नाना पाटेकरांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं; अभिनेत्री तनुश्री दत्ताचा धक्कादायक आरोप
मुंबई
2018-09-28
व्हीएसन्युज - अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर हा प्रकार घडल, असं तीनं सांगितलं आहे. झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तीने हा आरोप केला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत आपल्याला सहन कराव्या लागलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना सांगत आहेत. तनुश्रीने नानांवर केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु असताना नानांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर सारुन डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते. तो ‘सोलो’ डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्रीने सांगितलं.