व्हीएस न्यूज - रस्ता न देणाऱ्या मोटारीला हॉर्न दिल्याच्या कारणावरून मोटारीतील दोघांनी मेडीकल व्यावसायिकाला हाताने मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडीतील कलासागर हॉटेलजवळ घडली.
ललित बाफना (वय-35, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार काळूराम लांडगे यांनी माहिती दिली. बाफना हे सोमवारी मुंबई-पुणे महामार्गावरून दापोडीकडे मोटारीने जात होते. कासारवाडी येथे समोरून जाणारा मोटार चालक रस्ता देत नसल्यामुळे त्यांनी मोटारीचा हॉर्न वाजविला. याचा राग आलेल्या मोटार चालकांनी बाफना यांना मोटार थाबविण्यास भाग पाडले. हॉर्न का वाजविला,असा जाब विचारत त्यांना हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही झटापडीत पडली. मात्र, चैन मोटारीतच सापडली आहे. बाफना यांचे पिंपरीत मेडीकल आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.