व्हीएस न्यूज - ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर सहा येथे सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. रोहिणी राजेंद्र अष्टेकर (वय 35, रिद्धी-सिद्धी संस्कृती अपार्टमेंट, सेक्टर नं. 6, मोशी प्राधिकरण, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी अष्टेकर मोशी ब्युटी पार्लर चालवतात. त्यांचे पती राजेंद्र अष्टेकर एका खाजगी कंपनीत काम करतात. सोमवारी रोहिणी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस उपनिरीक्षक हेमंत कोकणी अधिक तपास करत आहेत.