स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे
पिंपरी चिंचवड
2018-04-22
व्हीएसन्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. राहुल जाधव आणि शितल शिंदे यांनी स्थायीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.