पिंपरी ; व्हॉटसअप वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानास्पद शब्द वापरून बदनामीकारक स्टेटस ठेवणारा अटक,पिंपरी पोलिसांची कारवाई.
पिंपरी
2019-12-05
व्हिएसन्युज - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरून मोबाईल व्हाट्सअप वर बदनामीकारक स्टेटस ठेवून दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची गणेश राजू गायकवाड (34)( रा. नाणेकर चाळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पिंपरी पोलिसांनी दिनांक ०३/१२ रोजी आरोपीला तत्काळ अटक करून भा.द.वी कलम 500, 505(२) प्रमाणे गुन्हा(गुन्हा रजि क्र ११६८/१९)दाखल केला आहे.
महापरिनिर्वाण दिना चे गांभीर्य लक्षात घेता व स्टेटस् मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वापरलेले अपमानास्पद शब्दांचे पडसाद अन्य ठिकाणी उमटून दोन समाजात द्वेष निर्माण होऊ नये म्हणून अतिशय गोपनीय पद्धतीने व तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे काम पिंपरी पोलिसांनी केले.
प्रकाश केनाराम चौधरी (26) (रा. गीता कॉम्प्लेक्स नेहरूनगर पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश चौधरी पिंपरी येथील गोकुळ हॉटेल शेजारील एका मेडीकल मध्ये नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.