व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड लिंक रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. तसेच आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे .त्यामुळे वाहनांची वर्दळ ही मोठ्याप्रमाणात आहे . या परिसरात वारंवार अपघात होत असतात .स्थानिक महिला ,शाळकरी मुले- मुली या मार्गाचा वापर करतात .अशा लोकवस्तीच्या व रहदारीच्या मुख्य रस्त्या लगत कुठल्याही मद्य व्यावसायिकाला ( बिअर -बार ) चालविण्याचा परवाना देऊ नये .असे निवेदन सुजाण नागरिक संघाचे अध्यक्ष मा .सुंदर कांबळे ,यांनी पोलीस आयुक्त पुणे ,वाहतूक शाखा पुणे ,राज्यशुल्क आयोग पुणे यांना दिले.
व्हीएस न्युज प्रतिनिधींशी बोलताना अध्यक्ष सुंदर कांबळे म्हणाले की , पिंपरी -चिंचवड लिंकरोड़ भाटनगर रस्त्यावर जर बिअरबारचा परवाना देण्यात आला तर वाहतूक कोंडीला भर पडून अपघातांचे प्रमाण वाढेल व मद्यपींकडून महिला ,शाळकरी मुली यांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढेल यामुळे सदरच्या ठिकाणी मद्य विक्री परवाना देण्यास संघटनेच्या व स्थानिक नागरिकांच्या वतीने विरोध आहे व परवाना दिल्यास पुणे पोलीस आयक्त यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.