व्हीएस न्युज - भारतीय जनता पार्टीने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचा समावेश आहे. महेश लांडगे हे २०१४ ची निवडणूक अपक्ष लढले होते. मात्र, यावेळी ते भाजपा पक्षाकडून अधिकृत उमेदवार ठरणार आहेत. तर विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपाकडून विधानसभा लढवली होती.
भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप हे २००९ मध्ये अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर २०१४ ला त्यांनी भाजपाच्या साथीने निवडणूक लढवली होती. यातही त्यांना यश आले आणि मताधिक्याने ते विजयी झाले होते. दरम्यान, २०१४ च्या मोदी लाटेत भोसरी मतदारसंघातून आमदार महेश लांडगे निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपाला साथ देत सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते.
भोसरी विधानसभा मतदारसंघात तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. आमदार महेश लांडगे हे अपक्ष लिवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, भाजपाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात या दोन्ही विद्यमान आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणते तगडे उमेदवार देणार हे महत्वाचे ठरणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002