व्हीएस न्यूज - रस्त्याने जाणाऱ्या इसमाची चोरट्यानी गळ्यातील 70 हजार रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजता जगताप डेअरी ते काळेवाडी फाटा दरम्यान घडली.
प्रत्युश नंदवयोलियार (वय 39 रा. व्हिसडम कल्चर सोसायटी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदवयोलियार रस्त्याने पायी घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 70 हजार रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळी हिसकावून पसार झाले. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.