व्हीएस न्यूज - महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या हिंजवडी सेवा केंद्रातर्फे म्हातोबा देवस्थानच्या प्रांगणात 1 हजार 101 नारळांनी 6 फुटी शिवलिंग साकारले होते. यावेळी आध्यात्मिक चित्र प्रदर्शन, लेझर शोचेही आयोजन करण्यात आले होते. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारी मंगल दिदी यांनी केले होते....Read More
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड अॅड. बार असो. तर्फे ८ मार्च रोजी होणाऱ्या पिंपरी न्यायालयाच्या वर्धापन दिन निमित्त कॅरम, बुद्धिबळ ,लिंबुचामचा, रांगोळी स्पर्धा तसेच क्रिकेट स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धे मध्ये विजेत्या संघ व स्पर्धक यांना वर्धापन दिनी बक्षिसे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन पिंपरी अॅड. बार असो.चे अध्यक्ष अॅड राजेश पुणेकर ,अॅड मदनलाल छाजेड व अॅड. अनिल तेजवानी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अॅड. सुनील कड, अॅड. विजय शिंदे ,अॅड. कालिदास इंगळे, अॅड. सुजाता बिडकर,अॅड. अतिश लांडगे, अॅड. बाळकृष्ण रणपिसे,अॅड. योगेश थंबा, अॅड. सविता तोडकर, अॅड संजय दातिरपाटील, अॅड.शोभा कदम आदी मान्यवर उपस्तित होते. ...Read More
व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी व शुक्रवारी (दि. 15 व 16 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पीसीईटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेत ‘माहिती संकलन शास्त्र आणि यांत्रिक बुध्दीमत्ता’ (Data Science and Machine Intelligence) या विषयावर ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवन विदयापिठाच्या डॉ. लिसा आर्मस्ट्रॉंग, डॉ. अमिया त्रिपाठी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर,पीसीसीओईच्या आयटी विभाग प्रमुख डॉ. स्वाती शिंदे,नांदेडचे डॉ. उदय कुलकर्णी आदी मार्गदर्शन करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे.
व्हीएस न्यूज - पुणे येथे मांज्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, तर पिंपरी-चिंचवड शहरात मांज्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मांजाविक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. वाकड पोलिसांनी डांगे चौकातील दुकानातून एक हजार 215 रुपयांचा मांजा जप्त करून दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डांगे चौकातील क्लासिक स्टेशनरी मालक रताराम रघुनाथराम सोळंकी (वय-37, रा. विशालनगर, वाकड) आणि चंपालाल रघुनाथ सोळंकी (वय-34) या दोघांविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदी असलेला पतंगाच्या नायलॉन मांज्यामुळे पुण्यातील सुवर्णा मुजुमदार या महिलेचा 11 फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर जानेवारी महिन्यात काळेवाडीतील हमजा खान या दोन वर्षाच्या मूलाच्या पतंगाच्या मांज्यामुळे जबर जखम झाली होती. यामध्ये त्याच्या डोळ्याला तब्बल 32 टाके पडले आहेत. तर रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (रा. ज्योतिबा नगर काळेवाडी), गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे बंदी असलेल्या माजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर ध़रू लागली होती. याची गंभीर दखल घेत वाकड पोलीसांनी मंगळवारी डांगे चौकातील क्लासिक स्टेशनरी या दुकानावर कारवाई करत एक हजार 215 रुपयांचा मांजा जप्त केला. दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर सहा येथे सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. रोहिणी राजेंद्र अष्टेकर (वय 35, रिद्धी-सिद्धी संस्कृती अपार्टमेंट, सेक्टर नं. 6, मोशी प्राधिकरण, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी अष्टेकर मोशी ब्युटी पार्लर चालवतात. त्यांचे पती राजेंद्र अष्टेकर एका खाजगी कंपनीत काम करतात. सोमवारी रोहिणी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस उपनिरीक्षक हेमंत कोकणी अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - वाहन चोरी रोखण्यासाठी लावलेल्या सापळ्यात दोन सराईत चोरट्यांना गजाआड करण्यास एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 13 दुचाकी व सहा मोबाईल जप्त करण्यात आले असून 13 गुन्हे उघडकीस आले आहेत. अमोल रखमाजी खंडाळे (वय-34, रा. स्वराज गार्डन समोर, हिंद कॉलनी पिंपळे-सौदागर), राजेश ऊर्फ मुन्ना हरीचंद्र डोलारे (वय-28, रा. आनंदनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. तसेच संशयावरून ताब्यात घेतलेल्या एकाकडून एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सोनाजी विष्णु लगाडे (वय-31, रा. तळवडे, चव्हाणनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 1 सोन्याची चैन, 1 अंगठी असा 70 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींकडून 4 लाख 78 हजार 500 रूपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, फौजदार भालेराव आदींनी केली.
व्हीएस न्यूज - तूप विकण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी तुमचे नातेवाईक आप्पाशी बोला, असे सांगून महिलेचे 6 तोळे दागिने व रोकड असलेला डबा घेवून भामटे पसार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड येथील श्रीसाई हौ. सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी कुसूम लालासाहेब झोडगे (वय-58, रा. श्रीसाई हौ. सोसायटी, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोडगे यांचा मुलगा ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड परिसरात मंगळवारी सकाळी दोन भामटे गावरान तुप विकण्यास आले होते. झोडगे यांना भामट्यांनी तुप दाखविले. झोडगे तुप घेवून पैसे आणण्यासाठी घरात गेल्या. पैसे घेवून येताना त्यांनी सोने व पैशांचा डबा बाहेर आणला. त्यातून शंभर रूपये काढून भामट्यांना दिले. त्याचवेळी एकाने मोबाईलवरून फोन लावत आप्पाशी बोला, असे सांगितले. रेंज कमी आहे खिडकी जवळ जाऊन बोला असे सांगून त्या खिडकीजवळ गेल्यानंतर त्यांची नजर चुकवून दागिने व पैसे घेवून भामटे पसार झाले.
निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - व्यवसायासाठी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या तरूणाला कर्ज प्रोसेसिंग फी म्हणून तब्बल 2 लाख 78 हजार रूपये बॅक खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. कर्ज न देता तरूणाची फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे नुकताच उघडकीस आला. राहुल शिंदे (वय-36, रा. आनंदनगर, चिंचवड) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूलला व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्याने कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यावरून माहिती घेवून आरोपीने राहूलशी संपर्क साधला. 'तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, तुम्हाला कर्ज प्रोसेसिंग फी' म्हणून 2 लाख 78 हजार 522 रूपये विविध बॅंकाच्या खात्यावर भरण्यास सांगितले. कर्ज न देताच फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बालकांचा सक्तीचा आणि मोफत शिक्षण अधिकार कायदा 2009 अनव्ये 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून 28 फेब्रुवारी पार्यंत अर्ज भरण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पुर्व प्राथमिक वर्गातील नर्सरी, ज्यू.केजी., सिनियर केजी व इयत्ता पहिली च्या वर्गातील प्रवेश घेण्यात येईल. कोणतेही डोनेशन नाही, इयत्ता आठवी पर्यन्त मोफत शिक्षण ही या योजनेचीवैशिष्ट्ये आहेत. मात्र अल्पसंख्याक शाळांचा या मध्ये समावेश नाही . या योजने संदर्भात इच्छुक पालकांची बैठक नगरसेवक जावेद शेख यांनी आयोजित केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीआण्णा कुराडे, वसंत सोनार, ज्ञानेश्वर ननावरे, सुभाष चौधरी, प्रकाश परदेशी यांनी परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - भोसरीतील प्रितम प्रकाश महाविद्यालयात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र आणि विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. नगरसेवक विलास मडिगेरी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते. कार्यशाळेत 84 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत केले. प्रा. विभा ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रेणू अगरवाल यांनी आभार मानले....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002