Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
मोरवाडीत पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती

व्हीएस न्यूज - जागतिक एड्स दिनानिमित्त मोरवाडी, लालटोपीनगर परिसरात आज पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच परिसरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. मोरवाडी प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पथनाट्य आणि एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सिंबायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगचे डॉ. दिपक शेठी, सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे, प्रतिक कांबळे, कोमल शिंदे, रेखा इंगळे, ओमकार गायकवाड, नवनाथ भोसले, आण्णा लुकर, नाजिमा पठाण, शोभा झोंबाडे, मंदा चांदणे, सविता धुमाळ, कल्पना साळवे, सविता ओव्हाळ, राणी पवार, विंदू ओव्हाळ, सलिमा शेख, असिना शेख, रहिमा शेख, आत्मा शेख आदी उपस्थित होते.

पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोरवाडी, लालटोपीनगर परिसरात एड्स जनजागृती रॅली काढली. ”याद रखे..सुरक्षा जीवन का अर्थ है’, सुरक्षा के बीना सब व्यर्थ है”, ”HIV असे जेथे जीवनाचा नाश तेथे”, ”एड्स दिवस पर खाओ कसम, सुरक्षित बनाएँ यौन संबध”, ”जो सुरक्षा से दोस्ती तोडेंगे…वह एक दिन दुनिया भी छोडेंगे”, ”यौन संबंध जब-जब कंडोम तब-तब”, ”एड्स आजाराचा द्वेष करा, एड्स झालेल्या व्यक्तीचा नको”, ”सुरक्षित रहा, सतर्क रहा…तुमच्यासाठी, समाजासाठी”, ”विवाह में रहे वफादार, तब एचआयव्ही, एड्स के कभी न होंगे शिकार”,”सही और पूर्ण जानकारी..दूर रखें एड्स की बिमारी”, ”कंडोमचा वापर करा, एड्स टाळा” अशा संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेतले होते.

रॅलीनंतर लालटोपीनगर मध्ये पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून एड्स कसा होता, कोणाला होतो. त्याची माहिती दिली. सोबत राहिल्यावर, हात मिळविल्यावर, एका ताटात जेवल्यावर एड्स होत नाही. त्यामुळे एड्स झालेल्या व्यक्तीचा मत्सर करु नये, असा संदेश दिला. असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्ताद्वारे, दूषित रक्त असलेल्या इंजेक्शन सुई वापरल्याने, आईकडून बाळाला किंवा स्तनपानाद्वारे आणि टॅटू काढताना जर ते साहित्य दूषित असेल तर त्यातूनही एड्स होऊ शकतो, अशी माहितीही विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिली.

यावेळी बोलताना नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या की, एड्स झालेल्या नागरिकांचा द्वेष करू नये. एड्स झालेले लोक तणावात असतात. त्यांची हेळसांड, तिरस्कार करू नये. तुसड्यासारखी वागणूक देऊ नये. सोबत राहिल्यामुळे, जेवल्यामुळे किंवा हातात-हात मिसळल्यामुळे एड्स होत नाही. परंतु, त्याचा गैरप्रचार करण्यात येत आहे. झोपडपट्टी परिसरात एड्सची जनजागृती करणे गरजेचे आहे. या परिसरातील लोकांना त्याबाबत जास्त माहिती नसते. त्यामुळे या परिसरात एड्सची पथनाट्यातून माहिती देण्यात आली. तसेच जनजागृती करण्यात आली.


...Read More

V. S. News
दुचाकीची मोटारीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

व्हीएस न्यूज - भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने समोरून जाणाऱ्या एका मोटारीला जोरदार धडक दिली. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रकांत सोपान डोंगरे (वय 38 रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून भोसरी येथील महामार्गाच्या पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगाने जात असताना समोरून जाणाऱ्या मोटारीला (एमएच 14 एफसी 1822) धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
उसाचा ट्रॅक्टर, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

व्हीएस न्यूज - ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री सातच्या सुमारास केएसबी चौकात घडली. संतोष मारुती मुंढे (वय 28 रा. बीड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा पिंपरीच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना केएसबी चौकातील उड्डाणपुलावर त्याच्या दुचाकीची ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष हा एका खासगी सेक्युरीटी कंपनीमध्ये कामाला होता. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
खडकीत नागरिकांच्या बॅंक खात्यावरून पैसे गायब

चार दिवसांमधील दुसरी घटना

व्हीएस न्यूज - एटीएम पासवर्डचा गैरवापर करुन खडकीतील चार ते पाच जणांच्या व्यक्तिगत खात्यातील रक्कम अज्ञातांनी लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पासवर्डचा गैरवापर करुन सव्वा कोटीचा अपहार केल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या चार दिवसात पैसे अपहाराची ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांसह पोलिस यंत्रणाही चक्रावुण गेली आहे.

खडकी परिसरातील चार ते पाच जणांनी या प्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. खडकी कॅंन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कामास असलेल्या अनिता अनिश पारखे (वय-34 रा.गोपी चाळ बोपोडी) यांनी व यासह आँलसेंट शाळेतील एक शिक्षिका व इतर तिन जणांनी या प्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे.

पारखे यांना दि. 29 रोजी त्यांच्या मोबाईलावर एक संदेश आला. तुमच्या बॅंक खात्यातील (युनियन बॅंक खडकी) पाच हजार 500 रुपये कमी झाले आहेत. परंतु पारखे यांनी किंवा त्यांच्या इतर कोणत्याही नातेवाईकाने एटीएमचा वापर अथवा बॅंकेतुन पैसे काढले नसताना आपल्या खात्यातील रक्कम कशी कमी झाली व कोणी काढली? या प्रश्नाने त्या चक्रवल्या. नंतर त्यांनी तातडीने खडकी पोलिस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार केली. यावेळी पोलिस ठाण्यात आणखी चार जण या प्रकरणी तक्रार देण्यास आले होते. यातील सर्व तक्रारदारांचे प्रत्येकी 10 ते 15 हजार रुपये खात्यातुन लंपास करण्यात आल्या संबधी तक्रार देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता ते म्हणाले की बॅंक खात्यातील रक्कम अपहार प्रकरणी काही तक्रारी आल्या आहेत. पोलिस यंत्रणा त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करित आहेत. सायबर तपास यंत्रणेची मदत घेऊन सदर प्रकरण त्यांच्याकडे सुपुर्द केले जाईल, असे ते म्हणाले.

एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी नेमलेल्या दोन व्यक्तिंनी गोपनीय क्रमांकाचा गैरवापर करुन खडकीतील पाच बॅंकांच्या 17 एटीएम मधुन सुमारे एक कोटी 35 लाख 34 हजार 700 रुपयांचा अपहार केल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच चार दिवसांच्या अंतराने पैसे अपहाराची दुसरी घटना घडल्याने नागरिकांसह पोलिस यंत्रणा चक्रावुन गेली आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी वॉर्ड क्रमांक २० मध्ये स्वच्छते बाबत जनजागृती.

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील वॉर्ड क्रमांक २०(नेपाळी बाजार ,डेक्कन होंडा,क्रोम मॉल ) या परिसरात मध्ये कचऱ्या बाबत जनजागृती अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे 'ह ' प्रभागातील आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड,संभाजी गायकवाड ,सुखपाल जिनवाल आणि कामगार यांनी कचऱ्या संदर्भात मोरवाडी चौक ते बीफ मार्केट रेल्वे पूल पर्यंत प्रत्येक दुकानातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील कचरा म्हणजेच प्लास्टिक पिशव्या ,चहाचे कप,वेस्ट भाजी पाला व उरलेले जेवण हे रस्त्यावर आणि गटारात न टाकता डस्टबिन मध्ये जमा करावा असे प्रबोधन केले .जेणे करून रोग राईला प्रतिबंध लागेल. माहिती व प्रबोधन करतानाच ह्या सर्व परिसरची स्वछता केली. या परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
...Read More

V. S. News
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निगड प्रभाग अध्यक्षपदी विष्णू लोखंडे

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवडच्या निगडी प्रभाग क्र.१३ च्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विष्णू बळीराम लोखंडे यांची आज निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी विष्णू लोखंडे यांच्या निवडीची घोषणा करत निवडीचे पत्र दिले.

विष्णू लोखंडे हे निगडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या निवडीबद्दल शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उद्योजक पक्षातील विवीध पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकारच्या चुकीच्या कामांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठविणार आहे, असे विष्णू लोखंडे यांनी निवडीनंतर सांगितले.

...Read More

V. S. News
स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेला रॅलीने होणार सुरुवात

व्हीएस न्यूज - स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या वतीने चौथ्या स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेचे १ ते ३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील ५०० खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.

पिंपरीगावात शुक्रवारी (दि.१) सायंकाळी सहा ते सात या वेळेत स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यानंतर पिंपरीगावातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून खेळाडूंची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीतून खेळाडू ”नशा छोडे, देश जोडो”, ”बेटी बचाओ, बेटी पढाओ”, ”स्वच्छ भारत, सुंदर भारत” चा संदेश देणार आहेत. यावेळी स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशनचे राज्य सचिव सुनील शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष अमित गोरखे, सचिव विजय टेपुगडे, नगरसेवक संदीप वाघेरे, असोसिएशनच्या योगा विभागाच्या प्रमुख मनाली देव आदी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत लातूर, सोलापूर, परभणी, सातारा, उस्मानाबाद, ठाणे, रायगड, पुण्यासह राज्यातील सर्वंच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील ४० ते ४५ खेळाडू असणार आहेत. तर, पुणे जिल्ह्यातून २०० खेळाडू सहभागी होणार आहेत. अॅथलेटिक्स, हॅन्डबॉल, थ्रोबॉल, स्केटिंग आणि क्लॅप्स स्केटिंग या पाच क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा होणार आहेत.

शनिवारी (दि.२) सकाळी नऊ वाजता भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूलात अॅथलेटिक्सच्या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर मोहननगर येथील मैदानात स्केटिंगच्या स्पर्धा होणार आहेत. संभाजीनगर येथील नॉव्हेल इन्स्टिट्यूटच्या मैदानावर हॅन्डबॉल, थ्रोबॉल, स्केटिंग आणि क्लॅप्स स्केटिंगच्या स्पर्धा होणार आहेत. रविवारी (दि.३) पिंपरीगावातील बी.जी.आडवाणी धर्मशाळेत दुपारी १२ ते १ यावेळेत स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ही संस्था देशभरात काम करत आहे. ५० देशांशी संघटना संबंधित आहे. कला, क्रीडा आणि शैक्षणिक श्रेत्रात, ही संस्था कार्य करते, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली.

...Read More

V. S. News
“प्लास्टीक वापराला नकार” पथनाट्याद्वारे जनजागृती

व्हीएस न्यूज - समाजसेवेचे बीज लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजविण्यात यावेत, या हेतूने भोसरी इंद्रायणी नगरातील प्रियदर्शनी शाळा प्लास्टीक वापराचे तोटे यासंदर्भात जनजागृती मोहिम राबवित आहे. २०१७ - १८ या शैक्षणिक वर्षात शाळेने “प्लास्टिक वापराला नकार” हा प्रकल्प शाळा आणि समाजसेवा (Community Service) यासाठी निवडला असून शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे आसखेड, ता. - खेड, जि. -पुणे या गावी जाऊन गावातील लोकांना प्लास्टिकच्या अति वापराचे तोटे याबाबत जनजागृती केली.

प्लास्टिकचा वापर हा वातावरणासाठी तसेच सजीवांसाठी कसा हानिकारक ठरतो. याबाबत मुलांनी अभ्यास करून त्यासाठी काय पर्याय निघू शकतात, याबाबत माहिती गोळा केली. त्यामध्ये प्लास्टीक वापराचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून आल्याने मुलांनी स्टीलची पाण्याची बॉटल आणि स्टीलचा जेवणाचा डबा वापरणे. तसेच,प्लास्टिकला नकार कसा द्यायचा यावर विद्यार्थ्यांनी नाटीका बसवून इतर विद्यार्थ्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले. तसेच, त्यांना प्लास्टिकची पिशवी वापरण्याऐवजी जुन्या टीशर्ट यापासून पिशव्या बनवून त्याचा वापर कसा होऊ शकतो, याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. प्लास्टिकच्या कपातून चहा पिणे थांबविणे, खाद्य पदार्थासाठी प्लास्टिक वस्तुंचा वापर न करणे याबाबतची माहिती देण्यात आली.

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे अध्यक्ष इंद्रमान सिंग, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंग, व्यवस्थापन अधिकारी नरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये वातावरणाला घातक ठरणारे घटक, समाजात त्याबाबत जागृती कशी महत्वाची आहे, याची जाणीव निर्माण करण्यात आली. तसेच समाजात जाऊन जनजागृतीचा कार्यक्रम करण्याचा प्रत्यक्षात अनुभव मिळाला, अशी माहिती शाळेच्या प्राचार्याप्राचार्या अर्पिता एस आणि डॉ. गायत्री जाधव यांनी दिली.

...Read More

V. S. News
रेडझोन संदर्भात खा.बारणे यांची संरक्षणमंत्र्यांशी चर्चा

व्हीएस न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी दिल्ली येथे संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेऊन चर्चा केली.
बारणे यांच्या मावळ लोकसभा मतदार संघामध्ये संरक्षण खात्याविषयी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये रेडझोन, बोपखेल येथील संरक्षण विभागाच्या जागेतून जाणारा रस्ता, मावळ येथील मिसाईल प्रकल्प व उरण येथील नेव्ही सेन्सिटीव्ह झोन असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
खासदार बारणे हे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आले आहेत. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा बैठका घेत या प्रश्नांना गती देण्यात आली होती परंतु पर्रीकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून जावे लागल्याने पुन्हा या प्रश्नांचा पाठपुरावा करावा लागत असल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रलंबित प्रश्नांबाबत बारणे यांनी असे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोनची हद्द कमी करणे बाबत मी अनेक वेळा संरक्षण मंत्र्यांकडे बैठक घेतल्या असून त्याचा पाठपुरावा सातत्याने करत आहे. बुधवारी संरक्षणमंत्र्यांची भेट घेवून या प्रश्नांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देऊन तत्कालीन संरक्षण मंत्री व मनोहर पर्रीकरांच्या बरोबर झालेल्या बैठकीचा वृत्तांतही दिला. तसेच बोपखेल पुलाच्या प्रश्नाबाबत काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालायाने संरक्षण खात्याच्या जागेतून रस्ता करण्यास मान्यता देऊ नये असा निकाल एका याचिकेच्या दरम्यान दिला असल्याने हा प्रश्न अधिक जटील झाला आहे. या बाबत लक्ष घालण्याची विनंती करून मावळ येथील मिसाईल प्रकल्पासाठी अधिगृहण केलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. या प्रश्ना संदर्भात लोकसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित केल्याचे बारणे म्हणाले. तसेच उरण येथील नेव्हीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सेन्सिटिव्ह झोन मधील हद्द कमी करण्याबाबत संरक्षणमंत्र्यांबरोबर आपण चर्चा केल्याचे खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
लघुशंका करणे दुचाकीस्वाराला पडले महाग

व्हीएस न्यूज - लघुशंकेला थांबलेल्या एका इसमाची दुचाकीला लावलेली सोन्यांच्या दागिन्यांची पिशवी चोरट्याने लंपास केली. विशेष म्हणजे दुचाकीस्वाराची पत्नी जवळच असताना चोरट्याने दिड लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली.

रविंद्र सकपाल (वय-53, रा. चिखली रोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकपाल हे मंगळवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास ऍक्टीव्हा दुचाकीवर पत्नीसह जाधववाडी चिखली रस्त्यावरून जात होते. ते लघुशंकेसाठी थांबले. दुचाकीजवळ त्यांच्या पत्नी थांबल्या होत्या. त्यांच्या पत्नीची नजर चुकवून दुचाकीला लावलेली एक लाख 62 हजार रूपये किंमतीची सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लंपास केली.

फौजदार भोये अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
साडेनऊ कोटींचे सेट टॉपबॉक्स हॅथवेला परत न केल्याने गुन्हा दाखल

व्हीएस न्यूज - हॅथवे या इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या वितरक म्हणून काम करणाऱ्या दोन पार्टनरशिप फर्म्सनी 44 हजार 544 सेट टॉपबॉक्स कंपनीला परत न करता त्याची पर्स्पर विल्हेवाट लावल्याने हॅथवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दोन्ही फर्म्सच्या भागीदारांवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी हॅथवेच्या वतीने वतन पठाण (वय 45, रा. शिवाईनगर, ठाणे पश्चिम) यांनी निगडी पोलिसठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार भा.दं.वि. कलम 406,427,409,506,34 अन्वये धनराज डेटाकॉम प्रा. लि. व स्पेस कम्युनिकेशन या यमुनानगर, निगडी परिसरातील भागीदारी फर्म्सचे भागीदार अजय अहिरेकर, कालिदास गोळे व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॅथवे केबल अँड डेटाकॉम लि. या कंपनीने 2006 साली पिंपरी चिंचवडमध्ये केबल टीव्ही व्यवसाय आणि 2013 साली इंटरनेट सेवा पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्या करता धनराज डेटाकॉम प्रा. लि. व स्पेस कम्युनिकेशन या यमुनानगर, निगडी परिसरातील भागीदारी फर्म्सना वितरक नेमले होते. कंपनीने दोन्ही वितरकांना वेळोवेळी ठरलेले कमिशन आणि कॅरेज फी दिली आहे.

जानेवारी 2013 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीत या दोन्ही वितरकांना ग्राहकांकडे बसविण्यासाठी दिलेल्या सेट टॉपबॉक्स पैकी 44 हजार 544 सेट टॉपबॉक्स बदलले गेल्यामुळे अथवा काढून टाकल्यामुळे अकार्यान्वित करण्यात करण्यात आले आहेत. हे टॉपबॉक्स या दोन्ही वितरक फर्म्सनी हॅथवे कंपनीला परत करणे आवश्यक असूनही ते परत केले नाहीत. या सेट टॉपबॉक्सची एकूण किंमत 9 कोटी 52 लाख 70 हजार 400 रुपये इतकी आहे.

दरम्यान धनराज डेटाकॉम प्रा. लि. व स्पेस कम्युनिकेशन यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये बी.आर.डी.एस. या दुसऱ्या केबल कंपनीचे वितरक म्हणून काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात स्वत:ची कंट्रोलरूम सुरू केली. आणि नोव्हेंबर 2016 पासून शहरात ग्राहकांकडे सुरू असलेले हॅथवेचे सुमारे 15 हजार सेट टॉपबॉक्स काढून तेथे स्वत:चे सेट टॉपबॉक्स लावले. व हॅथवेला सेट टॉपबॉक्स परत करणे आवश्यक असूनही ते परत न करता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून हॅथवेचा विश्वासघात करून कराराचा भंग केला आहे. या खेरीज यमुनानगर भागातील 530 इंटरनेट कनेक्शन्स हेतुपुरस्सर यंत्रणेत बिघाड करून बंद केली आहेत व फिर्यादी वतन पठाण यांना धमकी दिली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅककडून ‘अ’वर्ग नामांकन प्रदान

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयास बेंगलुरु मधील नॅक समिती कडून ‘अ’वर्ग नामांकन प्रदान करण्यात आले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नॅकच्या (राष्ट्रीय मुल्यांकन व मान्यता परिषद) त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयात येऊन पाहणी केली होती. या समितीने महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक, संशोधनात्मक व इतर सोयींची तसेच उपक्रमांची सखोल तपासणी केली. यावेळी माजी विद्यार्थी, पालक, औद्योगिक प्रतिनिधी, विद्यार्थीशी सुंसवाद साधून महाविद्यालयात मिळणा-या सेवा सुविधांचा आढावा घेतला. महाविद्यालयीन काम उत्कृष्टरित्या सुरु असल्याचे मत अहवाल सादर करताना समितीने व्यक्त केले होते. त्याअनुषंगाने ‘नॅक’च्या बेंगलूरु येथील मुख्य कार्यालयातून महाविद्यालयास नुकतेच ‘अ’वर्ग नामांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ.म.फुलंबरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. महाविद्यालयाने गाठलेल्या या उद्दिष्ठाबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटीचे) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई,प्रशासकीय अधिकारी पद्माकर विसपुते यांनी प्राचार्याचे तसेच महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. नरेंद्र देवरे, सर्व अधिष्ठाता व विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्राचार्य फुलंबरकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीशील वाटचालीमध्ये नामांकन मिळविण्याच्या दृष्टीने केलेल्या शैक्षणिक, संशोधन, विद्यार्थी विकास,प्लेसमेंट बाबतीत केलेल्या उत्कृष्ठ योगदानाबद्दल सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विभाग प्रमुख, अधिष्ठाता व प्रबंधक यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमुद करुन त्या सर्वांना धन्यवाद दिले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्षा, सचिव, कोषाध्यक्ष, विश्वस्त तसेच कार्यकारी संचालक, प्रशासकीय अधिकारी ह्यांचे आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याचे सांगुन त्यांचे सर्वांचे आभार मानले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!