरवासियांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे शहराला आता वालीच उरला नाही अशी टिका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे आयोजित हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार बापू पठारे, विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणूकीत वाटलं होतं की शहराशी अनेक वर्षे जवळकीचे नाते होते. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. महापालिका निकालाच्या वेळी जनता विकासाच्या मागे गेली नाही. जनतेने आमचा पराभव केला. शहरात होत असलेले बदल, कचरा समस्या, अनेकांचा हस्तक्षेप पिंपरी-चिंचवडकरांना मान्य आहे का?आयुक्तालयाचा निर्णय झाला. पण त्याचा उपयोग नाही. इथे दहशद असून सरकार, पालकमंत्री पावले उचलताना दिसत नाहीत. शहराला कोणी वाली राहिलेले नाही. रस्त्यांच्या टेंडरची घाई केली गेली. कालवा समितीच्या बैठकीला फक्त पालिकेचे आयुक्त होते. तुमच्या पिण्याच्या पाण्यासाठी बैठकीला हे हजर राहू शकत नाही. भीमा कोरेगावला कायदा सुव्यवस्था सरकारने राखली नाही. तिथे निष्पाप मुलाचा बळी गेला. घरे, दुकाने जाळली. त्यामागचा मास्टरमाइंड कोण, हे कळाले पाहिजे. बैलगाडा शर्यंतीबाबत खासदार, आमदार फक्त भावनांशी खेळत आहेत, अशी टिका त्यांनी केली.

देशाचे राजकारण पवारसाहेबांच्या अवती-भवती फिरत आहे. त्यांच्यासाठी आपले आमदार, खासदार वाढले पाहीजेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे घड्याळ चालले पाहिजे. शेतक-यांना सरकारने उध्वस्त केले. नीरव मोदी, ललित मोदी हजारो कोटी घेऊन गेले. देशात महागाई वाढली. रेशनींगला मका देतात. जगात महाराष्ट्रात पेट्रोल महाग आहे. आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे. मंत्रालय आता आत्महत्यालय झाले आहे. महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत बिकट अवस्था झाली आहे. उद्योगांना पोषक वातावरण नाही. भोसरीत मैदानाच्या आरक्षणात टप-या टाकून स्थानिक गुंड तेथे हप्ते गोळा करतात. शाळा काढण्याचा परवाना उद्योगपतींना दिला आहे. भारत कुठे स्वच्छ झाला ? हे सरकारने दाखवावे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. प्रशासनावर त्यांची पकड नाही. केंद्रात, राज्यात जंगलराज आले आहे.

सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैसातून सत्ता हे समिकरण सुरू आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकरापासून दिलासा देण्याची इच्छाशक्ती नाही. फडणवीसांना नागपूर, बापटांना पुण्याचे प्रेम आहे. बापट काहीही बोलतात. भ्रष्टाचाराने बरबटलेले, पण आव वेगळा आणतात. स्मार्ट सिटीचा पैसा किती आला ? पुण्यात कमळाबाई तिन नंबरला गेली. कुठं नेऊन ठेवलाय भारत, महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी ? हा प्रश्न उपस्थित करून शिरुरची जागा आलीच पाहिजे. जेवढी ताकद द्या. फायदा तुमचाच आहे. बेजबाबदार, नाकर्ते सरकार घालवू, असा निश्चय करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जयंत पाटील म्हणाले, विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं, लोकांनी भाजपला नव्हे तर मोदींना बघून मतदान केलं. चार वर्षात भाजपने दिलेली खोटी आश्वासने किती खरी झालीत हे जनतेला समजलेयं. जनतेला फसवलं की, जनता आता त्यांना सत्तेत राहून देणार नाहीत. चौकीदार बनवा असं सांगून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. मात्र विजय माल्या, निरम मोदी सारखे अनेक उद्याेगपती करोडों रूपये घेऊन फरार झालेत. मग कसली चौकीदारी करत होते. पावलो पावली थापा मारणारे सरकार आहे, खोटं बोलून सत्तेत आलेत. निवडणुकीपूर्वी केलेले एकही आरोप सिध्द करता आले नाहीत. १६ मंत्र्यांनी केलेले भ्रष्टाचारांना क्लिन चिट मुख्यमंत्र्यांनी दिली. उंदरात भ्रष्टाचार करणारे आमदार तुम्ही निवडून दिलेत. आता तुम्ही विचार करा, राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभी करा.

चित्रा वाघ म्हणाल्या, बेरोजगारी वाढलीय, घर कसं चालवायचं महिलांपुढे मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्यामुळे तरूण गुन्हेगारीकडे वळतोय. रेशन दुकानात धान्याचा पत्ता नाही. गँस महागलाय, स्वयंपाक करणं मुश्किल झालेय. महिलांवरील अत्याचार वाढलेत. कायदा आणि सुवव्यवस्था फक्त कायद्यावरच राहिलीय. या शहरावर अजितदादांनी भरभरून प्रेम केले. पिंपरी चिंचवड दादांचा आत्मा आहे. आज शहराचं चित्र बदललयं, घाणीचे साम्राज्य वाढलयं, नगरसेवक पालिकेत कचरा नेऊन टाकत आहेत. येणार्या निवडणूकीत परिस्थिती नक्कीच बदलणार आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, राज्याच्या कानाकोपर्यातून हल्लाबोल सभेला सुरूवात झाली. विकास काय असतो हे पिंपरी चिंचवडला बघितल्यावर होतं. अजितदादांच्या स्वप्नपूर्तीतून घडले होते. परंतू गेल्या तीन वर्षापासून पिंपरीचा विकास शोधतोय. राज्याच्या सुरक्षिततेचे तीन तेरा वाजलेत. सत्तेच्या मस्तीत आहेत, म्हणून पवार साहेबांवर टिका करू नका. कामगारांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न या सरकारची सुरू आहे. शेतकरी

...Read More

V. S. News
....तर राज्यभरातील55 हजार रेशनिंग दुकानदार व 47 हजार रॉकेल विक्रेतेसामूहिक राजीनामा देणार

व्हीएस न्युज - एक लाख रेशनिंग दुकानदारांच्या मुंबईतीलमोर्चाने राज्य सरकारला धडकी भरली आहे. त्यामुळेराज्य सरकारने आता या मागण्यांवर संघटनेशी चर्चेचीतयार दर्शविली आहे. या नियोजित चर्चेत रेशनिंगदुकानदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील55 हजार रेशनिंग दुकानदार व 47 हजार रॉकेल विक्रेतेसामूहिक राजीनामा देणार आहेत.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशनआणि राज्य महासंघ या रेशनिंग दुकानदारांचेप्रतिनिधित्व करणाऱ्या शिंखर संघटनेची राज्यस्तरियबैठक राज्य महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.6)पिंपरीत पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी काकासाहेब देशमुख म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकरिता मुंबईतील आझाद मैदानावर 19 मार्चला काढलेल्या मोर्चात राज्यभरातील एक लाख रेशनिंग दुकानदार सहभागी झाले होते. त्यामुळे राज्य सरकारला धडकीभरली असून, या दुकानदाराच्या संघटनांसोबत चर्चेचीतयारी आता सरकारने दर्शविली आहे. अन्नपुरवठा मंत्रीगिरीष बापट यांनी आमच्याशी थेट संपर्क न साधता,प्रसार माध्यम प्रतिनिधींशी केलेली चर्चा आम्हाला समजली आहे. मात्र, रेशनिंग दुकानदारांच्या हितासाठीआम्ही या चर्चेला तयार आहोत. सर्व गिऱ्हाईकांचे आधारकार्ड लिंक केल्याशिवाय ई-पॉस मशिनच्या माध्यमातून अन्नधान्य वितरण करण्यास आमचा अद्यापही नकारआहे.

रॉकेलचे वितरण बंद केल्याने इंधनासाठी राज्यभरात विविध ठिकाणची वृक्षतोड वाढल्याने अनेक ठिकाणचे भुप्रदेश ओसाड झाले आहेत. मात्र, सरकार रॉकेलचाकोटा वाढविण्या ऐवजी आता कोट्यवधी वृक्षलागवडीवर भर देत आहे, तरी सरकारला जाग येतनाही. हा शासकीय यंत्रणेतील विरोधाभास पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये तीनशे कोटींचा अन्नधान्य घोटाळा बाहेर आल्यानंतर रेशनिंग दुकानदारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र; कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेने सारख्या विरोधकांनी रेशनिंग दुकानदारांची बाजू प्रभावीपणे सभागृहात मांडल्याने या संपाला पाठबळ मिळाले. याशिवाय मोर्चातून दोन्ही संघटनांनी आपली ताकद दाखविली आहे. त्यामुळेच सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे, असे देशमुख म्हणाले.

या बैठकीला असोसिएशनचे राज्य खजिनदार विजयगुप्ता, महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष कैलास शर्मा,सांगली जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, मावळतालुकाध्यक्ष बाबुलाल नालबंद, वर्ध्याचे संजय देशमुखतसेच नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी जिल्ह्यांचे प्रतिनिधीउपस्थित होते.

सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती

राज्य सरकारकडून प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास रेशनिंग दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन्ही शिखर संघटनांचे 55 हजार रेशनिंग दुकानदार व 47हजार रॉकेल विक्रेते असे एकूण एक लाख दोन हजार सदस्यांनी सामुहिक राजीनामे दिल्यास राज्यभरातील सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा फटका राज्यभरातील लाखो शिधापत्रिकाधारकांना बसू शकतो.

पिंपरी : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशन आणि राज्य महासंघ या रेशनिंग दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिंखर संघटनेच्या राज्यस्तरिय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख.

अधिक माहितीसाठी संपर्क -

श्री. विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशन

मो. ९८२२३०००१४

https://www.youtube.com/watch?v=rHvOIl_TkBA&feature=youtu.be

...Read More

V. S. News
...तर खोटी आश्वासने दिल्यास मंत्रिपदही रद्द करा !

व्हीएस न्युज - खोटी बातमी दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द करण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढला होता. मग खोटी, फेक आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिपदे रद्द का होऊ नयेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकार सत्तेवर येण्यापुर्वी अच्छे दिन आने वाले है, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करने वाले है, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारस लागू केल्या जातील. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यात येईल, दोन कोटीबेरोजगारांना नोकऱ्या देण्यात येतील, अशी अऩेक खोटी आश्वासने देऊन मोदींनी सत्ता काबिज केली. महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तर दोन वर्षात पाच वेळा 24 हजार शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात फक्त आणि फक्त खोट्या घोषणा केल्या. त्यामुळे खोट्याबातम्या देणाऱ्या पत्रकाराची मान्यता रद्द करण्याचा कायदा करता तर मग खोटी आश्वासने दिल्यास मंत्रिपदही रद्द करण्याची मागणी बकाल यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
ट्रॅक्टरच्या धडकेत तरूणी ठार

व्हीएस न्यूज - भरधाव वेगातील ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये तरूणीचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तरूण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना कासारसाई येथील मुरकुटे वस्ती येथे 16 मार्च रोजी घडली.
सृष्टी सुभाष पाठक (वय-25, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे. आयुश खंडेलवाल (वय-24, रा. औंधगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयुष व सुष्टी 16 मार्च रोजी एकाच दुचाकीवरून जात होते. मुरकुटे वस्ती येथून जाताना भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सृष्टीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आयुश हा किरकोळ जखमी झाला. घटनास्थळी न थांबता ट्रॅक्टर चालकाने पोबारा केला. फौजदार ए. व्ही. बोराटे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

व्हीएस न्यूज - कै.पांडुरंग धोडिंबा माकर प्रतिष्ठान व शेखर काटे युवा मंच यांच्या वतिने जागतिक आरोग्य दिनानिमित्त कै जगन्नाथ देवकर यांच्या स्मरणार्थ आरोग्य कर्मचाऱ्यांना 'आरोग्य सेवा गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे, प्रविण देवकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक माकर यांच्या हस्ते दापोडी येथे हुतात्मा भगतसिंग विद्यालय येथे पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यामध्ये सिद्धार्थ सातपुते, मंगल आरडे,बबिता जाधव, विमल गलांडे, आरती चंदा, लक्ष्मी भोसले, संगिता गायकवाड, सोनाली अडागळे, योगिनी निंबाळकर, भारती झाटे, दत्ता कांबळे, सुनिल देहाडे, मिना सोनवाल, उषा जीनवाल, रेखा गोहर, रमा बाराथे, शोभा नाईकनवरे यांना गौरविण्यात आले.
यावेळी आमोल गोरे, दिपक काटे, प्रमोद गायकवाड, अनिल कुलकर्णी, गुलाब आल्हाट, रवींद्र कांबळे उपस्थित होते.
दिपक माकर म्हणाले, पुढील वर्षी 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. सूत्रसंचालन दिपक काटे यांनी, तर आभार दिपक माकर यांनी मानले.

...Read More

V. S. News
कसबे, कोकाटे यांचे उद्या पिंपरीत व्याख्यान

व्हीएस न्युज - छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने संत तुकाराम नगर येथे व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेबकसबे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे संयुक्तरित्या होणारे हा व्याख्यानसत्राचा कार्यक्रम संत तुकारामनगर येथील पंचशील बुद्धविहाराजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे.

या व्याख्यानमाचे उद्घाटन महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्या हस्ते होईल. स्वराज अभियानचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शहरात प्रथमच हे दोनदिग्गज वक्ते एकत्रितरित्या एका विचारमंचावर येणार असून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी विचारधारेच्या संस्था व संघटनेचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. जगदगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मणरानवडे, अशोक सर्वागीण विकास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोक शिलवंत, व मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

...Read More

V. S. News
अब्रू वाचविण्यासाठी महिलेची गॅलरीतून उडी

व्हीएस न्यूज - मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून अज्ञात आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने अब्रू वाचविण्यासाठी शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली.यामध्ये महिलेचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास रहाटणीतील महाराष्ट्रनगर येथे घडला.

याप्रकरणी संबंधित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी रात्री एकटीच घरामध्ये होती. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास अज्ञात आरोपी फिर्यादीच्या घरी बळजबरीने घुसला. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नकेला. तसेच महिलेशी अश्लील भाषा वापरली. अब्रू वाचविण्यासाठी महिलेने जीवाच्या आकांताने ओरडत आरोपीच्या तावडीतून सुटका करून शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये महिलेचा उजवा पाय फ्रॅक्चर झालाअसून डावा हाताच्या बोटाला मार लागला आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे, पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
नोटाबंदी, प्लॉस्टिक बंदी मग दारूबंदी कधी?

व्हीएस न्यूज - नोटाबंदी होते, प्लॉस्टिक बंदी होते मग महाराष्ट्रात दारू बंदी कधी करणार असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर यांनी केला आहे.

रूपनर यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दारूमुळे अनेक तरूणांचे जीवन उद्‌वस्त, काहींचे संसार धुळीस मिळाले आहेत. तर दारू पिऊन मोटार चालविल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. दारूमुळे महाराष्ट्रातील तरूण पिढी बरबाद होत असताना सरकार महसूल मिळतो, म्हणून दारूबंदी करत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. नोटा बंदी करता, प्लॉस्टिक बंदी करता मग दारूबंदी केली पाहिजे, अशी मागणी रूपनर यांनी केली आहे. तसेच दारूबंदी न केल्यास रूपनर यांनी स्वतः आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

...Read More

V. S. News
सांगवीत ज्येष्ठ नागरिकांचा भक्तीमय 'मॉर्निग वॉक' 

व्हीएस न्यूज - नवी सांगवीतील 20 जेष्ठ नागरिक दररोज सकाळी पहाटे साडेचारपासून फेमस चौक, शिवनेरी चौक, एम के चौक, गोविंद गार्डन, कोकणे चौकापर्यंत आठ किलो मीटरचा पायी प्रवास करतात. वाटेने गौळणी, भारुडे, खंडोबाची गाणी, देवीची गाणी, अभंग टाळ्या वाजवत चालत जातात.

आजच्या धकाधकीच्या जीवन शैलीमुळे बैठे कामाची सवय, मानसिक ताण तणाव यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. वयाच्या पन्नाशीतच अनेकांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. याचे गांभीर्य लक्षात घेवून 20 ज्येष्ठ नागरिक "हरिनाम गजरात नाही भय चिंता, ऐसें बोले गीता भागवत, या प्रमाणे लवकर उठून भगवंताचे नामस्मरण करत आम्ही चालतो असे आप्पाजी चव्हान यांनी सांगितले. गेल्या 15 वर्षा पासून नित्यनियमाने चालत असतांना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जय श्रीराम म्हणून नमस्कार घालतो. सर्व महिला व पुरुषही आम्हाला नमस्कार घालत असल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.

यामध्ये बाबू चौधरी, जे. डी. पाटील, प्रमोद हींगाण, रघुनाथ कदम, अंबादास शहाने, हरीचंद्र ढिगळे, लिंबाजी थिटे, सदाशिव सावंत, वसंत पाटील, बाबु जंगम, जयसिंग पाटील, विठ्ठल देवकर, शिवानंद तालिकोटी, सूरेश कोंडाळकर, अंबादास शहाणे आदी ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!