व्हीएस न्यूज - स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या वतीने चौथ्या स्टूडंट ऑलम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेचे १ ते ३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील ५०० खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ऑफ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.
पिंपरीगावात शुक्रवारी (दि.१) सायंकाळी सहा ते सात या वेळेत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यानंतर पिंपरीगावातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून खेळाडूंची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीतून खेळाडू ”नशा छोडे, देश जोडो”, ”बेटी बचाओ, बेटी पढाओ”, ”स्वच्छ भारत, सुंदर भारत” चा संदेश देणार आहेत. यावेळी स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशनचे राज्य सचिव सुनील शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष अमित गोरखे, सचिव विजय टेपुगडे, नगरसेवक संदीप वाघेरे, असोसिएशनच्या योगा विभागाच्या प्रमुख मनाली देव आदी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत लातूर, सोलापूर, परभणी, सातारा, उस्मानाबाद, ठाणे, रायगड, पुण्यासह राज्यातील सर्वंच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील ४० ते ४५ खेळाडू असणार आहेत. तर, पुणे जिल्ह्यातून २०० खेळाडू सहभागी होणार आहेत. अॅथलेटिक्स, हॅन्डबॉल, थ्रोबॉल, स्केटिंग आणि क्लॅप्स स्केटिंग या पाच क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा होणार आहेत.
शनिवारी (दि.२) सकाळी नऊ वाजता भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूलात अॅथलेटिक्सच्या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर मोहननगर येथील मैदानात स्केटिंगच्या स्पर्धा होणार आहेत. संभाजीनगर येथील नॉव्हेल इन्स्टिट्यूटच्या मैदानावर हॅन्डबॉल, थ्रोबॉल, स्केटिंग आणि क्लॅप्स स्केटिंगच्या स्पर्धा होणार आहेत. रविवारी (दि.३) पिंपरीगावातील बी.जी.आडवाणी धर्मशाळेत दुपारी १२ ते १ यावेळेत स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.
स्टूडंट ऑलम्पिक असोसिएशन ही संस्था देशभरात काम करत आहे. ५० देशांशी संघटना संबंधित आहे. कला, क्रीडा आणि शैक्षणिक श्रेत्रात, ही संस्था कार्य करते, अशी माहिती अमित गोरखे यांनी दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002