व्हीएस न्युज - मद्यपींसाठी महाराष्ट्र सरकार एक नवीन धोरण लागू करण्याची शक्यता आहे. दारु हवी असणाऱ्यांना घरपोच दारु पोहोचवण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करत आहे. दारु उद्योगासाठी ही योजना ‘गेम चेंजर’ ठरेल, असा विश्वास उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवला आहे. जर ही योजना लागू झाली तर असे करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरेल. ‘ड्रिंक अँड ड्रायव्ह’ आणि रस्ते अपघात रोखणे हा या योजनेमागचा राज्य सरकारचा उद्देश आहे.
दारु पिऊन वाहन चालवताना होणाऱ्या अपघाताच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. यामध्ये अनेकांचा नाहक जीव जातो. हे रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बावनकुळे पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. त्याच माध्यमातून दारुही घरपोच पुरवण्यात येईल. यामुळे ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’सारख्या घटनांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
दारुची ऑर्डर घेताना ग्राहकांची संपूर्ण माहिती घेणे. यामध्ये आधार क्रमांक असणे सक्तीचे असेल. आधारमुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटेल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. या दारुच्या बॉटलवर जियो टॅगिंग असेल. त्यामुळे ते ट्रॅक होईल. म्हणजे उत्पादकापासून ते ग्राहकाच्या घरापर्यंतचा दारुचा प्रवास समजेल. यामुळे तस्करी आणि चुकीच्या दारु विक्रीवर प्रतिबंध लागू शकेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
४.६४ लाख रस्ते अपघातातील घटनांमध्ये १.५ टक्के अपघात हे दारु पिऊन वाहन चालवताना झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) नोंदवले आहे.
व्हीएस न्युज - वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचा संस्थाप झाकीर नाईकच्या मुंबईतील पाच मालमत्तांवर टाच आणण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या मुंबईतील कोर्टाने दिले आहेत. झाकीर नाईकसाठी हा मोठा धक्का मानला जात असून तपास यंत्रणांनी झाकीर नाईकभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केल्याचे दिसून येते आहे.
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली एनआयए आणि ईडी यांच्यातर्फे संयुक्त कारवाई होण्याची भीती झाकीर नाईकला होती. त्यामुळेच तो भारताबाहेर पळाला आहे. त्याच्या संपत्तीवर टाच आणली जाणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
झाकीर नाईक हा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा (आरआरएफ) संस्थापक आहे. त्याने २०१६ मध्ये भारतातून पलायन करत मलेशियात मुक्काम हलवला आहे. त्याला तिथे स्थायी रहिवासास परवानगी देण्यात आली आहे. दहशतवादी कृत्यास अर्थपुरवठा करणे आणि द्वेष पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तो भारताला हवा आहे.
व्हीएस न्युज - देशातील बहुसंख्यांक लोक रामाची पूजा करत असल्या कारणाने विरोधी पक्षदेखील अयोध्येतील राम मंदिराला विरोध करु शकत नाहीत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. सोमवारी पतंजली योगपीठतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राम मंदिर बांधण्यास आम्ही बांधील आहोत, मात्र त्यासाठी वेळ लागेल असंही ते बोलले आहेत.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी बांधील आहे. मात्र काही गोष्टींना वेळ लागतो’, असं मोहन भागवत बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘प्रत्येक सरकारला काही मर्यादा असतात, आणि त्यामध्ये राहूनच त्यांना काम करावं लागतं. मात्र साधू, संतांना अशा मर्यादा नसतात. त्यांनी धर्म, देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी काम केलं पाहिजे’.
‘विरोधी पक्षही उघडपणे अयोध्येतील राम मंदिराला विरोध करु शकत नाहीत. कारण देशातील जास्तीत जास्त लोक रामाची पूजा करतात याची त्यांना कल्पना आहे. पण काही गोष्टींना वेळ लागतो’, असं मोहन भागवत बोलले आहेत. ‘प्रत्येक सरकारला काही मर्यादा असतात, पण चांगलं काम करणारं सरकार सत्तेत राहिलं पाहिजे. सत्तेवर कोण राहणार हे महत्त्वाचं असतं’, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
व्हीएस न्युज - अनुभव नसताना अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल विमानाचा करार का देण्यात आला ? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. वर्ध्यातील सेवाग्राममधील सभेत बोलताना राफेल करारावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी लोकांना तुम्ही नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आणून पाहिलंत. मात्र आता त्यांची गाडी पंक्चर झाली आहे अशा शब्दांत टीका केली.
अनिल अंबानी यांनी संपूर्ण आयुष्यात एकही विमान बनवलेलं नाही. एचएएल इतकी वर्ष विमान निर्मिती करत आहे…पण त्यांच्याकडून काढून घेत अनिल अंबानींना करार देण्यात आला. 30 हजार कोटी त्यांच्या खिशात घालण्यात आले. अनिल अंबानी यांच्यावर 33 हजार कोटींचं कर्ज आहे असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.
10 दिवस आधी अनिल अंबानी यांनी कंपनी उभी केली होती. 10 दिवसांनी त्यांना करार मिळाला. नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले तेव्हा अनिल अंबानीदेखील त्यांच्यासोबत होते. मनोहर पर्रीकर मला काही माहिती नाही सांगतात. करार कसा बददला हे मला माहित नाही असे पर्रीकरांचे शब्द आहेत. नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना करार का दिला हे जाहीर करावं अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
गांधीजी जोडा म्हणाले, पण मोदींना देशातील सर्व लोकांना तोडायचं आहे. मी पंतप्रधान होण्याआधी देश झोपला होता असं म्हणत त्यांनी देशवासियांचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदी जातीपातीत भांडण लावायचं आहे. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करायचं आहे. जिथे जातात तिथे नकारात्मकता, हिंसा पसरवतात असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी शेतकरी, तरुणांना खोटी आश्वासनं दिली. खात्यात 15 लाख जमा करणार होते, 2 कोटी रोजगार निर्मिती करणार होते. पिकांना योग्य किंमत देईन असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र त्याचं काहीच झालं नाही असंही ते म्हणालेत.
व्हीएस न्युज - अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर हा प्रकार घडल, असं तीनं सांगितलं आहे. झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तीने हा आरोप केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत आपल्याला सहन कराव्या लागलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना सांगत आहेत. तनुश्रीने नानांवर केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु असताना नानांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर सारुन डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते. तो ‘सोलो’ डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्रीने सांगितलं.
व्हीएस न्युज - नवी दिल्ली – भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता एएसएलचे सुरक्षा कवच मिळाले असून देशातील निवडक व्यक्तींना ही सुरक्षा देण्यात येते. आतापर्यंत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत होती. परंतु गुप्तचर विभागाच्या समीक्षेनंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांच्या सुरक्षेसंबंधी समीक्षा बैठक घेण्यात आली होती. यामध्ये आयबीने त्यांना उच्च स्तरीय धोका असलेल्या व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा पुरवण्याची शिफारस केली होती. त्यामुळे शाह यांना २४ तास सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात येणार आहे.
दरम्यान या सुरक्षेअंतर्गत शाह यांना ज्या भागाचा दौरा करायचा आहे. तिथे सर्वांत आधी एएसएलचे पथक जाऊन सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करणार आणि त्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे राज्यांच्या पोलीस प्रशासनाला पालन करावे लागणार आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना अमित शाहंच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.
सध्या एएसएलचे पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सुरक्षा सेवा देतात. दरम्यान, ज्यांच्या जीवाला धोका असतो, त्यांना विविध प्रकारच्या सुरक्षा पुरवण्यात येतात. एसपीजी, झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात येते. त्यानुसार अमित शाह यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना एएसएसचे पथ सुरक्षा देणार आहे.
व्हीएस न्युज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितलेल्या या किस्स्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देत मालकाच्या दट्ट्यामुळे कोंबडीऐवजी कोंबड्यानच कसं अंडं दिलं हा किस्सा दानवे यांनी सांगितला.
एका शेतकऱ्याचा कोंबडी पालनाचा धंदा तोट्यात गेला. खाद्य जास्त आणि उत्पन्न कमी झालं. त्याने नोकराला बोलवून सांगितलं कोंबड्यांनी प्रत्येकी दोन अंडी नाही दिली तर धंदा बंद. नोकराने कोंबड्यांना सांगितलं अंडी द्यावीच लागतील. पण त्यापैकी एका कोंबडीने एकच अंडं दिलं. मालकाने कसं ते विचारल्यावर कळलं ती कोंबडी नाही कोंबडा होता. पण मालकाच्या धाकाने एक अंडं द्यावं लागलं.
व्हीएस न्युज - वांगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 114 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिल्या जाणार्या मटकीची उसळमधून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनातून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची चिमुकल्यांवर उपचार करण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे.शालेय पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आला आहे.
वांगी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये गुरुवारी शालेय पोषण आहार म्हणून मटकीची उसळ करण्यात आली होती. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान या शाळेतील 146 विद्यार्थ्यांना मटकीची उसळ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीत जेवणासाठी गडबडीने ताट वाट्या घेऊन उसळ खाण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच विद्यार्थ्यांना मळ मळ होऊन उलटी झाल्या. एकापाठोपाठ अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, चक्कर येऊ लागली आणि पाहता पाहता शाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची चर्चा गावभर झाली. पालकांना माहिती समजताच शाळेमध्ये दाखल होऊन मिळेल ते वाहन घेऊन रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी पालकांनी गर्दी केली
व्हीएस न्युज -राज्यात विविध ठिकाणी बैल धुण्यासाठी गेलेल्या नऊ तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
मुंबई : बैलपोळा राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पण हा सण साजरा करताना अनेक ठिकाणी याला गालबोटही लागलं. बैल धुण्यासाठी पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विविध ठिकाणी घडली. राज्यभरात नऊ तरुणांनी आपला जीव गमावला.
औरंगाबाद जिल्ह्यात आज वेगवेगळ्या चार गावात पोळा सणानिमित्त बैल धूत असताना सहा मुलांचा जलसाठ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यात रविवारी सकाळी बार्शी टाकळी तालुक्यातील चिचखेड येथील ईसापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणात बैल धुण्यासाठी गेलेला युवक बुडाला. गौरव संतोष एकणार असं त्या युवकाचं नाव आहे. गौरव आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बैल धुण्यासाठी गेला. मात्र पाणी खोल असल्याने तो बुडाला असल्याची माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात बैल धुण्यासाठी गेलेला 17 वर्षीय तरुण पाटाच्या पाण्यात वाहून गेला. येवला तालुक्यातील पाटोदा येथील घटना आहे. गोकुळ तनपुरे असं या युवकाचं नाव असून तो अकरावीत शिकत होता.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा येथे पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. विशाल ठोंबरे (17) असं मृत तरूणाचं नाव असून माळवटा गावातील आसना नदी पात्रात तो आज सकाळी बैल धुण्यासाठी गेला होता.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मोठी दुर्घटना टळली. अर्धमासला गावचे किसन राऊत हे मानाचा बैल घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना अचानक पाठीमागून येणारे बैल जोरात धावले आणि त्यात अडकून किसन राऊत खाली पडले. यावेळी त्यांच्या अंगावरून काही बैल गेल्याने ते गंभीर जखमी झाले. प्रसंगावधान राखून त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना बाहेर ओढलं आणि जखमी अवस्थेत तात्काळ गेवराईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या डोक्याला इजा झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
व्हीएस न्युज - मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे. तर देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेससह बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे नेते सोमवारी सकाळी आठ वाजताच आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
देशभरातून कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा?
समाजवादी पक्ष, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, तृणमूल काँग्रेस, आरएलडी, आरजेडी, सीपीआय, सीपीएम, एआयडीयूएफ, नॅशनल कॉन्फरन्स, जेएमएम, जेव्हीएम, डीएमके, आम आदमी पक्ष, टीडीपी, केरळ काँग्रेस (एम), आरएसपी, आययूएमएल, लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव), स्वाभिमानी शेतकरी संघटना
सोनिया गांधीही आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता
काँग्रेसने भारत बंदचं आवाहन केलं असलं तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आंदोलनात दिसणार नाहीत. त्यांनी नुकतीच कैलाश मानसरोवर यात्रा केली आहे. सोनिया गांधी आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते मिळून सकाळी आठ वाजता राजघाटावर धरणं देणार आहेत. मोर्चा काढला जाण्याचीही शक्यता आहे.
राज्यात आंदोलन कसं असेल?
मुंबई - काँग्रेस नेते संजय निरुपम, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांचं अंधेरी स्टेशन बाहेर सकाळी आठ वाजता आंदोलन असेल.
मुंबई- राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांचं सकाळी आठ वाजता गोवंडी स्टेशन आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता फ्री वे शिवाजी पुतळा इथे आंदोलन होईल.
मुंबईतच सकाळी 10 वाजता भायखळाच्या पॅलेस सिनेमाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांचं आंदोलन होईल.
मुंबई- मनसेचं दादरच्या सेनाभनव येथे आंदोलन होईल. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांची उपस्थिती असेल. सकाळी नऊ वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल, तर बोरीवलीत 10 वाजता आंदोलन असेल. सकाळी 10 वाजता मनसे नेते बाळा नांदगावकर आणि महाराष्ट्र सैनिक भारतमाता लालबाग येथे जमणार आहेत.
नाशिक - काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचं एकत्र आंबेडकर पुतळा येथे सकाळी 10 वाजता आंदोलन होईल.
औरंगाबाद - मनसेचं क्रांती चौकात सकाळी 11 वाजता आंदोलन होईल. दरम्यान, सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पेट्रोल पंप सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत बंद राहतील. काँग्रेससह अन्य पक्षांकडून ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर पंप चालकांनी निर्णय घेतला आहे.
पुणे- कॅम्पमध्ये काँग्रेसचं दुपारी 12 वाजता आंदोलन असेल.
कोल्हापूर - काँग्रेसचं सकाळी दहा वाजता काँग्रेस भवन इथे आंदोलन होईल. तर बिंदू चौकात शेकापचं आंदोलन असेल.
सांगली - सकाळी दहा वाजता काँग्रेस भवन इथे आंदोलन होईल.
सोलापूर – काँग्रेसचं सकाळी दहा वाजता आंदोलन असेल.
रत्नागिरी – काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन असेल.
बीड – सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन होईल.
यवतमाळ – काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं बस स्थानकाजवळ सकाळी साडे दहा वाजता आंदोलन होणार आहे.
जळगाव – काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाचं सकाळी अकरा वाजता आंदोलन होईल.
उस्मानाबाद – शिवाजी चौकात सकाळी दहा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल.
चंद्रपूर – गांधी चौकात सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल.
नागपूर – रामनगर चौकात सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल.
नांदेड – महात्मा फुले पुतळ्याजवळ सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल.
हिंगोली – गांधी चौकात सकाळी अकरा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल.
नंदुरबार – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता काँग्रेसचं आंदोलन होईल.
व्हीएस न्युज - व्हीएस न्युज - मुलीने नकार दिला तर तिला पळवून आणू, असे बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यांनतर त्यांनी दिलीगिरी व्यक्त केली होती. तरीही त्यांना जोरदार विरोध करत राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला.
अखेर या प्रकरणी त्यांनी ट्विटरवरुन माफी मागितली. राम कदम यांनी ट्विटरवर म्हटले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे. घाटकोपर दहीहंडी उत्सवात बोलताना राम कदम यांनी बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर राम कदम यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मात्र दिलगिरीने विरोधकांचे समाधान झाले नसून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी कदम यांच्या घरासमोर निदर्शने करीत त्यांचा निषेध केला होता.
व्हीएस न्युज - बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्तींना सरकारकडून ठराविक रक्कम भरपाई म्हणून देण्याची योजना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजूर केली. याची अंमलबजावणी २ आॅक्टोबरपासून केली जावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
ही भरपाई योजना स्त्री व पुरुष अशा दोन्ही लिंगाच्या गुन्हेपीडितांना लागू होईल व त्यात दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेला कोणतीही कमाल मर्यादा असणार नाही.
सरकार भरपाई योजना व तिची नियमावली तयार करत नाही, तोपर्यंत न्यायालयाने तयार केलेली योजना लागू राहील, असेही नमूद केले गेले. दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्याकांडानंतर अशा भारपाईचा विषय घेऊन निपुण सक्सेना यांनी जनहित याचिका केली.
मध्यंतरी न्यायालयाने त्यात ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांना ‘अॅमायकस क्युरी’ नेमले व राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणास (नाल्सा) यासाठी भरपाई योजनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले. ‘नाल्सा’चा मसुदा व अॅड. जयसिंग यांच्या सूचना मंजूर करून, न्या. मदन बी. लोकूर, न्या. दीपक गुप्ता व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने भरपाई योजना मंजूर केली. अशा भरपाईसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र निधीची स्थापना केली जाईल.
किमान भरपाई
लैंगिक अत्याचाराने मृत्यू : ५ लाख रु.
बलात्कार : ४ लाख बलात्कारामुळे गर्भारपण : ३ लाख
सामूहिक बलात्कार ५ लाख
अनैसर्गिक लैंगिक अत्याचार : ४ लाख
हल्ल्यामुळे गर्भपात किंवा नपुंसकत्व : २ लाख
अॅसिड हल्ल्याने विद्रुपता वा मृत्यू ७ लाख
जळीतकांडात मृत्यू : ७ लाख
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002