व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना प्राधिकरण येथे दहा महिन्यापुर्वी घडली. 22 वर्षीय पिडीत मुलीची प्रसूती झाली असून घराच्यांच्या व डॉक्टरांच्या मदतीने तिने निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी 22 वर्षाय तरूणी प्राधिकरणातील एका पाळणाघरात कामाला होती. दहा महिन्यापुर्वी ती सकाळी नऊ वाजता प्राधिकरण येथून पायी जात होती. रस्त्याच्या कडेला एक ओमीनी गाडी उभा होती. यावेळी गाडीमध्ये एकजण होता तर गाडी बाहेर एकजण उभा होता. त्या दोघांनी तिला बळजबरीने गाडीत टाकले व तोंडाला रुमाल बांधून बेशुद्ध केले. तिला अज्ञात स्थळी घेऊन गेले व त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सायकांळी साडेसहाच्या सुमारास तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती आकुर्डी येथील रल्वे पुलाच्याखाली होती. तिच्या अंगावरचे कपडे देखील फाटलेले होते. ती कशीबशी तिच्या घरी गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिला त्रास सुरु झाल्यानंतर ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती गरोदर असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी तिची प्रसुती झाली असून तिने घरच्यांच्या मदतीने निगडी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.