महाशिवरात्रीनिमित्त 1 हजार 101 नारळांनी साकारले शिव लिंग
पिंपरी चिंचवड
2018-02-15
व्हीएस न्यूज - महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या हिंजवडी सेवा केंद्रातर्फे म्हातोबा देवस्थानच्या प्रांगणात 1 हजार 101 नारळांनी 6 फुटी शिवलिंग साकारले होते. यावेळी आध्यात्मिक चित्र प्रदर्शन, लेझर शोचेही आयोजन करण्यात आले होते. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारी मंगल दिदी यांनी केले होते.