व्हिएस न्यूज - वादातून एका तरूणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पाठीमागे दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.
पंकज फुगे (वय-23, रा. भोसरी) असे गोळीबारीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतल्याचेही पोलीसांनी सांगितले आहे. घटनास्थळी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी भेट दिली आहे.