व्हीएस न्यूज - कंपनीतील कामगारांना धमकी देत एका त्रिकुटाने कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला. हा प्रकार मंगळवारी पहाटे भोसरीतील साई एंटरप्रायजेस या कंपनीत घडला.राकेश चौधरी (वय-22, रा. भोसरी) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीत सेक्टर नं 7/108 येथे साई एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. फिर्यादी चौधरी व त्याचा सहकारी बबलू कंपनीत मंगळवारी पहाटे काम करत होते. एका दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने फिर्यादीला धमकी देऊन कॉपर वायर, पट्या व एक मोबाईल असा 16 हजारांचा ऐवज जबरदस्तीने नेला.फौजदार आहेर अधिक तपास करत आहेत.