Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
शिवसेनेचा संगणक परत करा - सचिन चिखले

व्हिएस न्यूज - महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून सर्वपक्षीय गटनेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. तसेच, कोणी आपल्या विरोधात बोलू नये म्हणून सत्ताधाऱ्यांकडून गळचेपीचा प्रकार सुरू असून कुठलेही कारण नसताना गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक महापालिकेने दप्तरी जमा केले आहे. अद्यापही या मागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाहीत. ही घटना निंदनीय असून शहर मनसेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात पिंपरी- चिंचवड महापालिकेचे महापौर तसेच आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून शिवसेना गटनेते यांच्या कार्यालयातील संगणक परत करा , अशी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने गटनेत्यांना दिलेल्या सोई- सुविधांचा वापर गटनेता व नगरसदस्य नागरिकांच्या तक्रार निवारण्यासाठी करीत असतात. या संगणकाचा वापर देखील नागरिकांच्या हितासाठी करण्यात येत होता. परंतु, गटनेत्यांना विश्वासात न घेता संगणक गटनेते यांच्या कार्यालयातून त्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता संगणक काढून नेण्यात आला. हा तर सर्वपक्षीय गटनेत्यांचा अपमान आहे. यापूर्वी, अनेक राजकीय पक्षांनी या महापालिकेवर सत्ता भोगली आहे. परंतु, अशी अपमानास्पद वागणूक कुठल्याही सत्ताधारी पक्षाने गटनेता अथवा सत्ताधाऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे, त्वरित शिवसेना कार्यालयातील संगणक बसविण्यात यावा, अशी विनंती मनसेचे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी, हेमंत डांगे, बाळ दाणवले, संजय यादव, रुपेश पटेकर, राजू सावळे, हेमंत तिवारी, अंकुश तापकीर, संतोष यादव, अमित तापकीर, बंटी सवाई, सखाराम मटकर, महेश ठाकर, सचिन कांबळे, प्रतीक शिंदे, सागर भोपळे, नासिर शेख उपस्थित होते.
...Read More

V. S. News
कर्ज मिळवून, गिफ्ट देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक

व्हीएस न्यूज - कर्ज मिळवून देतो, गिफ्ट देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांना दिल्लीतून तर एकाला पुण्यातील खराडीतून सायबर क्राईन सेलने अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रूपयांच्या फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
निगडी येथील तरूणास रिलायन्स कॅपिटल पॉलिसीतून बोलत असल्याचे सांगितले. एक्साईट लाईफ इन्सुरन्स कंपनीमध्ये पॉलीसीसाठी 30 हजार रूपये भरण्यास सांगितले. ही पॉलिसी रिलायन्स कॅपिटल कंपनीकडे मॉरगेज ठेवून त्यावर पाच लाखांचे कर्ज मंजुर करून देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी विविध बॅक खात्यावर 1 लाख 85 हजार रूपये भरण्यास लावणाऱ्याला दिल्लीतील सानिया विहार येथून रोशन नारायण झा (वय-20), यशपालसिंग सन ऑफ बलविदरसिंग (वय-28) या दोघांना सायबर क्राईन सेलने अटक केली आहे. मॅट्रोमनी संकेतस्थळावरून ज्येष्ठाची साडेअठरा लाखांची फसवणूक करणारा गजाआड
जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रोमनी संकेतस्थळावर दुसऱ्या लग्नासाठी थेरगाव येथील ज्येष्ठाने नोंद केली होती. या संकेतस्थळावरून फ्रान्सीस मर्सी याने महिलेच्या नावाने चॅट करून माझ्या वडिलांची खूप संपत्ती आहे. ती पाठवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठीच्या चार्जेसच्या नावाखाली विविध बॅंक खात्यावर 18 लाख 50 हजार रूपये भरण्यास भाग पाडणाऱ्या नायजेरीयन जॉन ओरीयाकोसे याला दिल्लीतील टिळकनगपर येथूल सायबर सेलने गजाआड केले.
तर वाकड येथील एका इसमाला 50 लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून प्रोसिसिंग फी म्हणून 30 हजार रूपये भरण्यास सांगितले. कर्ज न देता फसवणूक करणाऱ्या सोमनाथ बाबुराव सुकरे (वय-45, रा. तुळजाभवानीनगर, चंदन मार्बलजवळ, चंदननगर, खराडी) येथून अटक केले. या चारही आरोपींकडून 37 सिमकार्ड, 10 मोबाईल, 31 डेबिट कार्ड, 3 पेन ड्राईव्ह, 4 डोंगल असा ऐवज जप्त केला असून तिन्ही घटनेतील 20 लाख 65 हजार रूपयांचा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. आरोपींकडून आणखी गुन्ह्याची उखल होण्य़ाची शक्यता पुणे सायबर सेलने व्यक्त केली आहे.
...Read More

V. S. News
बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी

व्हीएस न्यूज - बोपखेल परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागात गुन्हेगारीही त्याचप्रमाणात वाढत असून बोपखेलमध्ये पोलीस चौकी करण्याची मागणी माय माऊली प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश तेजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदींना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बोपखेलची सद्यस्थितीत 25 ते 30 हजार लोकसंख्या असून गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय आदी नागरिकांचे वास्तव्य आहे. परंतु, बोपखेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. पोलीसात तक्रार देण्यासाठी नागरिकांना भोसरी येथील पोलीस ठाण्यात 10 ते 15 किलो मीटरचा वळसा मारून यावे लागते. त्यामुळे अनेक नागरिक तक्रार देण्याचे टाळतात. तथापि, बोपखेलसाठी त्वरीत स्वंतत्र पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी माय माऊली प्रतिष्ठानचे रूपेश तेजी, रामदास गोसावी, स्वप्निल मेदगे आदींनी केली आहे.
...Read More

V. S. News
पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करण्यास पेट्रोलपंप चालकांची हरकत

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका क्षेत्रातील पेट्रोलपंपांवर असले;ली स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली करण्याचा आदेश नुकताच काढला असून पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने याला हरकत घेतली आहे.
संघटनेचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी गुरुवारी आयुक्तांना पत्र दिले असून त्यात असे म्हटले आहे की, महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेताना पंपचालकांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता. प्रत्येक पंपावर ग्राहकांच्या सोयीसाठी एकच स्वच्छतागृह बांधलेले असते. त्यामुळे ग्राहकांव्यतिरिक्त इतर लोकांची सोय तेथे होणे शक्यच नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी पेट्रोलपंप चालकांनी करावी असे महापालिकेला वाटत असेल तर, महापालिकेने 24 तास पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी बी.व्ही.जी. सारखी संस्था उपलब्ध करून द्यावी. अन्यथा, पंपावरील गटारे तुंबतील आणि, आरोग्याची समस्या निर्माण होईल. पंपचालकांना त्यामुळे एम.डी.जी. ऍक्टप्रमाणे अस्वच्छतेबद्दल कारवाईला सामोरे जावे लागेल.
...Read More

V. S. News
दारूसाठी पैसे न दिल्याने केला खून; आकुर्डीतील खूनाचे रहस्य उलघडले

एक जण गजाआड; एक अल्पवयीन ताब्यात
व्हीएस न्यूज - येथील ग्रीव्हज कंपनीजवळील झाडीत 8 डिसेंबर रोजी रात्री एका इसमाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी कसून तपास करत दहा दिवसात मुख्य आरोपीसह एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून इसामाचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
अविनाश पोपट नलावडे (वय 25 रा. दत्तनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अनिल रामधारी विश्वकर्मा (वय 37 रा. अयाप्पा मंदिराजवळ, काळेवाडी) यांचा 8 डिसेंबर रोजी रात्री डोक्यात दगड घालून खून केला होता.
याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांनी माहिती दिली. विश्वकर्मा यांचा खून झाल्याच्या दिवशी त्यांचे मित्र विनोद कुमार जैस्वाल व अखिलेश गौतम त्यांच्याबरोबर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. 8 डिसेंबर रोजी विश्वकर्मा, जैस्वाल व गौतम तिघे एकाच दुचाकीवर आकुर्डीच्या दिशेने जात होते. लघुशंकेसाठी कंपनीजवळच्या मोकळ्या आवारात थांबले असताना अचानक तीन अनोळखी इसम दुचाकीवरुन आले. त्यांनी विश्वकर्मा व त्यांच्या मित्राला झाडीमध्ये चालण्यास सांगून दारुसाठी पैसे द्या असे म्हणत धमकवाले.
विश्वकर्मा यांनी त्याला विरोध केला असता तिघांनी विश्वकर्माला दगडाने मारण्यास सुरुवात केली. यावेळी विश्वकर्मा यांचे मित्र जैस्वाल व गौतम हे विश्वकर्मा यांना सोडवायला गेले असता त्यांनाही आरोपींनी दगडाने मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघेजण जीव मुठीत धरून पुणे-मुंबई महामार्गावरुन आकुर्डीच्या दिशेने पळून गेले. विश्वकर्मा मात्र मोकळ्या जागेतील झाडीमध्ये पळाले. यावेळी आरोपीनी त्यांना पैसे देण्यास धमकावले त्याला विरोध केला असता डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. या माहितीच्या आधारे निगडी पोलीसांनी आरोपींचा तपास सुरू केला. पोलीस नाईक संदीप पाटील यांना बातमीदाराकडून आरोपी नलावडे हा भोर तालुक्यातील नरे गावात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नरे येथील एका हॉटेलमधून नलावडे याला पोलीसांनी अटक केली.
...Read More

V. S. News
मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

व्हीएस न्यूज - मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकात घडली. मृत्यू झालेल्या महिलेचे वय अंदाजे 40 असून अद्यापर्यंत ओळख पटली नाही. ही महिला आकुर्डी रेल्वे स्थानकातील रेल्वे फलटाच्या शेवटी थांबली होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसची जोरात धडक तिला बसली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.
महिलेचे वय अंदाजे 40 आहे. अंगावर गुलाबी रंगाची साडी आणि काळा ब्लाऊज परिधान केला आहे. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर छापा

व्हीएस न्यूज - पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या घरावर मंगळवारी आयकर विभागाने छापा टाकला. येथील बाणेर परिसरातील वीरभद्र नगरमध्ये बाबुराव चांदेरे यांचे घर आहे. या ठिकाणी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास आयकर विभागाचे पथक येऊन धडकले. सध्या हे अधिकारी चांदोरे यांच्या घरी चौकशी करत आहेत. बाबुराव चांदोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. बाबुराव चांदोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभाग आणि पोलिसांचे पथक अजूनही याठिकाणी उपस्थित असून चांदेरे यांची चौकशी केला जात आहे. मात्र, या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

...Read More

V. S. News
चाकणमध्ये डोक्यात दगड घालून युवकाची हत्या

व्हीएस न्यूज - चाकण एमआयडीसी परिसरात एका युवकाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसीतील मर्सिडीज बेंझ कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी हद्दीत सारा सिटी ते मर्सिडीज बेंझ कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला ३५ वर्षीय युवकाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही हत्या कोणी व कशासाठी केली हे अद्याप समजू शकलेले नाही. डोक्यात दगड घातल्याने मृतदेहाची ओळखही पटू शकलेली नाही. मृताकडे आढळून आलेल्या ऐवजावरून चाकण पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

...Read More

V. S. News
भाजपकडून पिंपरीतही ‘जल्लोष’

व्हीएस न्यूज - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. या विजयाचा पिंपरी चिंचवड शहर भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पदाधिकार्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. तर महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळून विजयोत्सव साजरा केला.

यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला अध्यक्षा शैलजा मोळक, प्रदेश सदस्या उमा खापरे, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात,नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, विलास मडिगेरी, माऊली थोरात, शैलेश मोरे, उत्तम केंदळे, नामदेव ढाके, सागर गवळी, नगरसेविका कमल घोलप तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...Read More

V. S. News
कर्जासाठी नागरिकांना ‘ना हरकत दाखला’ मिळावा - चिखले

व्हीएस न्यूज - प्राधिकरण, निगडी, यमुनानगर, साईनाथनगर या भागातील तब्बल सात हजार घरे स्वत:च्या मालकीचे असतानाही ती केवळ रेड झोनच्या हद्दीत येत असल्याने त्यांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असूनही रहिवाशांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक कुंचबणा होत आहे. त्यात प्राधिकरणही कर्जासाठी ‘ना हरकत दाखला’ देत नसल्याने रहिवाशी आर्थिक कात्रीत सापडले आहे. या नागरिकांना ना हरकत दाखले देण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

याप्रकरणी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत मोटे यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सचिन चिखले म्हणाले, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण विकास प्राधिकरणाच्या हद्दीत सदर भाग येतो. सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या प्राधिकरणाने भूखंडावर स्वत: बांधकाम करून इमारती विकल्या आहेत. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून सुमारे ४५ वर्षे या परिसरामध्ये अनेक रहिवाशी राहत आहेत. त्यातील असंख्य रहिवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना मुले-मुलीचा विवाह, परदेशात जाणे, इतर कारणांसाठी आर्थिक रक्कमेची गरज भासते. मात्र, त्यासाठी कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका स्पष्ट नकार देत आहेत.

प्राधिकरण, निगडी, यमुनानगर, साईनाथनगर परिसरातील घर मालकांना ही समस्या भेडसावत आहे. त्यांची घरे ४५ वर्षे जुनी असताना सन १९९८-९९ मध्ये रेड झोन हद्दीचा प्रश्‍न समोर आला. यामध्ये संबंधित रहिवाशांचा कोणताही दोष नाही. तरीही, त्यांना बँका कर्ज नाकारत असल्याने त्यांची आर्थिक कुंचबणा होत आहे, असे चिखले यांनी सांगितले. मोटे यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे सदर प्रकरण सादर करणार असल्याची ग्वाही दिल्याचे,सचिन चिखले यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
युवराज दाखले यांच्या नुतन वर्षे दिनदर्शिका २०१८ चे खासदार संजयजी राऊत यांच्या हस्ते प्रकाशित

व्हीएस न्यूज - शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी तयार केलेल्या जानेवारी २०१८ नविन वर्षे दिनदर्शिका प्रकाशन शिवसेना नेते खासदार संजयजी राऊतसाहेब यांच्या शुभ हस्ते मुंबई या ठिकाणी करण्यात आले यावेळी राऊत साहेबांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .

यावेळी जेष्ठ निष्टावंत शिवसैनिक किशोर पाटील , शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहर प्रमुख युवराज दाखले , उपशहरप्रमुख गणेश आहेर ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, उपविधानसभा प्रमुख राज श्रीमंत गिरी ,शिवसैनिक रोहीदास तांबे आदी उपस्थित होते .

...Read More

V. S. News
जाब दो आंदोलन ...

व्हीएस न्यूज - शनिवार दिनांक १६/१२/२०१७ रोजी सायंकाळी बहुजन समाजातील तसेच प्रामुख्याने मातंग समाजाच्या कोणत्याच वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा निगडी येथील अधिकृत पुतळा पिंपरी चिंचवड महानरपालिका व भाजपा सत्ताधारी यांच्या संघनमताने काढला याच्या निषेधार्त जाब दो आंदोलन करण्यात आले.

वास्तविक पाहता सदरचा अधिकृत पुतळा निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनात बसविणे आपेक्षित होते व त्या कामी समाजातील वरीष्ट नेत्यांनी महानरपालिका प्रशासनाला वेळोवेळी कल्पना दिली होती. या गोष्टींचा गांभीयाॕने विचार भाजपा सत्ताधारी व महानरपालिका प्रशासनाने केला नाही यांच्या निषेधार्त बहुजन समाजाच्या विविध संघटनेच्या व सर्व राजकीय पक्ष्यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानरपालिका प्रशासनाला व भाजपा सत्ताधार्यांना जाब दो आंदोलन सोमवार दिनांक १८/१२/२०१७ रोजी रोजी सकाळी ११वाजता करण्यात आले.
यावेळी जेष्टनेते भाऊसाहेब अडागळे ,राष्ट्रवादी काँग्रेस पाटीॕचे तथा मांतग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे ,मा आध्यक्ष नानासाहेब कसबे ,जयंती मोहत्सव आध्यक्ष तथा संजय गाधी निराधार योजना पिंपरी विधानसभा आध्यक्ष नितीन घोलप,कार्याध्यक्ष संजय ससाने ,काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे आध्यक्ष विशाल कसबे ,भारतीय लहुजी सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश गवारे,शिवव्यापारीसेना महीला संघटीका भाग्यश्री ताई म्हस्के शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले ,उपशहरप्रमुख गोरख पाटील ,गणेश पाडुळे ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे ,रा स पा शहर आध्यक्ष भरत महानवर ,आण्णा कसबे ,ज्ञानेश्वर चव्हाण ,दिपक लोखंडे बापु वाघमारे ,सन्मयक विद्यार्थी परिषधेचे आध्यक्ष संतोष जोगदंड भाजपा चे बाळासाहेब खंदारे आदी प्रमुख कायकतेॕ उपस्थित होते.
या जाब दो आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख तथा अण्णा भाऊ साठे जयंती मोहत्सव मा आध्यक्ष युवराज दाखले व जयंती मोहत्सव विद्यमान कार्याध्यक्ष संजय ससाने यांनी केले.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!