व्हीएस न्युज - एक लाख रेशनिंग दुकानदारांच्या मुंबईतीलमोर्चाने राज्य सरकारला धडकी भरली आहे. त्यामुळेराज्य सरकारने आता या मागण्यांवर संघटनेशी चर्चेचीतयार दर्शविली आहे. या नियोजित चर्चेत रेशनिंगदुकानदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील55 हजार रेशनिंग दुकानदार व 47 हजार रॉकेल विक्रेतेसामूहिक राजीनामा देणार आहेत.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशनआणि राज्य महासंघ या रेशनिंग दुकानदारांचेप्रतिनिधित्व करणाऱ्या शिंखर संघटनेची राज्यस्तरियबैठक राज्य महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.6)पिंपरीत पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी काकासाहेब देशमुख म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकरिता मुंबईतील आझाद मैदानावर 19 मार्चला काढलेल्या मोर्चात राज्यभरातील एक लाख रेशनिंग दुकानदार सहभागी झाले होते. त्यामुळे राज्य सरकारला धडकीभरली असून, या दुकानदाराच्या संघटनांसोबत चर्चेचीतयारी आता सरकारने दर्शविली आहे. अन्नपुरवठा मंत्रीगिरीष बापट यांनी आमच्याशी थेट संपर्क न साधता,प्रसार माध्यम प्रतिनिधींशी केलेली चर्चा आम्हाला समजली आहे. मात्र, रेशनिंग दुकानदारांच्या हितासाठीआम्ही या चर्चेला तयार आहोत. सर्व गिऱ्हाईकांचे आधारकार्ड लिंक केल्याशिवाय ई-पॉस मशिनच्या माध्यमातून अन्नधान्य वितरण करण्यास आमचा अद्यापही नकारआहे.
रॉकेलचे वितरण बंद केल्याने इंधनासाठी राज्यभरात विविध ठिकाणची वृक्षतोड वाढल्याने अनेक ठिकाणचे भुप्रदेश ओसाड झाले आहेत. मात्र, सरकार रॉकेलचाकोटा वाढविण्या ऐवजी आता कोट्यवधी वृक्षलागवडीवर भर देत आहे, तरी सरकारला जाग येतनाही. हा शासकीय यंत्रणेतील विरोधाभास पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये तीनशे कोटींचा अन्नधान्य घोटाळा बाहेर आल्यानंतर रेशनिंग दुकानदारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र; कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेने सारख्या विरोधकांनी रेशनिंग दुकानदारांची बाजू प्रभावीपणे सभागृहात मांडल्याने या संपाला पाठबळ मिळाले. याशिवाय मोर्चातून दोन्ही संघटनांनी आपली ताकद दाखविली आहे. त्यामुळेच सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे, असे देशमुख म्हणाले.
या बैठकीला असोसिएशनचे राज्य खजिनदार विजयगुप्ता, महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष कैलास शर्मा,सांगली जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, मावळतालुकाध्यक्ष बाबुलाल नालबंद, वर्ध्याचे संजय देशमुखतसेच नवी मुंबई, ठाणे, वाशी आदी जिल्ह्यांचे प्रतिनिधीउपस्थित होते.
सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती
राज्य सरकारकडून प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास रेशनिंग दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन्ही शिखर संघटनांचे 55 हजार रेशनिंग दुकानदार व 47हजार रॉकेल विक्रेते असे एकूण एक लाख दोन हजार सदस्यांनी सामुहिक राजीनामे दिल्यास राज्यभरातील सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा फटका राज्यभरातील लाखो शिधापत्रिकाधारकांना बसू शकतो.
पिंपरी : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशन आणि राज्य महासंघ या रेशनिंग दुकानदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिंखर संघटनेच्या राज्यस्तरिय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख.
अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री. विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशन
मो. ९८२२३०००१४
https://www.youtube.com/watch?v=rHvOIl_TkBA&feature=youtu.be
...Read MoreADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002