अजमेरा येथील नाना-नानी पार्क समोर खोदकामामुळे वाहतूक कोंडी.
पिंपरी
2018-05-02
व्हीएसन्युज - पिंपरी-चिंचवड येथील अजमेरा कॉलनी च्या परिसरात असलेल्या नाना-नानी पार्क समोर रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. सदरचे खोदकाम हे जिओ कंपनीने ठेकेदाराला दिले आहे. सदरच्या खोदकामामुळे वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. जिओ कंपनीचे खोदकाम हे नियोजनबद्ध पद्धतीचे नसून बेशिस्त पद्धतीने पार पाडण्यात येत आहे स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे.