Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
पुण्यातील NDA वर CBI चा छापा

व्हीएस न्यूज - पुणे येथील राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीवर बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सीबीआय) छापा मारला. एनडीएमध्ये शिक्षकांची निवड आणि नियुक्तीमध्ये घोटाळा झाल्यामुळे ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने एनडीएच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक, केमिस्ट्री, गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक यांच्यावर शिक्षक निवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. एनडीएमधील कार्यालये आणि आरोपींच्या निवासस्थानी शोध मोहिम सुरु आहे. एनडीएमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये सेवा बजावतात.

एनडीए देशातील एक प्रतिष्ठीत सैन्य प्रशिक्षण देणारी संस्था असून अनेकदा विदेशातूनही उमेदवार इथे प्रशिक्षणासाठी येतात. एनडीमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतात तसेच इथल्या खडतर प्रशिक्षणानंतर उत्तम दर्जाचे लष्करी अधिकारी तयार होतात. एनडीएमधून भारतीय सैन्य दलांमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक युद्धात महत्वाची भूमिका बजावली आहे.

...Read More

V. S. News
नऊ सराईत गुन्हेगारांकडून 14 लाखांचा ऐवज जप्त 

व्हीएस न्युज :- नऊ सराईत गुन्हेगारांकडून 11 तोळे 3 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने 23 मोबाईल फोन, 3 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 2 सेन्ट्रो मोटार, 1 स्विफ्ट मोटार, 1 करिझमा दुचाकी आणि रोकड असा तब्बल 14 लाख 7 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विविध पोलीस ठाण्यातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. बिराजदारनगर, हडपसर), हर्षल गुलाब पवार (रा. कुळे, ता.मुळशी), महेश शिवदास दिक्से (वय-28, रा. लोणी, ता. रिसोड, वाशीम), सॅम्युयल ऊर्फ विशाल डेडली ऑरनॉड (वय-30, रा. संभाजीराव हौसिंग सोसायटी, मिलींदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय-25, रा. मिलींदनगर, पिंपरी), सागर कुमार इंद्रा (वय-25, रा. कैलासनगर, बालाजी कॉलनी, थेरगाव), राहूल श्रीहरी काळे (वय-37, रा. बुधवार पेठ, पुणे), अक्षय आबासाहेब कोळेकर (वय-19, रा. साने कॉलनी, साने चौक, मोरेवस्ती, चिखली), शुभम नितीन काळभोर (वय-19, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टाक हा आपल्या साथीदारांसह मोहननगर येथे घरफोडी करताना पोलीसांनी त्याला ताब्यात होते. त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून दोन मोटारींसह सुमारे साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. तर आरोपी हर्षल पवार याच्याकडून तीन गुन्हे व 9 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. महेश दिक्से याच्याकडून 89 हजारांचा एक ऍपलचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी ऑरनॉल्ड, अतुल पवार, इंद्रा यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस, एक लोखंडी कोयता, एक सुरा, एक चारचाकी स्वीफ्ट मोटार असा 3 लाख 50 हजार 700 रूपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी राहूल काळे याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे असा 51 हजारांचा ऐवज जप्त केला. अक्षय कोळेकर व एका अल्पवयीन मुलाकडून 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचे 20 मोबाईल, एक करिझमा दुचाकी जप्त केली. तर शुभम काळभोर याच्याकडून 16 हजारांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. असा 14 लाख 7 हजार 725 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, महिला फौजदार रत्नमाला सावंत, हरिदास बोचरे, दत्तात्रय नणनवरे आदींच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
शिवशाही व्यापारी संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर 

व्हीएस न्युज - शिवशाही व्यापारी संघटनेच्या महाराष्ट्र कार्यकारिणी आज प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित कऱण्यात आलेल्या शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले,प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील , चिंचवड विधानसभा अध्यक्ष निलेश भोरे, खजिनदार माऊली जाधव, रोहिदास तांबे, शिवसेना उपविभागप्रमुख प्रमुख प्रदीप दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,मनोहर कानाडे(संत तुकाराम नगर विभागअध्यक्ष. शिवशाही संघटनेचे पि चि उपाध्यक्ष गणेश पाडुळे ,दत्ता गिरी (थेरगाव विभाग अध्यक्ष) महिला आघाडीच्या सारिका तामचीकर(,महीला सल्लागार )रत्नप्रभाताई नवगिरे,शिल्पाताई मरडेकर (चिंचवड विधानसभा महीला अध्यक्ष ) नरसिंग माने,आकाश घटकार,रविकिरण घटकार , आदी उपस्थित होते.

शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे - महादेव काळे (लातुर जिल्हाध्यक्ष), विजय पिंगळ (नाशिक जिल्हाध्यक्ष), दिपक बिजेकर (दिंडोरी तालुकाध्यक्ष), पुणे शहराध्यक्ष (गोगा सुपेकर), सुनीता खंडाळकर.(पुणे महिला शहराध्यक्ष), विशाल बाविस्कर (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), गणेश पाडोळे (पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड (पिंपरी विधानसभा अध्यक्ष), सतीश भवाळ (पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष), राज गिरी (चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष), भीमराव कुलकर्णी (खराळवाडी विभाग अध्यक्ष), कर्जत तालुकाध्यक्ष (सुहास ठाकरे), रंजत यादव ( मुंबई उपाध्यक्ष ), प्रफुल्ल भोसले (उल्हासनगर विभागाध्यक्ष), बलराम जाधवानी (उल्हासनगर विभागाध्यक्ष), प्रकाश जैन (ठाणे जिल्हाध्यक्ष), बबलू वाणी (संभाजीनगर पूर्व शहराध्यक्ष), नितीन देशमुख (संभाजीनगर पूर्व उपाध्यक्ष), सागर बनसोडे (संभाजीनगर मध्य शहराध्यक्ष), साजिद कुरेशी, मुश्ताक कुरेशी (संभाजीनगर मध्य उपाध्यक्ष). सय्यद सलाबउद्दीन ( संभाजीनगर मध्ये शहर सचिव)

...Read More

V. S. News
सांगवीत नाले सफाईच्या कामांना वेग

व्हीएस न्यूज - प्रभाग क्र.३२ अंतर्गत सांगवी, नवी सांगवी परिसरातील नाल्यांच्या साफसफाई कामकाजाला वेग आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य खात्याने कंबर कसली असल्याचे चित्र सांगवी परिसरात दिसून येत आहे. नगरसेवक हर्षल ढोरे यांनी स्वत: या लक्ष देऊन या कामाचा आढावा घेतला.

आरोग्य विभागाकडुन जुनी सांगवीतील कै. शकुंतलाबाई शितोळे शाळेशेजारील व शिवांजली परिसरातील नाले साफ सफाई पूर्ण करण्यात आली. नवी सांगवी दशक्रिया घाट,इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील नाला साफसफाईचे कामकाज प्रगतीपथावर सुरू आहे. आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याचे पंधरा ते वीस कर्मचारी गेली पंधरा दिवस नालेसफाईच्या कामात व्यस्त आहेत.

शिवांजली परिसर व दशक्रिया घाट येथील नालेसफाईच्या कामाची नगरसेवक हर्षल ढोरे यांनी पाहणी केली. एम एस काटे चौक, नर्मदा गार्डेन येथील नाला साफसफाईच्या कामासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला स्थापत्य विभागामार्फत जेसीबी व अन्य साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. येत्या आठ-दहा दिवसांत सांगवी-नवी सांगवीतील नालेसफाईची कामे मार्गी लावली जातील,” असे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
जनसेवा सहकारी बँकेचे नवीन एटीएम पिंपरीकरांच्या सेवेत

व्हीएस न्यूज - जनसेवा सहकारी बँक लि. हडपसर पुणे या बँकेच्या भोसरी एमआयडीसी शाखेतील एटीएम सेवेला आज (सोमवार) पासून प्रारंभ झाला. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सह संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे यांच्या हस्ते एमटीएम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

एटीएम सेंटरच्या उद्घाटन समारंभासाठी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीेेए प्रदीप जगताप, पालक संचालक अॅड. सतीश गोरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी, संचालक सूर्यकांत शिर्के, संदीप सारडा, विनायक गायकवाड,अनुपमा कळसकर, आशा बहिरट, बाळासाहेब कचरे, रवी तुपे, शाखा व्यवस्थापक विलास लांडगे, नगरसेवक बाबू नायर, सीताराम शेट्टी, संदीप जाधव, राजेश भुजबळ, रवींद्र नामदे, सुनीता पाटसकर, शिवसेना उपशहर प्रमुख गजानन चिंचवडे, भाजप प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे बँकेच्या नवीन सेवेसाठी शुभेच्छा देताना म्हणाले, जनसेवा सहकारी बँक मागील चार दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून नागरिकांना सेवा देत आहे. आपल्या ठेवीदारांच्या हिताचा विचार करत सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे ठेवीदारांच्या मनात जनता सहकारी बँकेविषयी विश्वास कायम आहे.

अध्यक्ष प्रदीप जगताप म्हणाले की, आर्थिक यशाला गवसणी घालण्यासाठी आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. एटीएम सेवेमुळे खातेदारांचे व्यवहार वाढतील. चलन फिरते राहील. बँकेच्या एमआयडीसी शाखेने आतापर्यंत ९५ कोटींचा टप्पा पार केला आहे. येत्या आर्थिक वर्षात १०८ कोटींचा टप्पा गाठण्याचे ध्येय शाखेने ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

...Read More

V. S. News
थेरगावात “थेरगाव सोशल फाऊंडेशन”ची स्थापना

व्हीएस न्यूज थेरगाव परिसरातील सर्व सामाजिक संस्थांचे संघटन करून "थेरगाव सोशल फ़ाउंडेशन" ची स्थापना करण्यात आली आहे. थेरगाव परिसरातील समस्या निर्मूलन सामाजिककर्तव्य दक्षतेसाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या अगोदरआंघोळीची गोळी या संस्थेमार्फ़त सुरु असलेल्या नेल फ़्री ट्री, पेन फ़्री ट्री या उपक्रमाद्वारे खिळेमुक्त झाड़ांचे थेरगाव ' हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. तसेच, दि. २० मेरोजी बिर्ला हॉस्पिटल ते केजूदेवी बोटक्लब या मार्गावर असलेल्या सर्व झाडांवरील जाहिरात करण्यासाठी लावलेले बोर्ड, खिळे, स्टेप्लर पिन्स, बाईंडिंग वायर्स, नायलॉन पट्टया तसेच तूटलेले ट्री गार्डकाढुन झाडांना खिळेमुक्त पर्यायाने बंधनमुक्त करण्यात आले. थेरगाव सोशल फ़ाउंडेशनचे निलेश पिंगळे, अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, सुशांत पांडे, अनिल घोडेकर, मनोज वंजारी यांच्या संयोजनाने उपक्रम राबविण्यात आला. बापू खोसे, मनिषा दनाने, श्रीकांत धावारे, प्रकाश गायकवाड, अंकुश कूदळे, मयूर कांबळे, रोहीत ढोबळे, अमोल शिंदे, राहुल जाधव, अभिजीत खानविलकर, योगेश ननावरे,सचिन पानढवळे यांच्यासह विविध संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

...Read More

V. S. News
आयटी कंपनीतील कामगार तरुणीची आत्महत्या

व्हीएस न्यूज - हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अंकुश वाघमारे असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मारुंजी येथे घडला.

पूजा ही आयटी कंपनीत काम करत होती. सोमवारी रात्री तिने राहत्‍या घरात गळफास घेतला. तिच्या घराशेजारी रहाणाऱ्या नागरिकांना याबाबत संशय आल्‍यानेत त्‍यांन हिंजवडी पोसिांना माहिती दिली. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत घडल्‍या प्रकाराची चौकशी केली. दरम्‍यान, पूजाने आत्‍महत्‍या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

...Read More

V. S. News
वाकडमधील सराईत गुन्हेगार गंग्या तडीपार

व्हीएस न्यूज - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगार रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे याला पोलिसांनी दीड वर्षासाठी तडीपार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून छोट्या मोठ्या गुन्हेगारी कारवायामूळे गंग्याची दहशत निर्माण झाली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या सुचनेनुसार पोलिस कर्मचारी सुहास पाटोळे, नाना झेंडे यांनी त्याच्या सर्व गुन्ह्यांचे रेकॉर्ड तयार करून तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरून उपायुक्त गणेश शिंदे यांनी त्यास दीड वर्ष तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

...Read More

V. S. News
तरुणींकडून खंडणी उकळणाऱ्या इंजिनीअरला अटक

व्हीएस न्यूज - तरुणींचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक करून त्यावर त्यांचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनीअरला सायबर शाखेने अटक केली. त्याने सहा तरुणींकडे अशाप्रकारे खंडणी मागितली आहे.

कृष्णा बळीराम फड (रा. खणावळकर आळी, पनवेल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फड हा कोल्हापूर येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याला फेसबुक, इन्स्ट्राग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया अकाऊंटला हॅक कसे करायचे माहिती होते. त्याचा गैरवापर करीत त्याने तरुणींची अकाऊंट हॅक करण्यास सुरुवात केली. सहापैकी दोन तरुणींनी सायबर शाखेकडे तक्रार केल्यानंतर त्याचा तपास केला असता, फड याने हा उद्योग केल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला अटक केली.

पिंपळे सौदागर येथील एका तरुणीचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट हॅक झाले आहे. त्यावर अश्लिल फोटो व मजकूर टाकला आहे. बदनामी टाळायची असेल तर १५ हजार रुपये दे; अन्यथा मॉर्फ केलेले आणखी काही फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याची तक्रार तिने सायबर शाखेकडे केली. सायबर सेलच्या उपनिरीक्षक रूपाली पवार आणि मंदा नेवसे यांनी या संदर्भात तपास केला. त्यावेळी फड याचे नाव समोर आले. त्याला सायबर शाखेने अटक केली.

फड हा त्या तरुणींचे अकाऊंट हॅक करून त्या अकाऊंटमधील तरुणींच्या मित्र-मैत्रिणींनाही पैशाच्या मदतीसाठी मेसेज करीत असे. त्यांच्याकडे पासवर्ड व युजर आयडीही मागत असे. फडने आतापर्यंत सहाजणींचे अकाऊंट हॅक केले. त्यांचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. अकाऊंट हॅक करण्यासाठी त्याने वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. अशा प्रकारे बदनामीकारक मजकूर टाकून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला असेल तर तरुणींनी सायबर शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.

२७६ गुन्हे दाखल

एकीकडे सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची क्रेझ वाढत असताना, दुसरीकडे त्याचा धोकाही निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून बदनामी करणे, अश्लिल फोटो टाकणे, ब्लॅकमेल करणे असे प्रकार घडत आहेत. गेल्या सोळा महिन्यांत सायबर शाखेकडे अशा प्रकारच्या ७९५ तक्रारी आल्या आहेत. त्यांपैकी २७६ तक्रार अर्जांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
खासगी जागेत पालिकेने टाकली ड्रेनेज लाईन

जागा मालकाचा उपोषणाचा इशारा

व्हिएस न्यूज - दापोडी येथील सर्व्हे नं. 77 हिस्सा नं.4 ब येथील जागा भाऊसाहेब मुगुटमल यांची आहे. त्यांच्या जागेत पालिकेच्या जलनिःसारण विभागाने ड्रेनेज लाईन टाकून अतिक्रमण केले आहे. ही ड्रेनेज लाईन त्वरीत काढून घ्यावी, अशी मागणी मुगुटमल यांनी केली आहे. अन्यथा पालिकेच्या विरोधात उपोषणाला बसेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दापोडी येथील सर्व्हे नं. 77 हिस्सा नं.4 ब येथील जागा भाऊसाहेब मुगुटमल यांची आहे. त्यांच्या जागेशेजारी मोकळी जागा उपलब्ध असताना देखील पालिकेच्या जलनिःसारण विभागाने मुगुटमल यांच्याच जागेत बेकायदेशीरपणे ड्रेनेज लाईन टाकली आहे. काम सुरू होण्यापुर्वी मुगुटमल यांनी जलनिःसारण विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच परिसरातील काही नागरिक आमच्या जागेत येऊन काहीही करू लागले आहेत. वारंवार आमच्याशी वाद घालत असून माझ्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास जलनिःसारण विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. आमच्या हक्काच्या जागेतील ड्रेनेज लाईन त्वरीत काढून टाकावी. अन्यथा पालिकेच्या विरोधात उपोषण करण्यात येईल, असा इशारा मुगुटमल यांनी दिला आहे.

...Read More

V. S. News
शोकाकूल वातावरणात गायकवाड कुटुंबीयांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

व्हिएस न्यूज - भिगवण अपघातात जीव गमावलेल्या गायकवाड कुटुंबीयांतील पाचही जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी त्यांच्या यमुनानगर येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळील डाळज गावच्या हद्दीत स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटून शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला होता. प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय 67), सुनीता प्रकाश गायकवाड (वय 58), संदीप प्रकाश गायकवाड (वय 40), शीतल संदीप गायकवाड (वय 32), आभिराज संदीप गायकवाड (वय 5, सर्वजण रा. रा. नाना-नानी पार्क यमुनानगर निगडी) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच सदस्यांचे पार्थिव दोन रुग्णवाहिकांमधून सकाळी त्यांच्या राहत्या घरी यमुनानगरमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अंत्यविधीसाठी निगडी परिसरातील नागरिक गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले असून अंत्यविधीला असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती.
आजोळी गेल्यामुळे बचावलेल्या या कुटुंबातील सदस्य विश्वराजच्या (वय 7) हातून या पाचही सदस्यांना अखेरचे पाणी देण्यात आले. तो आजोळी गेला असल्याने देवदर्शनसाठी गेला नव्हता. मात्र, त्याला आजी, आजोबा, आई, वडील आणि धाकटा भाऊ अभिराज सोडून केल्याने तो पोरका झाला आहे. तर, सर्वांना विश्वराजचे चुलत आजोबा सुभाष गायकवाड यांनी अग्नी दिला.
या अपघातात गायकवाड परिवारातील प्रमोद प्रकाश गायकवाड (वय30) व हेमलता प्रमोद गायकवाड (वय28) हे आणखी दोघे जण जखमी झालेले आहेत. त्यापैकी हेमलता गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आई-मुलाला एकाच चितेवर अग्नी
शीतल गायकवाड आणि त्यांचा मुलगा अभिराज गायकवाड या दोन्ही मायलेकरांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांवर अंत्यसंस्कार करताना एकाच चितेवर त्यांना अग्नी देण्यात आला.

...Read More

V. S. News
वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड, कारवाईस उच्च न्यायालयाची  स्थगिती

व्हिएस न्यूज - चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने वाहनांना सेफ्टी गार्ड बसवू शकतो, अशी माहिती इंडियन सेफ्टी गार्डस इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष मनिष कोल्हटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

कोल्हटकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चार चाकी वाहनांचे सेफ्टी गार्ड पादचारी व प्रवाशांना सुरक्षित नसल्याचे कारणामुळे रस्ते महामार्ग व परिवहन मंत्रालयाच प्रियांक भारती यांनी वाहनांना बसवलेले क्रॅश गार्डस काढून टाकण्याचे परिपत्रक काढून सर्व राज्यांना दिले होते. त्यांच्या परिपत्रकामुळे अनेक राज्यात वाहनांना बसविलेले सेफ्टी गार्ड काढण्याची कारवाई सुरू केली होती. यावर असोसिएशनने कोर्टात धाव घेतली. याबाबतीतची पहिली सुनावणी दि 12 मार्च 2018 ला झाली. या सुनावणीदरम्यान कोणत्या कायद्याच्या आधारे हि बंदी आणली असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर रस्ते वाहतूक रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर व्हेईकल सेक्शन 110 अंतर्गत कायदा बनवून बंदी आणू शकतो. असे उत्तर दिले. यावर कोर्टाने ताशेरे ओढत 2 पाने अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. 20 ऑगस्ट 2018 पर्यंत स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गीता मित्तल व सी. हरिशंकर यांनी या खटल्याचा निकाल दिला.

कोल्हटकर पुढे म्हणाले कि, प्रवासी आणि पादचारी यांची आम्हालाही काळजी आहे. केवळ आमचे उत्पादन विकून मोकळे होणार नाही तर वाहनाचे सौंदर्य व मानवी सुरक्षा या दोन्ही बाबी लक्षात घेवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित असे सेफ्टी गार्डची निर्मिती करण्यावर आमचा भर आहे. या निर्णयामुळे उद्योजक व नागरीकांना एक दिलासा मिळाला आहे. हे सेफ्टी गार्ड बनवणे, विकणे आणि वाहनांना लावण्यावर आता बंदी नसल्याचेही कोल्हटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!