प्रितम प्रकाश महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
भोसरी
2018-02-13
व्हीएस न्यूज - भोसरीतील प्रितम प्रकाश महाविद्यालयात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र आणि विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. नगरसेवक विलास मडिगेरी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते. कार्यशाळेत 84 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत केले. प्रा. विभा ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रेणू अगरवाल यांनी आभार मानले.