व्हीएस न्यूज - खडकीतील श्री साईबाबा देवस्थानच्या 50 वर्धापन दिनानिमित्त श्री साई भक्त स्नेह संमेलनाचे दि. 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत खडकीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. काकड आरती, मंगलस्नान अभिषेक पुजा आरती, मध्यान्ह आरती, धूपारती, श्री गणेश होम, श्री साईसच्चरीत्र सामुदायिक पारायण, गुरूपाठ अभंग, भजन यासह शेवटच्या दिवशी ह.भ.प. डॉ.अजय आप्पा मार्जने महाराज यांचे काल्याचे किर्तन, श्री साई महाभंडारा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री साईबाबा देवस्थान ट्रस्टचे सुभाष कचरे, शिवा एम. शेट्टी, अरूण उत्तरकर यांनी दिली आहे....Read More
व्हीएस न्यूज - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाकरिता तळेगाव दाभाडे नगरपरिषद सज्ज झाली असून अखेरचा टप्पा म्हणून विविध भागातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शनिवार व रविवार सुट्टी असूनही अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याला नेमून दिलेली कामे करण्यासाठी प्रयत्न केले. तळेगाव शहर स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत उतरले असून शहरातील स्वच्छता आरोग्य यासाठी गेली काही जनजागृती मोहीम राबवीत आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, आरोग्य सभापती अरुण भेगडे पाटील, पक्षप्रतोद सुशील सैदाणे आणि मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारीवर्ग या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. शहराच्या विविध भागातील उपहारगृहे, सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, गृहनिर्माण संस्था, रूग्णालये, व्यापारी संकुले याठिकाणी स्वछता आणि रंगरंगोटी आदी कामांसाठी स्थानिक सहकार्य घेऊन स्पर्धेची तयारी करीत आहेत. याशिवाय कचराडेपो आणि त्याठीकाणची स्वच्छता, कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी आरोग्य विभाग व त्यांचे कर्मचारी शहरभर प्रयत्नशील आहेत. जनजागृतीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, महिला बचतगटांच्या प्रभाग निहाय जागृतीसभा आदी गेले अनेक दिवस सर्व पदाधिकारी, नगरसेवक विशेष प्रयत्नशील आहेत. शहरातील रोटरी, लायन्स क्लब आदी सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. तळेगाव रोटरी सिटी क्लबच्यावतीने तळेगाव शहरातील शालेय विद्यार्थ्यांची रॅली रविवारी काढण्यात आली होती. रोटरीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, अध्यक्ष शशिकांत हळदे, दिपक फल्ले, संयोजक संतोष शेळके भगवान शिंदे, संतोष लोणकर, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला. ...Read More
व्हीएस न्यूज - पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे धोरण पिंपरी चिंचवड महापालिकेने अवलंबल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता कष्टकरी पंचायतीच्यावतीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कष्टकऱ्यांचे नेता बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असून प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, शोभा शिंदे, रमेश शिंदे, गणेश आहेर, सुदाम बनसोडे, सोमनाथ कलाटे, आदी मोर्चात सहभागी होणार आहेत. टपरी पथारी हातगाडी धारकांचे पक्क्या गाळ्यात पुनर्वसन व्हावे, शहरातील टपरी, पथारी हातगाडीधारकांचे पुन्हा सर्वेक्षण व्हावे, फेरीवाला क्षेत्रे जाहीर व्हावीत, अतिक्रमण कारवाई थांबवावी, पुनर्वसनाशिवाय कारवाई करू नये, सर्व फेरीवाल्यांना ओळखपत्र व परवाना मिळावा अशा फेरीवाल्यांच्या मागण्या आहेत असे पंचायत अध्यक्ष रमेश शिंदे यांनी सांगितले. प्रशासनाने सर्व फेरीवाल्यांचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी व्यवस्था करावी म्हणून आयुक्तांना पत्र दिले असून प्रशासनाने ही व्यवस्था करावी, अशी मागणी पंचायतीचे सचिव प्रल्हाद कांबळे यांनी केली....Read More
व्हीएस न्यूज - स्वच्छ व पारदर्शक कारभाराची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला तुकाराम मुंढे सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नकोसे वाटत असल्याबाबत खेद वाटतो, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे. बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची नुकतीच नाशिक महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांनी दहा महिन्याच्या काळात काही चांगले तसेच कठोर निर्णय घेतले. त्यांनी पीएमपीएमएलमधील कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारत अऩेक कर्मचाऱ्यांना घरी बसविले. एकाही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना त्यांनी जुमानले नाही. त्यामुळे पारदर्शक व स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांची बदली करण्यास भाग पाडले. पारदर्शक कारभाराचे ढोल बडविणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे 'पारदर्शक' आहेत, हेच त्यांनी मुंढे यांची बदली करून दाखविले आहे, असे मत बकाल यांनी व्यक्त केले आहे....Read More
व्हीएस न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे स्थापित झालेल्या रोटॅ्रक्ट क्लब ऑफ डीवाय पीव्हीपीच्या वतीने आर-वोल्युशन या बुध्दिमता चाचणी व व्यक्तिमत्व विकासावर आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरूवारी होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्राथ मिक फेरीतून निवडल्या जाणाऱ्या स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. अंतिम फेरी 18 फेब्रुवारी रोजी पिंपरीत होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुरेश माळी यांनी दिली....Read More
व्हीएस न्यूज - मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने तीर्थक्षेत्र शिरगाव श्री साईबाबा मंदिर प्रतीशिर्डी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्येष्ठांचा मोठा सहभाग, हे या अभियानाचे वैशिष्ट्य होते. या अभियानाची सुरुवात शारदाश्रम या आश्रमातील 150 बालकांना शैक्षणिक साहित्य (वही, पेन, कंपास, पेन्सिल, रंगपेटी), तसेच स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने स्वच्छताविषयक (हॅडवॉश, साबण, नॅपकीन) साहित्याचे वाटप करण्यात आले. शिरगाव मंदिर येथे शिरगाव साईबाबा मंदिर मार्गातील रस्ते, दर्शनरांग, वाहनतळ, मंदिराबाहेरचा परिसर, भोजनालया समोरील परिसर, गायींचा गोठा परिसर आदी भागाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी समाजप्रबोधनकार शारदा मुंडे, मराठवाडा जनविकास संघ संचलीत मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अरुण पवार, मराठवाडा जनविकास संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, हरिभाऊ घायाळ, ज्ञानेश्वर खोसे, बाळासाहेब साळुंखे, भीमाशंकर भोसले, आण्णा जोगदंड, सुनील भोसले, साहेबराव धुमाळ, युवराज भोसले, विजय वडमारे, आदिती निकम, दिनेश वाकचौरे, शेषेराव नांगरे, प्रताप साबळे, शिवाजी सुतार, कल्पना बोलके, श्रीनिवास पानसरे,मालती पाटील, रोहिदास पाटील, भाऊसाहेब केदार, लीलावती घोलप, चंद्रकांत चौगुले, नारायण डोळस, रेखा वळसे, रामकिसन काळे, भगवान जगदाळे, प्रकाश झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. गोपाळ माळेकर म्हणाले, स्वच्छतेतून विचारांची सांगड व शैक्षणिक मदतीतून आपला देश घडू शकेल. भाविकांनीही मंदिर परिसर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. प्रताप साबळे यांनी अरुण पवार यांच्या 30 वर्षाच्या कार्याच्या आठवणी जागा केल्या. ते म्हणाले, संघाचे वृक्ष संवर्धन विषयक कार्य, खेळाडूंसाठी प्रोत्साहनात्मक कार्य, समाजप्रबोधन, महापुरुषांच्या जयंतीविषयक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक संघ विषयक कार्य, स्वच्छता अभियान, वन्य प्राण्यांसंदर्भातील विशेष कार्य, दुष्काळ भागासाठी पाणी पुरवठा अशी असंख्य सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात चालू असतात. स्वच्छता अभियानामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण होते. सूत्र्संचालन गोपाळ माळेकर यांनी, तर आभार कृष्णाजी खडसे यांनी मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - पत्नीशी झालेल्या भांडणातून पतीने राहत्या घरातील पंख्याला तर एका तरूणाने घराच्या छाताला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या दोन्ही घटना निगडीतील राहुल नगर, ओटा स्कीम येथे सोमवारी उघडकीस आल्या. पहिल्या घटनेमध्ये श्रावण गोरख कुसाळकर (वय-26, रा. राहुल नगर, ओटा स्कीम, निगडी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री श्रावण दारू पिऊन घरी आला होता. रात्री श्रावणचा पत्नी नितासोबत वाद झाला. श्रावणने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. भांडणाची माहिती समजताच खालच्या मजल्यावर राहणारी निताची बहीणवर आली आणि तिने निताला खाली नेले. दरम्यान, रात्री श्रावणने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. दुसऱ्या घटनेत आबू दशरथ जाधव (वय 32, रा. राहुलनगर, ओटा स्कीम, निगडी), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबूने घराच्या छताच्या हुकास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत. ...Read More
व्हीएस न्यूज - जुन्या भांडणातून आठ जणाच्या टोळक्याने एका युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रहाटणीतील श्रीहरी कॉलनी समोर घडली. निशांत समाधान धनवे (वय-19, रा. धनवेचाळ , शिवाजी चौक, पवनानगर, रहाटणी) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. भरत पालमपल्ले, राहूल सावंत, शत्रुघ्न पालमपल्ले, खंडू लोंढे, अविनाश जाधव याच्यासह त्याची तीन साथीदारांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत व आरोपी यांच्यात पुर्वी भांडणे झाली होती. त्याचाच राग धरून आरोपींनी रविवारी दुपारी साडेचार वाजता निशांतला श्रीहरी कॉलनी येथे अडवून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडने डोक्यात, पाठीत, हातावर मारहाण केली. निशांतला सोडविण्यासाठी आलेल्या समाधान धनवेच्या छातीत लोखंडी रॉडने व लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - पूर्व वैमनस्यातून आठ जणाच्या टोळक्याने एका तरूणाला शिवीगाळ करत हाताने, लोखंडी रॉड व दगडाने जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता फुगेवाडीतील जय भारत नगर येथे घडली. याप्रकरणी तिन आरोपींना भोसरी पोलीसांनी अटक केली आहे. युवराज चांगदेव फुगे (वय-20), सागर नाना अवसरमल (वय-20), विकास विजय दिनकर (वय-20, सर्व रा. फुगेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्याचे पाच साथीदार पसार आहेत. विनोद बाळकृष्ण स्वामी (वय-28, रा. आनंनदनगर, पिंपळे-गुरव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा भाऊ सलोराज बाळकृष्ण स्वामी (वय-32) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद स्वामी व आरोपी यांच्यामध्ये पुर्व वैमनस्य आहे. याचा राग धरून आरोपींनी शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता जय भारत नगर येथे विनोद आला असता त्याला शिवीगाळ करत तोंडावर हाताने, लोखंडी रॉड व दगड मारून गंभीर जखमी केले. यातील तिन आरोपीना अटक करण्यात आले असून त्याचे पाच साथीदार पसार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जाहिरात फलक लावण्याचे ठेके घेणाऱ्या तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजता दिघीतील एआयटी महाविद्यालयासमोर घडली. श्रीकांत चरणाप्पा कांबळे (वय-24, रा. मारूती मंदिराजवळ, ताडीवाला रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याचा भाऊ शिवानंद चरणाप्पा कांबळे (वय-35) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार टोके यांनी माहिती दिली. श्रीकांत हा जाहिरात फलक लावण्याचे ठेके घ्यायचा. शनिवारी दिघीत काम आटोपून रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. एआयटी महाविद्यालयसमोर अज्ञात मोटारीन त्याच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतला तात्काळ खासगी रूग्णालयात हालविण्यात आले. परंतू, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता मोटार चालक पसार झाला. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002