Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
भाजप राजवटीत शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे 

व्हीएस न्यू - मुख्यमंत्री शहरात असताना भाजपाच्याच नगरसेवकाचा भरदिवसा खून होत आहे, शहरातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काय झाले? असा खडा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.
वाघेरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन सव्वा वर्ष झाले. महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकालात सव्वा वर्षात 30 सर्वसाधारण सभा झाल्या. यापैकी 21 सभा तहकूब करण्याचा राष्ट्रीय विक्रम करुन शहराच्या नावलौकीकात भर घालणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा. अशीही मागणीही वाघेरे यांनी केली.


सर्व साधारण सभा तहकूब करणे आणि उपसूचना देण्याला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नेहमी विरोधच होता. अगदीच अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकूब केली जायची. परंतू शहरातील भाजपच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणातच जास्त रस असल्यामुळे सभा तहकूबीचा राष्ट्रीय विक्रम करणे शक्य झाले आहे. स्मार्ट सिटी व नदी सुधार प्रकल्पासाठी किती निधी आणला? वाहतूक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम प्रश्न, शास्तीकराचा प्रश्न, बंद जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या भाजपाला विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे काय? या प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना मिळाली पाहिजेत.


राष्ट्रवादीच्या कार्यकालात पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत राज्यात प्रथम व देशात नवव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. आता भाजपच्या काळात 43 व्या क्रमांकावर फेकले गेले असून सत्ताधाऱ्यांनी याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

...Read More

V. S. News
फॅमिली ट्रिपचे पॅकेज देण्याचे सांगून फसवणूक 

व्हीएस न्यू- 'पश्चिम बंगालला जाण्यासाठी तुम्हाला फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो,' असे सांगून दोघांनी एका तरूणाची 25 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार प्राधिकरण येथे नुकताच उघडकीस आला.


अभिजीत कुलकर्णी (वय-36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांना मोबाईलव्दारे संपर्क साधून आरोपींनी फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो, असे सांगून खात्यावर 92 हजार रूपये भरण्यास भाग पाडले. आरोपींनी ट्रिपचे आयोजन केले नाही. त्यामुळे कुलकर्णी यांनी आरोपींकडे दिलेले पैसे मागितले. आरोपींनी 67 हजार रूपये दिले. परंतू, उर्वरित 25 हजार रूपये न देता फसवणूक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपळे-गुरवमध्ये गॅस गळती;  स्फोटात वृद्ध दांपत्य भाजले

व्हीएस न्यू- गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वृद्ध दांपत्य गंभीररीत्या भाजले आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. प्रभाकर नगरकर (वय 60) आणि आशा नगरकर (वय 58) अशी स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध पती-पत्नीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगरकर पिंपळे गुरवमध्ये ओम साई सृष्टी चौकात एका चाळीवजा घरात राहतात. त्यांचे घर एकाच खोलीचे आहे. मंगळवारी रात्री स्वयंपाक झाल्यानंतर गॅस सुरूच राहिला. जेवण झाल्यानंतर दोघेही झोपले. मध्यरात्री प्रभाकर लघुशंकेसाठी उठले. दरम्यान, गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यांना याबाबत कल्पना आली नाही. त्यांनी घरातील दिवा सुरू केला. त्यावेळी लिकेज झालेल्या गॅसचा स्फोट झाला. यामध्ये नगरकर दांपत्य गंभीररित्या भाजले.


घटनेची माहिती पावणेएकच्या सुमारास अग्निशमन विभागाला समजली. माहिती मिळताच तात्काळ वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. राहटणी अग्निशमन विभागाचे भाऊसाहेब धराडे, विकास नाईक, चिपळूणकर यांच्या पथकाने आग तात्काळ नियंत्रणात आणली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

...Read More

V. S. News
भुशी धरण ओसांडून वाहू लागले 

व्हीएस न्यू - पर्यटनाचे आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ओसांडून वाहू लागले. यामुळे धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद पर्यटक घेऊ लागले आहेत.


दोन आठवड्यापासून पर्यटकांना भुशी धरण भरण्याचे वेध लागले होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखिल पर्यटन धरणावर गर्दी करत होते. शुक्रवारपासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने मंगळवारी अखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायकांची प्रतिक्षा संपवली व पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओसांडून वाहू लागले. धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर पाणी वाहू लागले आहे.


मागील आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. धरणावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
निगडीत विजेच्या धक्क्याने ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - रस्त्यावरून विजेच्या खांबाजवळून जात असताना एका ९ वर्षीय बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील ओटा स्कीम, निगडी येथे मंगळवारी (ता.२६) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

हरीओम विनायक नराल – (वय ९, रा.पंचशील हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटा स्कीम येथील अंकुश चौकातून रस्त्याने पायी चालला होता. तो विजेच्या खांबाजवळून जात असताना त्यास विजेचा जोरदार झटका लागला व तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला. मात्र त्यानंतरही या ठिकाणी विद्युत प्रवाह येत असल्याचे दिसून आले. यामुळे वीजचोरीतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी व्यक्त केली.

...Read More

V. S. News
पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज

व्हीएस न्यूज - जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्त मंगळवारी सकाळी देहुगाव येथे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.

यावेळी उपअधिक्षक तेजस्विनी सातपुते, डीवायएसपी जी.एस. माडगूळकर, मंदिराचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे कमिटी, देहूरोडचे निरीक्षक प्रकाश धस, सर्व प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुवारी (दि.५ जुलै) रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यापूर्वी पालकमंत्री गिरीष बापट, उपअधीक्षक, डीवायएसपी यांनी बैठका घेतली आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत अद्याप पूर्ण न झालेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला.

लाखो भाविक सहभागी होणाऱ्या या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल्या आहे. यासाठी अधिक्षक हक, उपाधिक्षक सातपुते, डीवायएसपी माडगूळकर यांच्यासह सात निरीक्षक, २२ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २७० महिला पुरुष पोलिस कर्मचारी आणि १५० होमगार्ड असणार आहेत. या सोबत एसआरपीएफ, दंगा काबू नियंत्रण पथक व इतरही पथके तैनात असणार आहेत.

...Read More

V. S. News
मावस भावानेच केला नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून

व्हीएस न्यू - आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे यांची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भडणातून झाली असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, देहूफटा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन महिन्यांपूर्वी मयत बालाजी कांबळे हे काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाला आले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारूच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्या बरोबर झटपट केली होती. अजय मेटकरी हा मयत बालाजी कांबळे याचा मावस भाऊ आहे. भांडणानंतर त्याने बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अनेकवेळा धमकी दिली होती. त्यानेच भांडणाचा राग मनात धरून नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून केला. अशी फिर्याद घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

...Read More

V. S. News
शिक्षण, उदयोग, व्यवसाय व व्यापारात प्रोत्साहन देण्यासाठी मराठा महासंघ प्रयत्नशील - रणजीत जगताप

व्हीएस न्यू- मराठा समाजाला शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पहिल्या पासून प्रयत्न करत आहे. महासंघानेच सर्वप्रथम या बाबत जनजागृती केली. आरक्षण हा आमचा हक्कच आहे, तो आम्ही मिळवणारच परंतु राज्यातील मराठा समाजातील सर्व युवक युवतींना शिक्षण, उदयोग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे.

त्यासाठी येणा-या अडीअडचणीवर मात करण्यासाठी राज्यभरातील महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत. वेळोवेळी मराठा समाजाच्या समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आम्ही आमचे ध्येय गाठूच. असे प्रतिपादन अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजीत जगताप यांनी पिंपरी, पुणे येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजित जगताप, प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ, प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी सांगितले की, अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की, मागील वर्षी राज्य सरकारने काढलेला श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचीअंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी. शासऩ फक्त आदेश काढून मोकळे झाले आहे. प्रत्यक्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेताना शाळा महाविद्यालयांकडून संपुर्ण फी भरण्याची मागणी केली जाते. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन करते की, चालु शैक्षणिक वर्षी प्रवेश घेताना संपुर्ण फी मागणा-या शिक्षण संस्थां विरुध्द तक्रार करण्यासाठी पुढे यावे. विद्यार्थ्यांची व पालकांची अडवणूक करणा-या अशा शिक्षण संस्थांना अखिल भारतीय युवक मराठा महासंघ धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढण्याचे काम केले, मात्र प्रत्यक्षात युवकांना हे कर्ज देण्यासाठी बँकाकडून अनेक कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत मागणी व अडवणुक केली जाते. गरजु युवकांनी ऑनलाईन प्रक्रीया पुर्ण करुन अर्ज भरल्यानंतर बॅंक अधिकारी मुलाखतीच्या वेळी आम्हाला शासनाचा आदेश प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे या योजनेखाली कर्ज देण्याचे नाकारतात. पिळवणुक करतात असे निदर्शनास आले आहे. तसेच शेतक-यांना कर्ज मिळवण्यासाठी व कर्जमाफीसाठी बॅंक अधिकारी अडवणूक करतात. माता भगिनींणा छळतात अशा निर्ढावलेल्या अधिका-यांना व त्यांच्या दलालांना वठणीवर आणण्यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ आवाहन करते की, अशा बँक अधिका-यांना उघडे पाडण्यासाठी मराठा महासंघाकडे तक्रार करावी.

अखिल भारतीय युवक मराठा महासंघ त्यांचा योग्य समाचार घेईल. शेतक-यांना व युवकांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करील. तसेच अखिल भारतीय युवक मराठा महासंघ राज्य शासनाकडे मागणी करत आहे की, मराठा समाजाच्या हितासाठी फक्त आदेश काढून उपयोग नाही. तर ३१ मार्च २०१८ पर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत किती विद्यार्थ्यांना, किती रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून किती गरजु युवक युवतींना उद्योग व्यवसायासाठी किती रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. याची सविस्तर आकडेवारी नागरीकांच्या माहितीसाठी वेबसाईटवर जाहिर करावी. आमचे असे म्हणणे आहे की, या दोन्ही योजनेचा मराठा समाजातील तरुणांना म्हणावा तसा उपयोग झाला नाही. या योजनेचा सक्षमपणे निधी वापरला जावा म्हणून शासनाने जाहिरात करावी.

प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरात केएसबी चौकातील उड्डाणपुलाखाली असलेला कै. अण्णासाहेब पाटील यांच्या अर्धपुतळा काढून पुर्णाकृती पुतळा उभारला जावा अशीही मागणी केली. तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने प्लॅस्टीक बंदीचा घेतलेला निर्णयाचे अखिल भारतीय युवक मराठा महासंघ स्वागत करत आहे. परंतु कोणतीही पुर्व तयारी न करता हा निर्णय घेतला असल्याचे दिसते. प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी, कागदी पिशव्या बनवणा-या उदयोजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक होते. मात्र असे न करता घाई गडबडीने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे दिसते. यामुळे सामान्य नागरीक व्यापारी उदयोजक सर्वच सभ्रंमावस्थेत आहेत. या बाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रशासन मात्र प्लॅस्टीक उत्पादकांना पाठीशी घालुन सामान्य नागरीकांवर व छोट्या व्यवसायीकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. याचा अखिल भारतीय युवक मराठा महासंघ निषेध करत आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना कै. अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे. या वटवृक्षाचे अनेक शाखा, संस्था संघटनांमध्ये रुपांतर झाले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाला करावी लागली. अशीच मराठा समाजाची सर्व शक्ती एकत्र करुन शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण आम्ही मिळवुच, असा ठाम विश्वास अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी व्यक्त केला.

...Read More

V. S. News
​​​​​​​मावळात पावसाचे जोरदार आगमन, शेतकरी आनंदात

व्हीएस न्यूज - मान्सूनच्या पावसाची मावळ तालुक्यात जोरदार सुरुवात सुरुवात झाली असून खरीप पिकांच्यासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

मावळ तालुका अतिपावसाचा तालुका असून मावळात प्राधान्याने खरीप पिकेच घेतली जातात. तालुक्यातील 30 हजार एकर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. पावसाची दमदार सुरुवात झाल्याने भात पिकांच्या लागवडीना चांगलाच वेग येणार आहे.

मान्सून पावसाचा जोर पश्चिम पट्यात जास्त असून त्या ठिकाणी भाताच्या पिकांना याचा फायदा होत आहे. मान्सूनच्या पावसाने यावेळी वेळेपूर्वीच सुरुवात केली होती. मात्र नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली होती. मात्र रविवार, सोमवार पासून पावसाचे पुन्हा पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.

मावळच्या पूर्व पट्यातही पावसाचे आगमन झालेले असल्याने खरीप भात पिक तसेच भुईमुग, कडधान्ये, आदी खरीप पिकांच्या पेरण्यांना चांगले वातावरण आहे. मान्सूनच्या पावसाने तालुक्यातील जलसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. शनिवार आणि रविवार जोडून सुट्या आल्याने मावळत वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. पर्यटक दुचाकी आणि चारचाकी गाड्यामधून आल्याने काही महत्वाच्या पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी झाली होती.

मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाल्याने पश्चिम पट्‌ट्यातील डोंगरी भागात ओढे, नाले, धबधबे भरभरून वाहू लागल्याने पुणे मुंबई कडील पर्यटकांनी मावळात वर्षाविहारासाठी मोठी गर्दी केली होती.

पुणे मुंबई महामार्ग या पर्यटकांनी फुलून गेला होता. महामार्गावरील धबध्ब्यावरहि प्रचंड गर्दी झाली होती. चहा, कॉफी, नाष्टा, भोजन करण्यासाठी पर्यटकांना वाट पहावी लागत होती.

...Read More

V. S. News
वृध्दांनी स्वतःमध्येच योग्य तो बदल करावा

व्हीएस न्यूज - खरोखर आपण ज्येष्ठ आहोत का ? जुनाट बुरसटलेले ज्येष्ठ आहोत हे या पिढीने तपासून पाहावं. जर मुलंबाळ आपल्या अन्न, वस्त्र, निवारा तसेच आजारपणाची काळजी घेत असतील तर संवादसारख्या आपल्या मानसिक गरजांची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं कितपत योग्य आहे? निवृत्तीनंतर आपलं मनोरंजन करण्यासाठी वाचन, लिखान, टिव्ही, स्मार्ट फोन, फिरायला जाणं, संगीत आदी माध्यमांतून निवड करून पुढील पिढीवर संवादाच्या गरजेचा भार टाकता कामा नये, असे मत काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.

नव्या पिढीला दोष न देता वृध्दांनी आपल्या स्वतःमध्येच बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. नवीन पिढीचा व घरातील आनंदाचे वातावरण कसे राहील, यासाठी ज्येष्ठांनी प्रयत्न करावेत, असेही बकाल म्हणाल.

...Read More

V. S. News
 शिक्षण ही एक साधना

व्हीएस न्यूज - शिक्षण ही एक साधना आहे, जेवढे तन्मय होऊन तुम्ही ही साधना कराल. तितके चांगले तुम्ही शिक्षण साधक बनाल, असे प्रतिपादन चारित्र्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता यांनी केले.

ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राच्या आयोजित इयत्ता 10 वीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, प्राचार्य प्रज्ञा पाटील, सुभाष गदादे, मधुरा लुंकड आदी उपस्थित होते. शाळेच्या 49 विद्यार्थ्यांनी 90 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. 75 ते 89 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी माध्यमाचा 98.78 तर इंग्रजी माध्यमाचा 94.91 टक्के निकाल लागला.

अथर्व कुलकर्णी याला 99.80, साक्षी महाजन 97.40 तर श्रेया जगताप हिला 97.20 टक्के गुण मिळविले. श्रावणी कुलकर्णी, सोनिय जगदाळे, श्रृती पिंगळे यांनी गणितात तर अथर्व कुलकर्णी, साक्षी महाजन, प्रथमेश भोजने, ओम महाजन यांनी संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविले. तंत्र शिक्षण विभागात अमृता साळुंखे प्रथम आली. सूत्रसंचालन कल्याणी पटवर्धन, वैशाली गायकवाड यांनी केले. अनिरूध्द पुरीगोसावी, नागेश जोशी, राजश्री मराठे आदींनी संयोजन केले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!