कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तरूणाची पावणे तीन लाखांची फसवणूक
चिंचवड
2018-02-13
व्हीएस न्यूज - व्यवसायासाठी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या तरूणाला कर्ज प्रोसेसिंग फी म्हणून तब्बल 2 लाख 78 हजार रूपये बॅक खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. कर्ज न देता तरूणाची फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे नुकताच उघडकीस आला. राहुल शिंदे (वय-36, रा. आनंदनगर, चिंचवड) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूलला व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता होती. त्याने कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यावरून माहिती घेवून आरोपीने राहूलशी संपर्क साधला. 'तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, तुम्हाला कर्ज प्रोसेसिंग फी' म्हणून 2 लाख 78 हजार 522 रूपये विविध बॅंकाच्या खात्यावर भरण्यास सांगितले. कर्ज न देताच फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करत आहेत.