व्हीएसन्युज - बनावट चावीने घराचे कुलूप उघडून घरातील 5 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार दि. 13 ते दि. 16 दरम्यान सुसगावात घडला. पूजा पाषाणकर (वय 43, रा. मोहनगर, सुसगाव, ता. मुळशी पुणे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाणकर मोहनगर मधील वेस्टर्न हिल्स बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांच्या घरी शुक्रवार ते सोमवार दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घर चोरट्यांनी बनावट चावीने उघडले. केली. घरातील ड्रॉवरमध्ये असलेले सोने आणि डायमंडचे दागिने, महत्वाची कागदपत्रासह 30 हजार रुपयांची रोकड असा एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.