एटीएम मधील बॅटऱ्या चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच; काळेवाडीतून 13 बॅटऱ्यांची चोरी
काळेवाडी
2018-04-18
व्हीएसन्युज - एटीएम सेंटर मधील बॅटऱ्या चोरीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काळेवाडीतील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधील 13 बॅट-या चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. अमोल शिंदे (वय 37, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथील कस्पटे वस्ती मधील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स आणि प्रजापती नगरात एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. महालक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील एटीएममधील 27 मार्च रोजी बॅटरी चोरीचा प्रकार उघडकीस आला. तर प्रजापती नगर एटीएम सेंटरमधील बॅट-या चोरीचा प्रकार 7 एप्रिल रोजी उघडकीस आला. दोन्ही एटीएम मधील एकूण 16 बॅट-या आणि एक युपीएस असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. फौजदार हरिष माने अधिक तपास करीत आहेत.