व्हीएस न्युज - शिवसेनेच्या एका पदाधिका-याला दोघांनी धमकी देऊन खंडणी मागितली. त्यांच्या केबल नेटवर्क कार्यालयातून सेटअप बॉक्स जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार निगडी येथे घडला. हा धमकीचा प्रकार 19 ते 24 जून 2017 दरम्यान घडला. याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी नेताजी काशीद (वय 50, मोरेवस्ती, चिखली, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीद हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. 'तुमच्या हॉटेल संदर्भात अतिशय महत्वाची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तुमच्या हॉटेलच्या जागेची गुंठेवारी झालेली नाही. त्यामुळे संध्याकाळपर्यंत 10 लाख रुपये आणून द्या. अन्यथा मी हॉटेल सील करण्यास भाग पाडेन.' अशी 19 जून 2017 रोजी अनोळखी इसमांनी धमकी देत त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. काशीद यांचे साने चौक चिखली येथे केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. अनोळखी इसम कार्यालयात येऊन 1 हजार 200 रुपये किमतीचा एक सेटअप बॉक्स जबरदस्तीने घेऊन गेले. आरोपी फरार आहेत. पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.
व्हिएस न्युज - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना निगडी येथे मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच भागात रहाण्यास आहेत. दोघेही एकमेकांना ओळखतात. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. पीडित मुलगी पाच आठवड्यांची राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - जय भवानी तरुण मंडळ आणि कालिमाता मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान चिंचवड येथे फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली. चिंचवड, मोहननगर येथील श्री दत्त मंदिर चौकात १८ ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत विविध मान्यवरांचे व्याखान होणार आहे. बुधवारी (दि.१८) ज्येष्ठ विचारवंत प्रा. तेज निवळीकर यांचे ”संत गाडगेबाबा व आजचा समाज” या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवारी (दि.१९) राजकीय अभ्यासक प्रा. प्रकाश पवार यांचे ”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर- संसदीय लोकशाही” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर, शुक्रवारी (दि.२०) लेखिका समुपदेशक व सामाजिक अभ्यासिका डॉ. सीमा निकम यांचे ”सोशल मिडिया- एक दुधारी शस्त्र” या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवारी (दि.२१) प्रसिद्ध विचारवंत, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ”स्वातंत्र्य चळवळ आणि आजचा भारत” या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि.२२) माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे ”छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राजकारण” या विषयावर व्याख्यान होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचे लाभ घेण्याचे आवाहन, संयोजक मारुती भापकर यांनी केले आहे.
व्हीएस न्युज - पौर्णिमेच्या रात्री सुन गरोदर राहिली असून तिच्या पोटी मुलगीच जन्माला येणार असल्याच्या अंधश्रद्धेतून सासरच्या मंडळींनी सुनेच्या पाठीत आणि पोटात लाथा मारल्या. हा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे घडला. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती संजय पवार (वय 24, रा. कैलास नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती संजय पांडुरंग पवार (वय 31, रा. कैलास नगर, थेरगाव), सासू सुमन पांडुरंग पवार आणि नणंद अर्चना हर्षद यादव (दोघी रा. वाटंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि संजय थेरगाव मधील कैलासनगर येथे भाड्याने राहतात. पौर्णिमेच्या रात्री स्वाती गरोदर राहिली असल्यामुळे तिच्या पोटी मुलगीच जन्माला येणार आहे. या अंधश्रद्धेतून आणि वंशाला दिवा हवा असल्याच्या हव्यासातून गेल्या काही दिवसांपासून स्वातीला सासू सुमन आणि नणंद अर्चना दोघीही वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करत होत्या. शनिवारी रात्री पती, सासू आणि नणंद यांनी गर्भपात करण्याच्या कारणावरून स्वाती यांच्या पाठीत आणि पोटात लाथा मारल्या. यामुळे घाबरलेल्या स्वाती यांनी पोलीस ठाणे गाठत सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज – अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. संविधानाने त्यांना दिलेला तो अधिकार असल्याचे सांगत चौकशीनंतरही छगन भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे म्हटले आहे. भुजबळांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तुरुंगात आमचा विकास कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नसल्याचे गाऱ्हाणे त्यांनी ठाकरेंसमोर मांडले. भुजबळांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे राज ठाकरे त्यावर म्हणाले होते, असा संदर्भ आंबेडकर यांनी दिला. सरसंघचालकाच्या ‘संविधान बदलले पाहिजे’ या वक्तव्याचे मोदींनी खंडन न केल्यामुळे त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नौटंकी आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथे मोदींनी बाबासाहेबांमुळेच आपण पंतप्रधान होऊ शकलो, असे म्हटले होते. दरम्यान, सरसंघचालक खोटारडे असून त्यांच्याविषयी काहीच बोलायचे नसल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले
व्हिएस न्यूज - सांगवी येथे छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 13एप्रिल) पिंपळे गुरव येथील सृष्टी हॉटेल जवळील जय भीम चौकात मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारा भीम जलसा सादर करण्यात आला. ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांचे शिष्य निशांत गायकवाड, मुराद काझी, स्वप्निल पवार, अनिता इंगवले यांनी प्रबोधनातून गीते सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. गुरु शोभा सामाजिक व क्रिडा संस्था,आदियाल स्पोर्टस क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमरसिंग आदियाल, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी आमदार आण्णा बनसोडे, नगरसेवक अंबादास कांबळे, संतोष कांबळे,माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप तसेच शाम जगताप, पिंटू जवळकर, विलास पाटील,मुकेश पवार, ‘फॅन्ड्री’चित्रपटातील कलाकार राजेश्वरी खरात आदींसह शेंकडो नागरीक उपस्थित होते. यावेळी की बोर्डवर सतिश कुमार, रिदम मशीन धम्ममित्र आव्हाड, ढोलक चंद्रकांत इंगवले, नृत्य लावणी सोनल पुणेकर, आरती सातारकर, वेस्टर्न शितल बालवडकर, निवेदन दिपक म्हस्के,साऊंड सुनिल पाटील यांनी साथसंगत केली. बुध्द वंदना,सोनियाची उगवली सकाळ, छाती ठोकून सांगू जगाला, भीमा मुळे अंगठी सोन्याची बोटाला, भीमराज की बेटी, कायदा लिहिला भीमाने या गीतानी वन्समोअर मिळविला. शनिवारी दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुशिक्षित तरुण, तरुणींसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याचा 450 गरजूंनी लाभ घेतला होता. तसेच 280 लोकांची सरकारी फी मध्ये पासपोर्ट नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करुन देण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनात नयन अहिरे, गणेश जगताप, नितीन कदम,अरुण पवार, अरविंद कसबे, अतुल काशीद, नितीन काशीद,मुकेश पवार, हुसेन मुलाणी आदींनी सहभाग घेतला.
व्हिएस न्यूज - “सत्याचे विश्व वेगळे आणि कलेचे विश्व वेगळे असते. माणसं सत्याच्या विश्वाला कलेचे विश्व समजात. पण,सत्याच्या विश्वाला कलेच्या विश्वात आणून ठेवतो आणि सत्याचे कलात्मक दर्शन घडवतो, तो खरा कलाकार”, अशा शब्दांत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी कलाकाराची व्याख्या चिंचवडमध्ये केली.
कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘कलासंगम सोहळा २०१८’ सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे,सिने अभिनेत्री आशा काळे, आमदार लक्ष्मण जगताप,उपमहापौर शैलजा मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, हरहरे हेमंतराव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अनुराधा गोरखे,शर्मिला बाबर, आश्विनी जाधव, प्रियंका बारसे, शितल शिंदे,बाबू नायर, कैलास कुटे, भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे,उमा खापरे, शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे,प्रवचनकार मधू जोशी, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
या निमित्त भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे,डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक,किरण एवलेकर, तेजश्री अडीगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर, सुनिल शेगावकर, लक्ष्मण गावंडे, विश्वास करंदीकर, आणि नाना शिवले यांना विशेष कलागौरव पुरस्कार, तर शहरातील १५० कलाकारांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. रामचंद्र देखणे पुढे म्हणाले, शहरामध्ये कला, संगीत,साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात काम करणा-या अनेकांचा हा सत्कार समारंभ आहे. दुरदृष्टीने या शहराची सांस्कृतिक वाटचाल होते आहे. वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे अभिनय,कला, उद्योग अशा पाकळ्यांचे एकच फूल या रंगमंचावर मला अनुभवता आले. कलेच्या माध्यमातून सुर्याशी व गंगेशी नाते जोडणा-या सर्वांना अभिवादन करण्याची ही संधी आहे. उद्योगनगरी ही सांस्कृतिक व कलानगरी व्हावी, ही अपेक्षा सर्वांची आहे. ही कलाकारांची देखील जबाबदारी आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण करून सौदर्य निर्माण केले. त्याला पाहून माणूस हसायला, बोलायला, डोलायला लागला. त्यातूनच वेगवेगळ्या कलेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे कला म्हणजे विश्वचैतन्याचा शोध घेणे होय. कलाकार वास्तवाला सौदर्य देवून कलेला सौदर्याने नटवतात. राजकारणातील रंग बदलतात, पण कलेतील रंग बदलत नाहीत, असेही देखणे म्हणाले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, औद्योगिकनगरीची सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल होत आहे. ही चळवळ शहरात भाऊसाहेब भोईर यांनी सुरू केली. त्यांना खांद्याला खांदा देऊन अमित गोरखे यांच्यासारखे अनेक जण मिळून ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पुरस्कारामुळे अनेकांना प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेतून इतिहासाची पाने वाढविण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, कलेला कोणताही जात, धर्म नसतो. शहराच्या वाटचालीत भर टाकणारे अनेक कलाकारांचा हा सन्मान सोहळा आहे. शहराची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम आम्ही करतो आहोत. त्यासाठी अनेक कलाकारांनी इथे येऊन वेळोवेळी चेतना दिली आहे. शहरातील लोकसंख्या वाढली असून अनेक सांस्कृतिक संस्थाही वाढल्या आहेत. संस्कारातून सुसंस्कृतपणे अनेक कलाकार निर्माण होत असून अनेक जण शहरातील कला क्षेत्रासाठी काम करत आहेत.
प्रास्ताविक करताना अमित गोरखे म्हणाले की, १९९८ साली कलारंगची स्थापना केली. आज २० व्या वर्षात संस्थेने पदार्पण केले आहे. संस्थेतर्फे दिला जाणार कलागौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. आज अखेर ३५६ कलाकारांना या पुरस्काराने गौरव झालेला आहे. चित्रपट,नाटक आणि कला क्षेत्रातील नामवंत १७६ कलाकारांनी कलारंगच्या कार्यक्रमांना प्रेमापोटी उपस्थिती लावली. स्थानिक कलागारांना वाव मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शहराच्या नावलौकीकात भर घातली. त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.
सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने प्रभा एंटरप्रायझेस निर्मित पिंपरी चिंचवडमधील स्थानिक कलाकारांच्या मराठी गाणी,नृत्याच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरोज राव यांनी सूत्रसंचालन केले. कलारंगचे उपाध्यक्ष शैलेश लेले,महेश नलावडे, दिनेश देशमुख यांनी संयोजन केले.
व्हिएस न्यूज - पिंपरीतील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात डुक्कर बॉम्बच्या स्फोटात दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दीड वर्षातील ही दुसरी घटना असून, रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाला धावपळ करावी लागली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण करून बॉम्बसदृश वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याच परिसरात असे प्रकार घडत असल्याने त्याचा नेमका शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
वल्लभनगर एसटी आगाराच्या मागील बाजूस तोंडाला गंभीर जखम होऊन मरून पडलेले कुत्रे दिसून आले. या प्रकरणी वल्लभनगर एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, तसेच संत तुकाराम पोलीस चौकीच्या अधिकार्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. डुक्कर बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात घबराट पसरली होती. पोलिसांनीही बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाला बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने तेथील बॉम्बसदृश वस्तू ताब्यात घेण्यात आली. दिघी मॅगझिन येथील संरक्षण खात्याच्या अधिकार्यांकडे तपासणीसाठी ही बॉम्बसदृश वस्तू पाठविण्यात आली आहे, असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले. डुक्कर बॉम्बमुळे कुत्र्यांचा मृत्यू होण्याची वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अशाच प्रकारचे डुक्कर बॉम्ब येथे आढळून आले होते.
असा असतो डुक्कर बॉम्ब
डुक्कर मारण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. त्यामुळे या बॉम्बला डुक्कर बॉम्ब म्हटले जाते. या बॉम्बची आवाजाची तीव्रता कमी असते. जनावराने तोंडात पकडून चावण्याचा प्रयत्न केला असता, हा बॉम्ब फुटतो.
व्हीएस न्यूज - भडकावू भाषण करत एकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास देहूरोड, शितळानगर येथे घडला. हाजी अराफत शेख (वय 39, रा. शितळा नगर, ता. हवेली, पुणे, मूळ रा. कुर्ला, मुंबई) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मूळचे मुंबईचे आहेत. ते पुण्यामध्ये व्यापारासाठी येतात. त्यामुळे त्यांनी शितळा नगर येथे घर घेतले आहे. त्याचे कुटुंबीय देखील पुण्यातच राहतात. रविवारी दुपारी 17 जणांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवला. काहींनी भडकावू भाषणे दिली. तसेच शेख यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - लिंगायत समाज हा संयमी आणि शांतताप्रिय आहे. लिंगायत धर्माची मुळ तत्वे ही लोकशाही मूल्यांवर आधारलेली असून स्वातंत्र्य, समता आणि बंधूता याचा हा समाज पुरस्कर्ता आहे. बाराव्य शतकात थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांनी समाजक्रांती घडवली. अठरापगड जातीच्या लोकांना एकाच छताखाली आणून लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लिंगायत धर्म मान्येता देऊन समाजाला न्याय देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - शिवी दिल्यामुळे संतप्त झालेल्या मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. हा प्रकार शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी येथे घडला. जयकुमार त्रिंबके (वय 29, रा. सविता कुंजच्या मागे, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. समीर सुर्यगंध (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार यांच्या मामाच्या मुलाचा 14 एप्रिल रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त कासारवाडी येथील द्वारकानगर या इमारतीच्या टेरेसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीसाठी समीर देखील आला होता. जयकुमार आणि समीर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. पार्टी सुरु असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामध्ये जयकुमार याने समीरला शिवी दिली. त्यावरून समीरने जवळच असलेली बियरची बाटली जयकुमारच्या डोक्यात फोडली. यामध्ये जयकुमारच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर फऱार झाला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज - एका 17 वर्षाच्या मुलीला पूस लावून पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दापोडी येथे घडला. संशयित आरोपी अकबर शेख (वय 18, रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलगी शनिवारी सायंकाळी अचानक घरातून गायब झाली. घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती कुठेही सापडली नाही. त्यामुळे घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. तिच्या घरच्यांनी संशयित आरोपी अकबर याने त्यांच्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002